प्रीतीचा पारिजात
प्रीतीचा पारिजात
आदिती अतिशय सुंदर आणि हुशार मुलगी. ती आर्ट साईडला होती. तिचे लेखन तिचे भाषण सगळेच कसे उत्कृष्ट आणि जिथल्या तिथे. फॅशनेबल राहणे हे तिचे खासियत. त्यामुळे अख्या कॉलेजमध्ये कायम रोज क्विन तीच. कॉलेजमध्ये हा त्यांचा शेवटचा महिना होता. आता ती आणि तिच्या सर्व मैत्रिणी इव्हन अख्खी बॅच परीक्षेनंतर रिझल्ट लागल्यावर बॅचलर इन आर्ट होणार होते. ती सायकॉलॉजी मध्ये पुढे एमए करणार होती आणि त्यामुळे आज ती पुढच्या काही गोष्टी क्लिअर करण्याकरिता म्हणून आणि त्याविषयी माहिती घेण्यासाठी म्हणून कॉलेजमध्ये सरांना भेटायला आली होती. तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी दोघे तिघे होत्याच.कायम मुलांना प्रश्न असायचा या आदिति च्या अवतीभोवती एवढ्या पोरी असतातच कशा कायम? अर्थात ती दिसायला इतकी देखणी होती की तिच्या अवतीभवती तिची तीच मैत्रिणींचा घोळका गोळा करत असे. तिला कॉलेजमध्ये आल्यापासून म्हणजे अकरावीपासून इतक्या मुलांनी प्रपोज केले होते की त्याच्यापासून वाचण्यासाठी तिनेही आयडिया काढली होती. सगळ्या जणी खुश होत्या कारण तसा अवघड जाण्यासारखं काहीच नव्हतं आणि आर्ट्सला पासिंगची चांगलीच खात्री होती. प्रत्येक जण विषय वेगवेगळा घेणार होते. काही जणी बीए करूनच स्टॉप करत होत्या.तर काही जणांचे बीए मध्ये असतानाच लग्न झाले होते. आदितीने मात्र ठरवले होते एमए करायचे सायकॉलॉजी मध्ये आणि जमल्यास पुढील शिक्षणही सायकॉलॉजी मध्ये घ्यायचे. लेक्चरर म्हणून कुठेतरी जॉब करायचा असं तिने तिचं ठरवलेलं होतं. आणि त्यानुसार ती चालली होती. सगळी माहिती घेऊन ती घरी पोहोचली उद्या तिचा वाढदिवस होता. ती आज आनंदात होती कारण तिचे प्रख्यात प्रिन्सिॉल असलेले वडील तिचा अत्याधिक लाड करायचे. तितकेच ते शिस्तीचे होते पण लाडही तेवढाच. तिला एक मोठा भाऊ होता अजय आणि अर्थातच तो आता आई-वडिलांच्या शिस्तीमुळे अरुणाचल प्रदेश येथे सैन्यामध्ये पोस्टिंग ला होता. त्यामुळे आता इथे ती आणि आई वडील. त्याच्यासाठी स्थळ बघणे मुली बघणे हा कार्यक्रम तर ओघाणे सुरूच होता. पण दरवर्षी तिच्या वाढदिवसाला न चुकता दादाचा येणारा फोन त्या दिवशी मागितलेली गोष्ट सात दिवसांनी मिळायची हे तिला नक्की माहीत. आणि त्या दिवशी सकाळपासून घरामधली चेहेल पेहेल संध्याकाळी मैत्रिणींचा दंगा या सगळ्या गोष्टी तिला अगदी मस्त वाटणाऱ्या होत्या. त्यात ती दरवर्षी आदल्या दिवशी खरेदीला ही जात असे अर्थात आई तिला घेऊन जात असे. आजही आता संध्याकाळी त्यांना बाहेर जायचे होते खरेदी करिता. विश्व फॅशनेबल असल्याने तिने आज काही वेगळे ठरवले होते. आल्यावर जेवण करून झोपली आणि झोप झाल्यावर तिने सहजच मोबाईल हातात घेतला. मनातल्या मनात तिने ठरवले होते आज आईला सांगायचे 'मला नक्की काय आवडते घालायला आणि तोच कलर आणि तोच ड्रेस घ्यायचाय कितीही वेळ जाऊ दे. मनाशी निश्चय करत तिने फोन पाहायला सुरुवात केली. तिच्या व्हाट्सअप वरती एक मेसेज येऊन पडला होता. तिने मेसेज पाठवणार याचा पहिले फोटो पाहिला चेहरा बघितल्यासारखा होता तिने मेसेज उघडून पाहिला त्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर