Siddhi Ravindra Pawar

Others

4.0  

Siddhi Ravindra Pawar

Others

शुभ आरंभ

शुभ आरंभ

9 mins
158


गेले कित्येक वर्ष आमच्या गुरूंच्या कृपेने कुंडलिनी शक्ती जागृती व त्या माध्यमातून अनुभवास आलेले वेगवेगळे विद्या आणि त्या संदर्भातील विषय हे या माध्यमातून या ठिकाणी मांडायला मिळणार आहेत त्याबद्दल स्टोरी मिरर चे सर्व प्रथम धन्यवाद.

खरंतर सांगण्यासारखे खूप काही आहे पण हा लिखाणाचा उपद्व्याप याकरिता की लोकांना रंग त्यांचे आपल्या शरीरावरील कळत नकळत होणारे परिणाम व बदल, शरीरातील चक्रांवर ती होणारे बदल आणि त्यामुळे आभा मंडलात होणारे बदल इत्यादी आपल्याला कळावे आणि माझ्या माध्यमातून गुरूंची मला दिलेली वैशिष्ट्यपूर्ण देणगी आपल्या पर्यंत पोहोचला ही इच्छा. पण इतक्या छोट्याशा कालावधीत इतके सारे कळणे अशक्य असले तरी थोडक्यात त्याविषयी लिहायला सुरुवात करत आहे.

 कुंडलिनी जागृतीच्या माध्यमातून मला आलेले अनुभव मी या ठिकाणी आपल्याबरोबर कथा या स्वरूपात शेअर करत आहे. समाजा मध्ये काम करत असताना बरेच लोक वारंवार भेटत असतात आणि काही लोक नव्याने मला भेटत असतात. समाज कार्य करत असताना सुद्धा अध्यात्मिक स्वतःचे अस्तित्व सातत्याने उजळत राहण्यासाठी साधना अविरत चालू आहे. अशावेळी बऱ्याचदा काही अनुभव येतात.


असेच एक दिवस मी घरी येत असताना मला रत्यात माझ्या जुन्या परिचित ग्रुप मधील महिला भेटली. खरतर तिला मी ओळखत होते पण तिचे नाव लक्षात नव्हते.(सदर ठिकाणी नाव बदलून टाकत आहे) तिने हाक मारली आणि जागेवर टुविलर थांबवली. लगेचच तिचा पुढचा प्रश्न होता ओळखलं का मी अमूक आमच्या गावामध्ये राहत होते आणि तुमच्या ******या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये मी होते. एवढे बोलणे ऐकून मला लगेच आठवले. खयाली खुशाली विचारून झाल्यावर मी तिथून पुढे निघाले.पण ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीचा अभ्यास करू लागता किंवा एखादी गोष्ट शिकत असता किंवा तुम्हाला एखादी गोष्ट ज्या वेळेला आत्मसात होते, तुम्ही त्या अभ्यासाचे पॅरामीटर्स सर्वत्र वापरत असता. खरंतर हे सारे अनुभव खूप जुने आहेत. जशी तुमची विद्या प्रगल्भ होते तसे तुम्हाला इतरांकडे बघताना तुम्ही ते पॅरामीटर्स बाजूला ठेवता. आणि तेव्हाच तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला अतःपासून ईती पर्यंत स्वीकारता येते. असो... तर त्या महिलेला म्हणजे मनीषाला (नाव बदललेले आहे) भेटल्यावर मला एक गोष्ट जाणवली तिच्या आभामंडलामध्ये काहीतरी अस्वस्थता जाणवत होती. ज्यामुळे मला अस्वस्थ वाटले होते. मी घरी आले जेवण खान झाले आणि दुपारी चारच्या सुमारास मी तिला फोन केला. आणि असंच इकडचे-तिकडचे पुन्हा बोलू लागले. थोड्या वेळातच तिचा आवाज असा जडावल्या सारखा वाटू लागला आणि ती अचानक बोलली "ताई तुम्हाला भेटायचं.. कधी येऊ..?"मी पण लगेच विचारले "का हो?आज तर भेटलो होतो. काय काम आहे. काही महत्त्वाचा आहे का? फोनवर सुद्धा सांगितलं तरी चालेल. तेवढ्यासाठी एवढ्या लांबून कसे येणार तुम्ही?"त्यावर जरा कापर्या आवाजात ती म्हणाली "ताई कुठे पण येईन, पण तुमची भेट घ्यायला पाहिजे... असं माझं मन म्हणतय..."त्या बोलण्यातून मला नक्कीच कळले होते की नक्कीच ती अडचणीत होती. मी तिला लगेच सांगितले "मग,कधीही या येण्याच्या आधी अर्धा तास मला फोन करा मी थांबेन"त्यावर बिचारीने पुन्हा विचारले "ताई कुठे येऊ? ऑफिस कुठे आहे?"त्यावर मी हसतच उत्तर दिले "ऑफिस टाकून लोकांना बोलवणे इतकी मी मोठी नाही. मी जिथे तेच माझं ऑफिस, नाही तर कोणीही मला घरी येऊन भेटावे काही अडचण नाही. आणि तुम्ही तर माझ्या मैत्रिणीची मैत्रीण म्हणजे माझी पण मैत्रीणच की!.. या कधी पण घरी फक्त येण्यापूर्वी फोन करा म्हणजे मी थांबेन." माझ्या या बोलण्याने तिला बराच धीर आला होता तिने लगेचच बोलून दाखवले "ताई खूप बरं वाटलं तुमच्याशी एवढं सुद्धा बोलून." यावर मी बोलले"काही टेन्शन घ्यायचं नाही सर्व काही ठीक होईल भेटू आपण" आणि मी समाधानाने फोन ठेवला. माझे समाधान दोन प्रकारे झाले होते. एक म्हणजे माताजीं च्या कृपेने मला समोरच्या व्यक्तीची अस्वस्थ परिस्थिती जाणवेल असा परमेश्वराने अभ्यास करून घेतला होता. त्याचे समाधान. आणि दुसरे म्हणजे फोन वरून का होईना आपण एखाद्याला आधार देऊ शकलो, समोरच्याचे संकट काय आहे? माहित नाही पण सर्व काही ठीक होईल ही गोष्ट समोरच्याला आपण सांगू शकलो. आणि त्याला आधार वाटला. याचे दुसरे समाधान वाटत होते.


