kanchan chabukswar

Inspirational

4.6  

kanchan chabukswar

Inspirational

प्रसंगावधान............... सौ कांचन चाबुकस्वार

प्रसंगावधान............... सौ कांचन चाबुकस्वार

9 mins
488


पंच्याण्णव वर्षाची तारा, तिची मैत्रीण मीरा, आणि तिची लाडकी मुलगी वसुंधरा यांच्या वाराणसी,गया, प्रयाग अयोध्या यात्रेला निघाली होती. वसुंधरा ज्येष्ठ नागरिक होती पण आपल्या आईचीआणि मीरा मावशीची प्रबळ इच्छा म्हणून हे शिवधनुष्य उचलले होते. मुंबईहून विमानाचे तिकीट काढलेली होती आणि वाराणसी नंतर ह्या तिघी जणी एका मोठ्या आरामदायी गाडीतून फिरणार होत्या. नुकत्याच झालेल्या अयोध्येत विमानतळ परतीच्या प्रवासासाठी फारच सोयीचंI झालेलंI होतं.वाराणसीमध्ये काशी विश्वेश्वराचे शांत दर्शन घेऊन, बुद्धगया बुद्धाचा प्रचंड वृक्ष, लुंबिनी, नालंदा विद्यापीठाचे भग्न अवशेष पाहून मीरा आणि तारा भावहळव्या झाल्या होत्या. होती. प्रयाग गंगा-यमुनेच्या सुरेख संगमIवरती दर्शन करून, गंगेमध्ये मध्ये स्नान करूनआता तिघीजणी राम लल्ला दर्शन साठी अयोध्येमध्ये आलेल्या होत्या. दर्शन करून कृतकृत्य मनाने त्यांचा परतीचा प्रवास चालू झाला होता.


सध्या आयोध्या वरून पटना, कानपूर, वाराणसी, अशी छोटी विमान उडत. अजून आयोध्या ते मुंबई विमानसेवा चालू झाली नव्हती. जुन्या काळच्या डाकोटा सारखं पण गरुड कंपनी 65 खुर्च्या असलेलं छोटा विमान आयोध्या पासून कानपूर पर्यंत येणार होतं. आणि तिथून पुढे दुसऱ्या दिवशी विमानाचं तिकीट काढलेलं होतं. तारा आणि मीरा यांना कानपूरच्या चप्पल बूट आणि कातडी सामानांची भरपूर खरेदी करायची होती. वसुंधरा म्हणत होती आपण लगेचच परतीचा प्रवास करू पण या दोघींच्या इच्छे पुढे तिचा नाईलाज झाला.

संध्याकाळी पाच वाजताच विमान होतं, म्हणून परत एकदा दुपारी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तिघीजणी विमानतळाकडे रवाना झाल्या. तारा आणि मीरा आनंदात होत्या. दोघांनीही लोकरी सलवार-कमीज घातला होता, हातात छोटीशी पर्स डोळ्यावर गॉगल पायामध्ये सॅंडल. अशा तारा आणि मीरा देखण्या दिसत होत्या. सीतामाईची ओटी भरून तिला डोळे भरून पाहून दोघेही सारख्या म्हणत होत्या की जन्माचं सार्थक झालं.

वय वर्ष 95 असल्यामुळे त्यांच्या या बोलण्याचा वसुंधरा वेगळाच अर्थ काढत होती आणि तिच्या हृदयामध्ये एक अनामिक कळ निघत होती. आपल्या मुलाबाळांसाठी किंवा नवऱ्यासाठी काहीही न मागता राम लल्ला कडे वसुंधरा फक्त एकच प्रार्थना करत होती,’ मला माझ्या आईला आणि मीरा मावशीला सुखरूप घरी परत घेऊन जाऊ दे.”