असा बर्थडे चा मेसेज दिला होता. आणि सगळ्यात आधी विश करणारा मीच असेल असेही त्याखाली लिहिले होते. ती गालातल्या गालात हसली. दरवर्षी नव्याने काही मुले अप्रोच करायचा प्रयत्न करत असायचे पण पहिल्यांदाच आदल्या दिवशी दुपारी मेसेज करणारी व्यक्ती म्हणजे गंमतच तिला वाटली. तिने त्या मेसेजला रिप्लाय दिला. तो रिप्लाय पाहताच क्षणी तिकडूनही रिप्लाय आला आणि मग हा खेळ सुरू झाला चॅटिंगचा. कसे काय कोण जाणे पण सगळ्यांना म्हणजे विशेष करून मुलांना हिडीसफिडीस करणारी अदिती त्याच्याशी मात्र हळूहळू चांगलीच बोलायला लागली. अर्थात त्यावर असलेला फोटोही तितकाच हँडसम मुलाचा होता आणि तिने हे चॅट मध्ये बोलूनही दाखवले. काही फोटोज तिला शेअर केले. तो खरच खूप छान लुक असणारा होता. त्याच्या वडिलांचे टायर्स तयार करण्याची फॅक्टरी होती. तो त्याची बॅकग्राऊंड सांगत होता आणि ती फक्त गंमत जंमत करत होती मध्येच ती हसण्यासारखे काही पंच मारक होती. तिला आता गंमत येत होती ती कधी अशी कुठल्याही मुलाशी बोलली नसल्याने तिला आता थोडे छान वाटत होते मजाही येत होती आणि चेहऱ्यावरती तिच्या थोडीशी लाली पसरली होती कारण गंमत गंमत आणि अशी बोलकी गंमत तिने कधी कोणाशी केलीच नव्हती. आणि तिचे बोलण्यातील स्मार्टनेस जोक पाहून पलीकडून बोलत असलेला दिनेश हसून हसून अर्ध मेला व्हायचा राहिला होता. मैत्रीचा हात पुढे केलेल्या दिनेशला आता एक अतिशय छान मैत्रीण भेटली असे वाटू लागले. किंबहुना तो तिच्या प्रेमातच होताच, पण आता तो तिच्यावरती अगदी भरभरून प्रेम करू लागला होता. कारण तिचा बोलण्यातील सेन्स त्याला अगदी मनाच्या खोल तळापर्यंत पोहोचत होता. दोघेही खूप हसत होते त्याला एका गोष्टीचा आनंद वाटला की काही क्षणातच त्यांचं टयुनिंग खूप चांगलं जुळलं होतं. हिलाच सगळेजण तुसडी म्हणायचे का? हा प्रश्न आता त्याला पडला होता. खूप छान असा आधी तिचा वाढदिवस साजरा झाला वाढदिवसाचे फोटो आणि हळूहळू रोजचे बोलणे यातून अदिती आणि दिनेश खूप जवळ आली होते. शरीराने ते लांब असले तरी मनाने ते अत्यंत जवळ होते. दोघांना हि सातत्याने बोलण्याची ओढ असायची. दिवस दोघांनीही भेटायचे ठरवले आधी तिच्या आणि दिनेशच्या घराच्या मध्ये एक फिरण्याकरिता पार्क होता त्या पार्कमध्ये एक सुंदर पारिजातकाचे झाड होते त्या पारिजातकाच्या झाडाखाली बरेच बेंचेस टाकलेले होते. त्या ठिकाणी भेटण्याचे ठरले. अगदी दोघेही वेळेवरती किंबहुना दिनेश वेळे आधीच पोचला होता. एकमेकांना बघून लाजत होते दोघे. दोघांनाही कळले होते की मैत्रीपेक्षा जास्त असे काहीतरी दोघांच्याही नात्यांमध्ये होते. ज्या दिवशी ते भेटले त्या दिवशी त्यांनी दोघांनी एकमेकांना कमिटमेंट दिली दर आठवड्याला याच ठिकाणी आपण भेटायचे वेळ दोघांच्याही सोयीनुसार ठरवायची. तिला आता दिनेश चा सहवास हवाहवासा वाटत होता. तर दिनेश चे तर स्वप्नच पूर्ण झाले होते. त्यात दिनेश तिला सीनियर होता आणि त्याचे एम ए कम्प्लीट होत आले होते लवकरच त्याला जॉबही मिळणार होता त्याचे घर पूर्णपणे सेटलड होते. दोघांनीही ठरवलं काही कालावधीतच घरच्यांना सांगायचा आणि लग्नामध्ये अडकायचं. त्यापूर्वी फक्त भेटीगाठी