दोन दिवस गेले असतील आणि मनीषावहिनीं चा मला फोन आला. मी दुपारी फोन आल्याने उचलला होता.मी नुकतेच बाहेरून घरी आले होते. त्या म्हणाल्या "ताई घरी आहात का साताऱ्यात आले आहे भेटायचे आहे."मी त्यांना सांगितले हो मी घरातच आहे आता. आत्ता आले आहे. कधीही या." माझे एवढे बोलणे ऐकून त्यांनी आभार मानून फोन ठेवला. मी सुद्धा तातडीने आवश्यक असलेली सर्व कामे उरकून घेतली. अर्ध्याएक तासातच घराची बेल वाजली. मी त्यांना लोकेशन तीन दिवसांपूर्वीच व्हाट्सअप ला सेंड केले होते. त्यामुळे त्याच असाव्यात म्हणून दार उघडले. खरोखरच दारात मनीषा वहिनी उभ्या होत्या. एकट्याच होत्या. मी त्यांना आत येण्यास सांगितले. पाणी दिले आणि इकडच्या तिकडच्या गप्पा आमच्या चालू झाल्या. काही वेळातच मी त्यांना चहा करते म्हणून सांगितले. तर त्यांनी लगेच मला थांबवले आणि म्हणाल्या नको "ताई तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे. चहा प्यायला परत कधीतरी येईल." हे ऐकून मी सुद्धा काही न बोलता शांत बसले. आणि त्यांना म्हणाले "सांगा आता काय काम आहे?"त्यांनी सांगायला सुरुवात केली.(जे त्यांनी मला सांगितले ते याठिकाणी पूर्ण न लिहिता थोडक्‍यात मतितार्थ लिहीत आहे) त्या बिचाऱ्या खूपच अडचणीत होत्या. त्यांची अडचण म्हणजे तिला सर्व काही असूनही समाधान नव्हते. तिला एक प्रकारची असुरक्षितता कायम वाटत असायची. असे तिचे म्हणणे होते आणि आता तर तिला वाटत होतं की या आयुष्याचा काहीही उपयोग नाही आणि असं बरंच काही. सगळं सांगत असताना तिने मला तुम्ही अग तू ग म्हणा हेही सांगून टाकलं. खरंतर तिच्या सारखी सुंदर हुशार पेशाने शिक्षक झाली तर शिक्षक नाही तर एखादी अगदी चांगली गृहिणी 100% होणार यात शंका नाही पण तिला असं का होत होतं हे तिला काही केल्या कळत नव्हतं. त्यातून ती एका मानसोपचार तज्ञांकडे गेली तर तिला सासरचे लगेचच वेडी म्हणून त्रास देऊ लागले. कशीबशी ती या परिस्थितीला हाताळत होती. त्यातही नवरा आणि मुले काही म्हणत नव्हती पण गोतावळा मात्र तिची चेष्टा करत होता आणि त्यामुळे ती या सगळ्याला कंटाळली होती. तिला काही केल्या रस्ता दिसत नव्हता. तिला मैत्रीणी असूनही ती कोणालाही हे काहीही सांगू शकत नव्हती कारण मार्ग दाखवणारे खूप कमी असतात माघारी बोलणारे जास्त असतात असेही ती वारंवार सांगत होती मला खरोखर तिच्याबद्दल वाईट वाटले मी तिला विचारले "ठीक आहे. पण तुला माझ्याशी हे सारं काही बोलावेसे का वाटले? मी तर डॉक्टरही नाही"त्यावर ती म्हणाली "मला डॉक्टर नको ताई. मला कोणता आजार नाही... मला आधार हवाय. मला जी भीती वाटते कशाची वाटते कळत नाही. तो शोध हवाय मला. असं जगायचं नाही. जगायचं असेल तर मला अगदी माझं जसं आयुष्य आहे, सुखासमाधानाचे तसेच जगायचे आहे."

आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. तिची ही अवस्था बघून मी तिला विचारले "तुझा देवावर विश्वास आहे का?"त्यावर तिने लगेच उत्तर दिले "हो ताई मी खूप देवाचं करते.." आणि मला हे उत्तर ऐकताच हसू आले. मी हसतच तिला म्हटले "आपण कोण देवाचे करणार? देवच आपलं करत असतो."त्यावर ती शांतपणे विचार करू लागली. मी उठले तिला ग्लासभर पाणी दिलं आणि चहा टाकला. चहा उकळणे चालू होते मी शांत होते ती ही शांत बसली होती चहाचा वास सगळीकडे सुटला मी चहा गाळू लागले आणि तशी ती इतकी शांतता मध्येच भंग करत म्हणाली "बरच हलकं वाटत आहे."


चहाचे दोन कप घेऊन मी हॉलमध्ये आले. टेबलावरती चहा ठेवला आणि ती बसली होती तिथून काही अंतराने वर मी बसले आणि माताजींना नमस्कार केला. थोडावेळ तीला शांत बसण्याची खूण करून. मी तिच्या शरीरातील चक्रांची संतुलित आणि असंतुलित आवस्था माझ्या हातावरती पाहू लागले. तर असं विशेष करून पाहणे होत नाही. पण तिचा प्रश्न हा तिच्या मनाशी निगडीत तर होताच पण तिच्या वास्तविक जीवनाशी ही असंबंधित होता. वास्तविक दृष्ट्या सुखी असलेल्या तिला आत्महत्येचा विषय मनात येणे म्हणजे आश्चर्यजनक होते. काही वेळानंतर मी माझी साधना आवरती घेतली आणि तिने तिचा चहा संपवला होता. माझा चहा आता बऱ्यापैकी मला लागतो तसा गार झाला होता. साधना संपवून नमस्कार करून मी चहाचा कप हातात घेतला. तशी ती लगेचच अगदी गडबडीने मला म्हणाली कळलं का काही काय वाटते तुमचा यावर खूप अभ्यास आहे असं माझं मन म्हणत. मला काही बाहेरच झालं नाही ना.... तिने हा प्रश्न विचारला बरोबर मला हसू आवरेना आणि मी तिला म्हणाले "बाहेरच कशाला होईल ग? तुझ्या शरीराचच तुला झाले आहे."या उत्तराने काहीशी ती सुधा आता मनमोकळी हसली. चेहऱ्यावरचे हसू बघून मलाही समाधान वाटले आणि मी त्यावर म्हणाले "आत्ताशीक मला बरं वाटतं बघ आता तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं."तशी ती म्हणाली "आज खूप दिवसांनी खूप हलकं हलकं वाटतयं. एकदम जड जड शालू,कपडे काढून ठेवावेत आणि गाऊन मध्ये यावं तेव्हा शरीराला कसं वाटतं... तसंच काहीसं मनाला वाटतेय."तिच्या या बोलण्याने मला खरंच बरं वाटले. पुन्हा तिने विचारले "असं नेहमीच वाटण्यासाठी काय करावे लागेल. काहीतरी उपाय तरी सांगा."मग मी तिला चहा पीत पीत सांगायला सुरुवात केली. "शरीरामध्ये सात चक्र आहेत आणि या सात चक्रांना वेगवेगळे कलर आहेत. ही सातही चक्र आणि त्यांची उपचक्रे संतुलित असली की बरेचसे व्याधी होत नाहीत आणि बरेच आजार दूर होतात असे आमच्या गुरु सांगतात आणि तो माझ्यासारख्या बर्‍याच शिष्यांना अनुभव ही आहे‌. या सातही चक्रामधील सर्वात मूळ असे असलेले मूलाधार चक्र आणि त्याचा रंग लाल आहे. मूलाधार चक्र हे शरीराचे भावनिक आणि व्यवहारिक संबंध संतुलित ठेवत असतात. तुझ्या बाबतीत बोलायचे झाले तर तुझ्या शरीरातील आभा मंडलात लाल रंग अत्यंत अल्प स्वरूपात आहे. तुझे हे चक्र अतिशय असंतुलित झाले आहे. यावर उपाय एकच जास्तीत जास्त लाल रंगाचा वापर