रामाचं आणि कृष्णाचा एक मात्र मस्त असते. भक्तांकडे ते दोघेही नुसतेच बघत असतात भक्तांनी काय ते समजून घ्यावं. विमान छोटे असल्यामुळे खुर्च्या दोनX 2 दोन- रांगेत होत्या. तारा आणि मीराला खिडकी जवळची सीट देऊन वसुंधरा आपल्या आईच्या बाजूला बसली.


अयोध्या चा विमानतळ बरंच दूर होतंI.  संध्याकाळची वेळ होती, सुर्य क्षितिजा क्षितिजाकडे झुकलेला होता.

 अतिशय सुरेख दृश्य दिसत होतं. विमानाच्या कॅप्टन पद्मजा सिंग असून फर्स्ट ऑफिसर म्हणून रेवा शर्मा होती. मजेची गोष्ट म्हणजे विमानातले सर्व कर्मचारी, महिला कर्मचारी होत्या. मुख्य कर्मचारी वीणा, आणि तिच्या तिच्याबरोबर मीना आणि नीला. एकंदर दोन पायलट बरोबर तीन महिला कर्मचारी

विमानामध्ये होत्या. नेहमीच्या सूचनेप्रमाणे कुठे दार आहे पाण्यावर उतरावे लागल्यास सुरक्षेचे जॅकेट कुठे ठेवलेले आहे विमानाचा उड्डाण समय फक्त 40 मिनिट आहे वगैरे वगैरे सूचना झाल्या. या सूचनांकडे बहुतेक कोणीच लक्ष देत नाही. पण वसुंधरा च्या लक्षात आले ही मुख्य द्वारा व्यतिरिक्त तिच्या आणि आईच्या बाजूलाच एक सुरक्षित दरवाजा आहे जो अपघात समयी उघडता येईल. आणि त्याच मुळे आईला व्यवस्थित पाय लांबवून बसता येत होतं.

तिच्या आग्रहानुसार प्रसादाची पिशवी आपल्या केबीन लगेच मध्येच ठेवली होती. आईची जपाची माळ वाचायच्या पोथ्या औषधे शाल स्वेटर सगळं काही केबिन मध्येच होतं. आईच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे पैशाची पिशवी आईने

सलवारीच्या कप्प्यामध्ये ठेवली होती. सोन्याची साखळी, हातातल्या बांगड्या वसुंधरेची आई एकदम देखणी दिसत होती. कॅप्टन पद्मजा यांनीदेखील तारा आणि मीरा यांना विमानांमध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. तारा आणि मीरा मजेत गप्पा मारत होत्या की कृष्णा चे दर्शन झालं आणि आता गरुडा ची स्वारी करायची आहे. विमान कंपनीचे नाव गरुड एअरलाइन्स होत ना.


विमानाने धावपट्टी वरती धावायला सुरुवात केली आणि आकाशामध्ये झेप घेतली, एक डौलदार प्रदक्षिणा रामाच्या मंदिरावरून करून घेऊन कानपूर च्या दिशेने प्रस्थान केले.

विमान सोडून आता फक्त दहा मिनिटे झाली होती, तेवढ्या मध्ये अचानक घरी परतणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पक्षांचा थवा कुठूनसा आला आणि विमानाच्या पंखामध्ये अडकला. दोन्हीकडच्या इंजिनांची विचित्र हालचाल झाली आणि क्षणार्धात इंजिन चा सुखद वाटणारा आवाज बंद झाला.


