नागरिक ही जागृत आहेत
नागरिक ही जागृत आहेत
खरंतर सातारा शहरात पाण्याचा तुटवडा होणे ही गोष्ट फारशी अपेक्षित नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडताना दिसतात. अर्थात कारणे वेगवेगळी असली तरी पाण्याचा तुटवडा त्रासदायक असतो. 21 तारखेला नवीन वॉल आणि पाईप लाईन बसवणे या कारणामुळे नगरपालिकेचे सर्क्युलर आले की 24 तारखेला पाणी येणार नाही. हे सर्क्युलर मी लोकांपर्यंत पोचवले आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना दिलासा मिळाला. कारण ही सूचना दोन दिवस आधी मिळाल्यामुळे नागरिकांना पाण्याची तरतूद करून ठेवता आली होती. पाणी न येण्याच्या गोष्टीला अवघे दोन दिवस झाले असतील. 26 फेब्रुवारीला म्हणजे आज सकाळी दहा वाजता प्रभागातील नागरिक म्हणजे श्री रांगोले काका यांचा फोन आला. त्याचबरोबर त्याच परिसरातील ४..५ नागरिकांचे मिस कॉल ही झाले होते. नेहमीप्रमाणे मला वाटले पाणी आले नाही म्हणून कॉल केले असतील. सकाळची वेळ असल्याने बरेच मिस-कॉल झाले होते. त्यावरूनच खात्री पटली होती की पाणी आलं नाही. आणि असा विचार करतच मी काकांना फोन लावला.
पलीकडून काका बोलू लागले. थोडाबहुत विषय कालच्या कार्यक्रमाचा म्हणजेच माझ्या माध्यमातून होत असलेले रस्ते आणि त्याचे उद्घाटन याविषयी चर्चा झाली. आणि एकदमच ते बोलले "उद्यापासून काही पाणी येणार नाही का?" मी पण आश्चर्यचकित झाले. आणि त्यांना विचारले "का कोणी सांगितले का?" त्यावर हसतच ते बोलले. "नाही हो काल पासून म्हणजे काल रात्री अकरा पासून नळाला जे पाणी आलेल आहे ते आज सकाळी दहा वाजले तरी पाणी आहेच." हे ऐकून मलाही आश्चर्य वाटले. मी लगेच दुसऱ्या मोबाईल वरून पाणी पुरवठा अधिकारी संदीप सावंत यांना फोन लावला. त्यांचा फोन लागेपर्यंत काकांना कन्फर्म विचारले "काका तुमच्याकडेच फक्त येत आहे असं नाहीना?" त्यावर ते म्हणाले "तुम्हाला ही आले असतील की फोन लोकांचे दोन-तीन पेठामध्ये पाणी आहे." तेव्हा मला उलघडा झाला आलेल्या ८..१० कॉल चा. तोपर्यंत मी लावलेला सावंतांचा फोन उचलला गेला होता. मी अगदी आनंदातच त्यांना विचारलं "काय हो 24 तास पाण्याची सुविधा देण्याची केलेली कमिटमेंट पूर्ण झाली की काय? पण हे असं काय रात्रीपासून पाणी का चालू केलं निदान सकाळ पासून चालू करायचं"...( खरंतर पाण्याच्या संदर्भात नागरिकांसाठी इंजिनीयर गाडवे असू देत, किंवा इंजिनीयर वाठारे असू देत शिवाय पाण्याच्या अडचणी बाबत नंदू कांबळे असतील श्री घाडगे असतील श्री सागर पवार किंवा पाणीपुरवठा विभागातले सगळेच कर्मचारी हे कायम सहकाराची भूमिका घेणारे असल्याने नगरपालिकेचे तेवढे खाते कामा बाबत दिलासादायक आहे असे म्हणायला हरकत नाही.) माझ्या या प्रश्नाने सावंत चांगलेच गडबडले. त्यांनी लगेच मला प्रश्न विचारला "कसं काय?कोणाला पाणी चालू आहे." मी ही त्यांना सांगितले "दोन-तीन पेठांना पाणी रात्रभर चालू आहे. पाणी दिल्याबद्दल आमची कोणाची काही हरकत नाही पण आज पाणी जास्त सोडलं म्हणून दोन-तीन दिवस जर पाणी बंद कराल तर सांगते मग." त्यांनी मला सांगितलं मॅडम "आम्ही पाणी चालू केलं नाहीये." मग मात्र मला पुन्हा एकदा धक्का बसला. लगेचच त्यांनी मला "पाणी कोणत्या एरियात येत आहे असे विचारले?" आणि मी २..३एरिया चे नाव सांगितल्याबरोबर "दहा मिनिटात मॅडम त्या ठिकाणी पोहोचतो." असे सांगून त्यांनी फोन ठेवला.