आणि बोलणे जास्तीत जास्त फिरणे पण त्याच्या पुढे जायचं नाही ही सक्त ताकीद अदितीची होती. कितीतरी महिने ते दर आठवड्याला भेटत असत. पारिजातकाचा सडा ते खाली बसले की त्यांच्या अंगावर अगदी अलगदपणे पडत असे. मंद येत असलेला पारिजातकाचा वास आणि दोघांना मिळालेला एकमेकांचा सहवास यांनी तिथले वातावरण अगदी प्रेममय होत होते. मोठ्या शहरात असल्यामुळे त्यांना बघणारे मात्र आश्चर्यचकित होत असतात कारण एकमेकांना हातही न लावता एकमेकांच्या बाजूला बसून गप्पा मारणारे पहिले कपल त्यांना दिसत असे. एवढे असूनही फोनवर तर चॅटिंग सुरू होते च दोघांचे. एक दिवस मात्र सकाळपासून आधी तिला दिनेश चा एकही मेसेज आला नाही तिला आता काळजी वाटू लागली तिने त्याला फोन केला फोन काही लागेना कॉलेज संपूनही चार महिने झाले तरी रेग्युलरली फोनवर बोलणारे आणि दर आठवड्याला भेटणारे असे दोघेही असताना अचानकपणे दिनेश गायब झाला होता. दिनेश मित्रांना तिने फोन केले. आलास तो भेटला ही नव्हता आणि काही निरोप ही दिला नव्हता. आदितीने ठरवले दिनेशला नेहमी वाटायचे की वाट बघणे म्हणजे प्रेम म्हणून तिने ठरवले किती वाट बघेल. आता कॉलेज सुरू झाले होते दिनेश तिच्या संपर्कात नसून जवळजवळ एक महिना उलटत आला होता. एका अंनोन नंबर वरून तिला कॉल आला. तिने कॉल रिसिव्ह केला त्या वेळेला ती त्या पारिजातकाच्या झाडाखाली डोळ्यामध्ये पाणी भरून पारिजाता काकडे पाहत होती तिच्या अंगावर पडलेली फुले तिने उजळीत घेतली होती आणि वाचलेला कॉल तिने रिसिव्ह केला तर तिला जोरात धक्का बसला कारण पलीकडून दिनेश आवाज होता. ती हुंदके देऊन रडू लागली. दिनेश ला विचारले "अरे कुठे होतास? काय झाले? का गायब झालास? काही फोन मेसेज काहीच कसे नाही."त्यावर आता दिनेश म्हणाला "काळजी करू नकोस आता कुठेही सोडून तुला जाणार नाही. रोज तू कंटाळशील इतके मेसेज असतील. आणि म्हटलीस तर रोजही भेटू."बास त्याच्या एवढ्याशा बोलण्याने आधी तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. तिने त्याला विचारले "आत्ता येणार आहेस का? मी इथेच आहे" त्यावर तो म्हणाला "एक मिनिटात पोहोचतोय रस्त्यावरच आहे."तिला प्रचंड आनंद झाला तिला आज कळले होते की ती किती हृदयापासून त्याच्यावर प्रेम करत होती. दिनेश आला आणि तिच्या शेजारी नेहमीप्रमाणे बसला. तिच्या डोळ्यातील पाणी त्याने पाहिले. ते पुसायला लावले. आणि दोघे बराच वेळ गप्पा मारत बसले. आज मात्र पारिजातकाचा सडा खूप पडत होता. अगदी ओंजळीत साठवण्यापलीकडे. दोन-तीन आठवडे गेले असतील, रोज फोन रोज बोलणे, आठवड्यातून एकदा भेटणे, पूर्वपदावर तिचे आयुष्य आले होते. ती आता शिक्षणावरही पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून होती. एक दिवस मात्र अचानक तिच्या वडिलांनी डॉक्टर कुलकर्णी यांना बोलावले होते. ते एक मानोसपचार तज्ञ होते. ते आदीती ला भेटले. आणि त्यांनी तिच्याबद्दल बरीच माहिती विचारली. सगळी माहिती सांगून झाल्यावर तिने तिथेच बसलेल्या आई आणि वडिलांना विचारले "हे असं का?"