करायचा. आहारातही आणि विहारातही लाल रंगाचा वापर करून आपण आपले चक्र काही प्रमाणात संतुलित करू शकतो. त्याचबरोबर लाल रंग हा शुभ गोष्टींचे प्रतीक मानले जाते. तसेच कोणतेही आरंभीचे कार्य करताना कुंकू मासा म्हणजे लाल रंगाचा वापर केला जातो त्यामुळे कोणत्याही कामाचा शुभारंभ हा लाल रंग दर्शवत असतो. उत्साहाचे प्रतीक लाल रंग आहे तर उष्णतेचे प्रतीकही लाल रंगाच आहे. यामुळे हा रंग विशेष करून तुझ्या सातत्याने वापरात येणे गरजेचे आहे. तुझा हा जो प्रॉब्लेम आहे तो तू सातत्याने सात दिवसात अजून काही उपाय मी व्हाट्सअपला टाकेन त्यानुसार केलेस की कमी होईल अशी आशा वाटते. खरंतर माणसाच्या शरीरात सर्व रंगाचे संतुलन नसेल तर असंतुलित पणा येत नाही म्हणूनच जो रंग तुझ्या संतुलन ना मध्ये कमी आहे तो रंग तुला वापरला पाहिजे."माझे हे बोलणे ऐकून ती अगदी आश्चर्याने माझे शब्द न शब्द चातकाप्रमाणे कानात साठवत होती. मी बोलायचे थांबले त्यावेळेला ती अगदी आनंदाने आणि समाधानाने म्हणाली "ताई काय पाहिजेल ते मी करेन. फक्त रंग वापरल्याने माझ्या मनाचा प्रॉब्लेम जर कंट्रोलमध्ये येणार असेल तर मी खूपदा लाल रंगाचा वापर करेन. मला खरं वाटत नाहीये की या गोष्टी ने काही फरक पडेल म्हणून. पण तुम्ही एवढे विश्वासाने सांगत आहे मी इतकं सारं केलंय हेही करुन बघते." त्यावर मीसुद्धा तिला सांगितले "हे बघ माझ्यावर विश्वास ठेव आणि हेकर आणि एक गोष्ट लक्षात ठेव जास्तीत जास्त जमिनीवर बस जमिनीशी थेट संपर्क कसा येईल त्याकडे भर दे. बाकी मी काय एक माध्यम आहे परमेश्वराला जे वाटत आहे ते मी तुझ्यापर्यंत पोहोचवले आहे. माझ्यापेक्षा जास्त विश्वास देवावर ठेव आणि निश्चिंत रहा."त्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या जाताना ती अगदी खरंच खूप आनंदी वाटत होती. तिला टाटा बाय बाय करून दार लावल्यावर मला सुद्धा खूप समाधान वाटले. परमेश्वराने माझ्या हातून त्या दिवशी जी सेवा करवून घेतली याबद्दल मला खूप खूप समाधान वाटत होते. मी मनीषाला व्हाट्सअप वर अजून काही गोष्टी सांगितल्या होत्या ज्या कलर्स बॅलन्स संदर्भात होत्या. त्यानंतर बरेच दिवस होऊन गेले. कदाचित 15 ते 20 दिवस आणि त्याहीपेक्षा जास्त झाले असावेत. अचानकच तिचा फोन आला. आणि आता तिच्या आवाजातिल बोलण्याचा वेग भाव खूप बदललेला होता. ती आवाजातून सुद्धा आनंदी वाटत होती. त्या आनंदात तिने मला विचारले मला इतका फायदा झालाय सांगू का की मी बोलू शकत नाही पण मला माझ्या बहिणीसाठी तुमच्याकडे यायचं आहे आता मात्र मी बुचकळ्यात पडले कारण मी तुला आधीच सांगितले होते मी फक्त तुला हे सारे काही सांगेन तू कोणालाही सांगायचे नाहीस आणि कोणीही माझ्याकडे आणायचे नाही तरीही तिने पुन्हा पुन्हा मला विचारले सांगा ना कधी घेऊन येऊ आणि मी मात्र शांत निशब्द फोन कानाला लावून मनातल्या मनात हसत होते...." आणि परमेश्वराचे आभार मानत होते की अशी आगळीवेगळी शरीर रुपी आत्म्याची सेवा माझ्याकडून परमेश्वर करवून घेत आहे.

समाप्त....


Rate this content
Log in