त्यानंतर मी ही विसरून गेले. माझी कामं आणि आलेले फोन चालू होते. त्यात पुन्हा एकदा एका तासाने श्री संदीप सावंत यांचा फोन आला. मी फोन उचलला तर पलीकडून ते आणि त्यांच्या बरोबर एक दोघेजण बोलत होते. "मॅडम खूप खूप धन्यवाद आभारी आहे." आता मात्र मला काहीच समजेना.. मी त्यांना विचारलं "कशाबद्दल?" त्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली, "मॅडम काल पासून गुरुकुल टाकी भरली जाईना. रात्रभर आम्ही फिरतो आहे. पाणी कुठे जातय हे कळायला मार्ग नाही. पण टाकी जर भरली नाही तर उद्या शंभर टक्के पाणी कोणालाही देता आलं नसतं. म्हणून शेवट आज सकाळी पंच्याहत्तर हजाराचा वॉलव्ह मागवला.तरीपण अजून लाख रुपये खर्च झाले असता. आणि एवढा खर्च करून दोन-तीन दिवस नागरिकांना पाणी मिळाले नसते ते वेगळेच" हे जर नुसते सावंत बोलले असते तर कदाचित मी विश्वास ठेवला नसता. पण जे कामगार या पाईपलाईन बसवण्यासाठी, वोल्व बसवण्यासाठी काम करतात, ते घाडगे आणि सावंत सांगत होते. "मॅडम नगरपालिकेचे पैसे वाचले आणि लोकांना आता उद्या पाण्याचा पुन्हा त्रास होणार नाही खरंच तुमचे लै आभार." मग मी पण त्यांना विचारलं "असा किती खर्च झाला असता पैसा?" त्यावर त्यांनी सांगितले "वॉल 75 हजाराचा आहे. त्याला लागणारी पाईप आणि पुन्हा एखादा वॉल जर पुन्हा बसवावा लागला असता तर तो खर्च असा मिळून नाही म्हटलं तर दोन लाखापर्यंत खर्च तुमच्यामुळे वाचला. खरं तर एमजीपी च्या साहेबांना तुमच्याकडं पेढे घेऊन पाठवून दिलं पाहिजे कारण ते मी काल रात्रभर आमच्याबरोबरच होते काय केल घोटाळा काय झाले ते कळायला मार्ग नव्हता... अन् यापेक्षा वाईट झालं असतं म्हणजे गुरुकुल टाकी वाल्यांना दोन दिवस पाणी च आलं नसतं."
घाडगे यांचे सारे काही ऐकून घेऊन त्यांना एवढेच फक्त मी सांगितलं "माझे आभार मानण्यापेक्षा नागरिकांचे आभार माना ज्यांनी प्रामाणिकपणे मला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हा सर्व लोकांचे सुद्धा आभार कारण नागरिकांच्या पाण्यासाठी तुम्ही जी वन वन करताय ती काही कमी नाही."
मी त्यांचे व त्यांनी माझे आभार मानले. पण खरे आभार मानले पाहिजे ते श्री शेट्टी,श्री रांगोळे,श्री कुलकर्णी,श्री पाखले,सौ आपटे , सौ शिंदे या जागृक नागरिकांचे... आणि तेवड्याचं कार्यतत्पर देणे काम करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाचे.
सर्वांनाही येते आहे त्यावर उपरोक्त नागरिकाने सांगितले सर्वांनाच पाणी आहे मॅडम पण कोणी बोलणार नाही कारण मी येतोय ना मग वाहून घालवतील पण सांगणार नाही. सौ पवार यांनी पाणीपुरवठा विभागात फोन केला श्री संदीप सावंत यांना यासंदर्भात माहिती दिली त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी माणूस पाठवतो असे सांगितले कर्मचारी लगेचच त्या ठिकाणी पोहोचले सबंध पेठेला पाणी चालू होते निव्वळ पेटलाच नव्हे तर 2...3 पेठा पाणी सुरू होते. एक तासाभराने संदीप सावंत व खुदाई करणारे कर्मचारी श्री घाडगे यांचा फोन नगरसेविका सौ पवार यांना आला आणि त्यांनी आभार मानले कारण काम करणार्या कर्मचार्याने सांगितले. मॅडम काल रात्रीपासून आम्ही पहाटेपर्यंत फिरत आहोत गुरुकुल टाकी काहीकेल्या भरली जाईना आता जर ती भरली गेली नसती तर उद्या बऱ्याचशा भागात ना पुन्हा पाणी आले नसते आणि जो पर्यंत प्रॉब्लेम कळत नाही तोपर्यंत पाणी मिळाले नसते. आम्ही आत्ता एक भाग खोदायला घेणार होतो पंच्याहत्तर हजाराचा वोल्व ऑर्डर दिली आता खुदाई करत वाल आणि पाईप नव्याने टाकायचे साधारण दोन लाख रुपये गेले असते आणि लोकांना पाणी मिळाले नसते ते वेगळेच तुमच्या एका फोन मुळे नक्की काय घोटाळा झाला ते कळलं. तुमचा फोन अगदी देवासारखा आला असे म्हणत श्री घाडगे यांनी मनःपूर्वक आभार मानले तर एमजीपी च्या साहेबांना तुमच्याकडे पेढे घेऊन पाठवतो आभार मानत पाणीपुरवठा विभाग अधिकारी श्री संदीप सावंत यांनी आवर्जून सांगितले नगरसेविका सौ सिद्धी पवार यांनी माझ्यापेक्षा जास्त आमच्या जागृत नागरिकांचे आभार माना असेही सांगितले