कॅप्टन पद्मजाने रेवा कडे बघितले, रेवाने ताबडतोब इमर्जन्सी मॅन्युअल काढले आणि त्याच्यामध्ये इंजिन बंद पडल्यावर काय करायचे असते याचं पान शोधायला सुरुवात केली. अयोध्या विमानतळ दूर राहिलेलं होतं आणि एवढा वेळ विमानाकडे नव्हता. दुसरंही इंजिन हळूहळू बंदपडताना दिसत होतं.. गाठलेली उंची विमान सोडू लागले. धोक्याचा क्षण आला होता. विमानाची गाठलेली उंची ठेवण्यासाठी पद्मजा आटोकाट प्रयत्न करु लागली. तोपर्यंत रेवाने शोधून काढले दोन्ही इंजिन बंद पडल्यास विमान कुठेतरी उतरावे लागेल. कुठे उतरावे? खाली सगळीकडे दाट लोकवस्ती दिसत होती. इमर्जन्सी कळ दाबून विमान चालू करण्याचा भरपूर प्रयत्न केला. विमानाचे इंजिन बंद झाल्यास दुसऱ्या इंजिन वर्ती काही काळासाठी तरी विमान चालू शकते, विमानाच्या आतील उपकरण तरी दुसरे इंजिन चालू असल्याचा संकेत दाखवत होते पण आता विमान डगमगू लागले होते. विमानामध्ये इंधन पण भरपूर होतं त्यामुळे जर विमान एखाद्या ठिकाणी आदळून खाली आलं तर ते पेट घेण्याची शक्यता होती.


मे -डे मे-डे -मे -डे, . संदेश प्रत्येक विमानतळाकडे जाऊ लागला. अयोध्येच्या विमानतळावरून संदेशाला विमानाने परत फिरावे. पण एवढा वेळ विमाना पाशी नव्हता. विमानतळाच्या आधीच जर विमान खाली कोसळल तर ते दाट लोकवस्ती मध्ये मंदिरांवरती कोसळेल. कुठलीही जीवितहानी मंजूर नव्हती, पद्मजाला. निश्चय केला होता काहिही झालं तरी सगळे प्रवासी सुखरूप उतरले पाहिजे. फर्स्ट ऑफिसर रेवा विमानतळाची संपर्क साधून होती. तिने विमानतळाला आणि गरुडा एअरलाइन्स ला झालेल्या अपघाताची संपूर्ण माहिती फटाफट दिली. गरुड एअरलाईन्सचे इंजिनीयर च्या मते विमान सुरक्षित ठिकाणी खाली उतरवणे हाच एक मार्ग होता. आयोध्या च्या शेजारी असलेलं फैजाबाद आणि बाकीची दाट वस्तीचे शहर विमान उतरवण्याच्या योग्यतेची नव्हती. विमानतळाकडे पोहोचण्यासाठी वीस मिनिटे तरी हवेमध्ये तरंगत राहायला पाहिजे होतं जे इंजिनाच्या बंद पडल्यामुळे शक्य नव्हतं.

कॅप्टन पद्मजाआणि रेवा च्या मनामध्ये कार्यशाळेतले अनुभव डोळ्या समोरून जाऊ लागले. पद्मजा आणि रेवाकडे फक्त विचार करण्यासाठी देखील पाच मिनिटांचा अवधी होता. विमानाची उंची झपाझप खाली येत होती.


कॅप्टन पद्मजाने मुख्य कर्मचारीला केबिनमध्ये बोलावून सांगितले की आपल्याला इमर्जन्सी लँडिंग करायचे आहे तेव्हा सगळ्या प्रवाशांना मानसिकदृष्ट्या तयार करावे. मुख्य कर्मचारी ने ताबडतोब सगळ्यांना सीट बेल्ट लावण्याच्या सूचना दिल्या आणि आपल्या गुडघ्यांमध्ये डोकं ठेवण्याची सूचना केली. जोपर्यंत विमान पूर्णतः खाली उतरत नाही तोपर्यंत कोणीही वर बघू नये असा सल्ला देण्यात आला. सूचना गोड आवाजात पण जरबी च्या स्वरांमध्ये सगळे कर्मचारी प्रवाशांना सूचनांचे पालन करण्यासाठी सांगू लागले. तसे पाण्यावर उतरावयास तयारी करण्यास सांगू लागले.


मीरा आणि वसुंधरा घाबरून गेल्या, पण तारा अतिशय खंबीरपणे म्हणाली जे होईल ते होईल काळजी करू नये.