तिला जवळ घेत बाबा म्हणाले,"बेटा तुला आठवत नाहीये पण जवळजवळ महिना झाला, तू अजूनही त्या पारिजातकाच्या झाडाकडे जातेस. एकटीच बडबडत बसतेस. काळजी नाही का लागणार? अगं आमच्या पोटाचा गोळा आहेस." ती त्यावरती आता बाबांना म्हणाली "काय बाबा काहीतरी काय? मला दिनेश भेटायला येतो. त्या व्यतिरिक्त मी तिथे जातच नाही." आता बाबा तिच्याकडे रागाने आणि वैतागून पाहू लागले. इकडे आई ने बाबांचा हात दाबला 'सांगू नका,' म्हणून. आणि डॉक्टरांनी त्यांना खून केली. तरीही बाबांचा बांध फुटला. आणि ते आदिती ला म्हणाले "अगं ज्या दिवशी तू भेटायला गेलीस त्याला, त्याच दिवशी त्याचा एक्सीडेंट झाला. आणि तो जागेवरच गेला. हे तुला दुसऱ्या दिवशी सांगितल्यावर दोन दिवस तू शुद्धीत नव्हतीस. आणि जेव्हा शुद्धीत आलीस ना, तेव्हापासून हाच खेळ चालू आहे. अग कधी थांबणार हे सगळं ? ती डोळे फाडून त्यांच्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आज ती पुन्हा त्याला भेटणार होती. काही वेळापूर्वीच तर तिचा त्याच्याशी फोन झाला होता. तिने हे सारं काही सगळ्यांना समजावून सांगण्याचे पाहिले. पण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नव्हते. शेवट तिने पटपट आवरले आणि ती म्हणाली "चला मी तुम्हाला घेऊन जाते." एव्हाना डॉक्टर निघून गेले होते. आई आणि बाबा तिच्याबरोबर त्या पारिजातकाच्या झाडापर्यंत पोहोचले. बाबा म्हणाले "कदाचित आम्ही असल्याने तो येणार नाही. आम्ही लांब बसून बघतो. तू बस जा..." ती पारिजातकाच्या झाडाखाली बसली. तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू मध्ये मध्ये येत होते. पारिजातकाच्या मंद सुवासाकडे आणि त्या फुलांकडे पहात असतानाच तिथे दिनेश आला. दिनेशला बघून आज ती इतकी आनंदी झाली की तिने त्याला कडकडून मिठी मारली. त्याने तिला बसवले. आणि तोही तिच्या शेजारी बसला. आणि त्याने विचारले "काय झाले? अशी का करते आहेस?" त्यावर ती म्हणाली "बघ तू आहेस तर हे सगळे म्हणतात तू नाहीयेस..." आणि ती रडू लागली. त्यावर दिनेश तिला म्हणाला "मी तुझ्यासाठी कायमच आहे. तुला माहितीये ना पारिजातकाचा सडा हा फक्त आपल्यासाठी आहे. आपण दोघेच त्यात कोणी तिसरा असू शकत नाही. पहिले आहेस ना तू आपल्याच इथे पारिजातक अगदी मनसोक्त बरसतो." त्यावर ती स्मितहास्य करत म्हणाली "हो आणि म्हणूनच मला माहिती आहे तू मला कधीच सोडून जाणार नाहीस." लांबून पहात असलेले आई-बाबा मात्र एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडत होते. कारण आजूबाजूचे लोक तिच्याकडे एकटेच बडबडत असताना पाहून आश्चर्य व्यक्त करत होते. ती मरेपर्यंत तिच्या अंगावर प्रीतीचा पारिजातकाचा सडा असाच कायम पडत राहिला. तिने कधी लग्नच केले नाही. आई-वडिलांच्या उपचाराने ती शिकली, प्राचार्य म्हणून एका कॉलेजमध्ये शिकवू लागली. आता जरी मनाने खंबीर झाली असली तरीही दर आठवड्याला दिनेश रुपी पारिजातकाला भेटून ती मनोमन हाच प्रश्न विचारात असते "सुभद्राने लावलेला पारिजात राधेवर असाच बरसत असेल का? असाच प्रीतीचा सडा तिच्यावर पडत असेल का?"
आजही तो पारिजात तिच्यावरती मनसोक्त बरसतो. दिनेश तिची आता वाट पाहतो, तिला आता जवळही घेतो. कित्येक तास ते बोलत असताना पारिजात मात्र बरसतच असतो. प्रीतीच्या सड्याने दिला सुगंधित करीत असतो.
समाप्त.....