विमान उतरवण्यासाठी घागरा नदीचं पात्र हीच एक मोक्याची जागा होती, पाण्यामध्ये उतरल्यामुळे विमानाला आग लागणार नव्हती आणि मदतीला कोणी ना कोणीतरी आलेच असते. आयोध्येच्या विमानतळावरून ताबडतोब फैजाबाद आणि आयोध्येच्या कमिशनर यांना फोन केले, फायर ब्रिगेड च्या गाड्या काही मोटर बोट

अंबुलन्स असं सगळं ज्या दिशेने विमान चालले होते त्या दिशेने वेगाने जाऊ लागले.

शरयू आणि घागरा नदी अतिशय रुंद पात्र मधील फैजाबाद आणि आयोध्येच्या जवळून वाहत होत्या. घागरा नदीचे पात्र एका ठिकाणी प्रचंड रुंद असे होते याठिकाणी पद्मजाने आपले छोटे विमान उतरण्याचे ठरवले.

पद्मजा कानावरती पती वीरेंद्र चे बोलणे स्पष्टपणे ऐकू आले, वीरेंद्र स्वतः एक कुशल वैमानिक होता. वीरेंद्र नेहमी म्हणे,” अपघाताच्या वेळी विमानाचे नाक यांना नेहमी वरच ठेवावे, कधीही सूर मारून विमान उतरवू नये. जेव्हा इंजिन बिघाड झालेला असतो तेव्हा जमिनीपेक्षा पाण्यावर उतरवणे जास्त सोयीस्कर पडते.”


अजूनही सूचना केली होती, “कोणीही ऑक्सिजन मास्क लावू नये, जर का इंधन गळती होऊन आग केबिनमध्ये पण आग भडकू शकते म्हणून कोणीही ऑक्सिजन मास्क वापरू नये.” पद्मजा आणि रेवा आता फक्त स्वतःच्या दृष्टीवर अवलंबून होत्या. विमानातले सगळे यंत्र एकामागोमाग एक बंद पडत होते. त्यामुळे कुठल्याही वरती विश्वास न ठेवता स्वतःच्या नजरेत समोर जे काही आहे त्याच्यावरतीच पद्मजा निर्णय घेणार होती.

घागरा नदी आणि शरयु नदीची चंद्रकोर डोळ्यासमोर येत होती, पण परंतु एक मोठी अडचण म्हणजे शरयू नदीवरचा ब्रिज . जर का उतरताना विमान पुलावर धडकले तर मग मात्र कोणीही वाचण्याची शक्यता नव्हती.

उतरण्यासाठी निदान अर्धा किलो मीटरची जागा, रिकामी सपाट, इमारत मंदिर असलेली नको होती. शेवटी- शेवटी- शेवटी शरयू खाली दिसू लागली. संधिप्रकाशाच्या अंधुक उजेडात मध्ये शरयू चे पाणी चांदीसारखे चमचमत होते, शरयूच्या ब्रिज वरती दिवे लागले असल्यामुळे आता स्पष्ट दिसत होता.


मनामध्ये राम लल्ला ला साष्टांग दंडवत घालून रेवा आणि पद्मजाने विमान खाली उतरण्यास सुरुवात केली.

पद्मजा च्या मनामध्ये, काहीही झाले तरी सर्व प्रवाशांचा जीव वाचवायचा हे मुख्य उद्दिष्ट होते.

फर्स्ट ऑफिसर रेवाची नुकतीच इंगेजमेंट झाली होती, कॉकपिटमध्ये बसल्याबसल्या तिने पद्मजाला आपली हिऱ्याची अंगठी दाखवली होती. पद्मजा च्या मुलीने तिला मेडिकलला ऍडमिशन मिळाल्याची गोड बातमी फोनवरून दिली होती. दोघींना पण घरी जाण्याची ओढ होती. त्यामुळे काहीही करून त्या प्रवाशांबरोबर स्वतःचा पण जीव वाचवणारं होत्या. आगीमध्ये होरपळून मरण्यापेक्षा पाण्यावर उतरलो तर कोणी तरी मदतीला येईल आणि प्रवाशांना बाहेर काढेल असा रेवा आणि पद्मजाला दृढ विश्वास होता. घागरा नदी च्या बरोबर मध्यावर येऊन पद्मा च्या आणि रेवाने एकमेकांकडे बघितले देवाला नमस्कार केला आणि सावकाशपणे विमान पाण्यावर उतरवले.


सगळ्या प्रवाशांना थोडासा धक्का बसला पण विमान पाण्यावर उतरल्यामुळे जास्त हानी झाली नाही. कोणालाही कुठेही दुखापत झाली नाही. काही क्षण सगळे जण सुन्न बसून राहिले, ताबडतोब मीना आणि नीला यांनी विमानाचे दरवाजे उघडले,सुरक्षेचे दोन्ही दरवाजे उघडले.

दोन्ही दरवाजामधून रबरी घसरगुंड्या बाहेर सोडल्या या विमानाच्या पंखावरती आणि काही पाण्यावरती उतरत होत्या. कर्मचाऱ्यांनी सगळ्यांना लाईफ जॅकेट घालण्याच्या सूचना दिल्या, वृद्ध मंडळींना त्यांनी स्वतः मदत करून लाईफ जॅकेट चढवले. सगळ्या प्रवाशांना आपले बुट काढून ठेवण्यास सांगितले कारण रबरी घसरगुंडीवरुन घसरताना बूटची अडचण येऊ शकते. आपले जोखमीचे कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड, एटीएम, पैसे, हे आपापल्या खिशात ठेवण्यास सूचना केली. कुठलेही सामान पर्स हँड बॅग जागेवरच सोडून देण्याची सूचना करण्यात आली.

सूचना केल्या की कोणीही अवजड सामान स्वतःबरोबर घेऊन नये कारण त्यामुळे पाण्यात बुडण्याची शक्यता होती.

अचानक चारी बाजूंनी वेगवान मोटर बोट विमानाच्या दिशेने येताना दिसू लागल्या.


विमान खाली येत असताना नदीच्या दोन्ही तीरावर माणसांची तुफान गर्दी जमली होती. पोलीस, अग्निशमन दल, डॉक्टर्स, आणि स्वतः मुख्यमंत्री हेलीकॉप्टर वरून परिस्थितीचा आढावा घेत होते. गरुडा एअरलाइन्सचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी देखील नदीकिनारी जमले होते. विमान कर्मचारी ने तारा आणि मीराला सावकाशपणे हाताला धरून रबरी घसरगुंडीवरुन पंखावरती उतरवले. त्याच्यानंतर वयोमानानुसार महिला मुले वृद्ध मंडळींना सावकाशपणे रबरी घसरगुंडीवरुन पंखावरती उतरवले. दोन्ही बाजूंनी याच क्रमाने माणसे उतरल्यामुळे विमानाचा तोल पण सांभाळला जात होता. हळूहळू विमानामध्ये पाणी चढायला लागले होते परंतु सगळे प्रवासी हे पंखांवर ती उभे होते आणि काही रबरी नावे मध्ये तरंगत होते. फैजाबाद आणि आयोध्या कडून सूचना गेल्यामुळे घागरा नदीच्या किनाऱ्यावर च्या सर्व नावाडी यांनी आपल्या मोटर बोट सावकाशपणे विमाना जवळ आणल्या आणि एका ,एका प्रवाशाला अलगद आपल्या नावे मध्ये बसवले.आता विमान जवळ जवळ सीट पर्यंत पाण्यामध्ये बुडाले होते. अजूनही रेवा आणि पद्मजा विमाना मध्येच होत्या. विमानाच्या हँडल चा मुका घेऊन दोघींनीही विमानाला नमस्कार केला.


विमानातली महत्त्वाची कागदपत्रे आणि काही जरुरीचे सामान त्यांनी आपल्या हातामध्ये घेतले आणि युनिफॉर्म चा कोट चढवला, रेवाने विमानाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन कोणीही प्रवासी नाही याची खात्री करून घेतली आणि त्या दोघी रबरी घसरगुंडीवरुन बाहेर आल्या. रबरी घसरगुंडी विमानापासून सोडवून घेतली, घसरगुंडीची आता नाव झाली होती. सर्व प्रवासी मोटर बोटीमध्ये चढून किनार्‍यापाशी आलेले होते, कॅप्टन पद्मजा आणि रेवा त्यांच्यापाशी येऊन पोहोचल्या तसा सगळ्यांनी एकच जयघोष केला

                                          “श्री राम लल्ला की जय.”

                                          “माता सीता रानी की जय”

मोठ्या रोलर बोटींनी नदी मधले विमान अलगत पणे किनाऱ्यापर्यंत ओढून आणले.


विमानतळ अधिकारी देखील घागरा नदीच्या किनारी डॉक्टरांसोबत तयारच होते. ताबडतोब विमानतळाच्या बस ने सगळ्यांना परत अयोध्येच्या विमानतळा वरती आणण्यात आले आणि सर्व प्रवाशांची वैद्यकीय चाचपणी करण्यासाठी पाठविण्यात आले. निघताना तारा आणि मीरा दोघीजणी पद्मजा आणि रेवा कडे गेल्या, दोघांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या तुम्ही खर्या सीतामाई आहात, त्यातून तुम्ही आम्हाला देखील या दिव्यामधून बाहेर काढलेत अगदी सुखरूपपणे. अशा मुली आपल्या भारत देशामध्ये झाल्या याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे.

दोघींनीही आपल्या गळ्यातील साखळी काढून पद्मजा आणि रेवाच्या गळ्यात घातली.


 तारा आई मुलींना म्हणाली “तुमचे धैर्य, अचूक निर्णय शक्ती आणि संयम यामुळेच सगळ्या प्रवाशांचे प्राण वाचले आहे. आज जर तुम्ही दोघी नसतात तर कदाचित आमच्या प्रवास वैकुंठचा दिशेने सुरू झाला असता .  पद्मजा आणि रेवाला आता गरुड एअरलाइन्सच्या आयोगासमोर चौकशीसाठी सामोरं जायचं होतं.

पद्मजा रेवाला नेहमी सांगत असे ,” आधी प्रवाशांचे प्राण वाचले पाहिजे आणि नंतर विमानाचा निर्जीव सांगाडा”

आणि आज तर तिने दोन्हीही वाचवले होते. जर एखाद्या जमिनीवरती आदळून विमानाने पेट घेतला असता तर कोणीच वाचलं नसते.


वसुंधरा मीरा आणि तारा यांनी दुसऱ्या दिवशी कानपूरला प्रयाण केले, त्यानंतर मुंबईचे विमान पकडून घरी सुखरूप परत गेल्या. गरुडा एअरलाईन्सने आपली चौकशी पूर्ण केली आणि कॅप्टन पद्मजाला सर्वोच्च नागरिक बहुमान जाहीर केला. विमानाचे दोन्ही इंजिन बंद पडले होती तरीही अचूक प्रसंगावधान राखून अतिशय धैर्याने आणि कुशलतेने विमान नदीच्या पाण्यावर उतरवून होणारी जीवितहानी आणि वित्तहानी टाळली होती. तसेच फर्स्ट ऑफिसर रेवाने आपले कर्तव्य अतिशय उत्तम रित्या बजावून कॅप्टन पद्मजाला पूर्णपणे साथ दिली होती. “कॅप्टन पद्मजा “ नाव कार्यालयामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले.


त्याच वर्षी 26 जानेवारीला प्रधानमंत्री यांच्या हस्ते कॅप्टन पद्मजाला शांततेच्या काळामध्ये अतिशय साहस दाखवून 65 माणसांचे प्राण वाचवल्याबद्दल सर्वोच्च बहुमानाचे असे कीर्तीचक्र प्रदान केले गेले.


Rate this content
Log in