Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3.3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

प्रेमकथा

प्रेमकथा

2 mins
3.5K


प्रेमाचे दोन प्रकार असतात. त्यातील पहिला प्रकार स्वार्थी प्रेम. दुसरा प्रकार आहे हृदयातील प्रेम. स्वार्थी प्रेमात माणूस निरर्थक वाहत जातो. त्याला समोरच्या व्यक्तीवर ठाम विश्वास असतो. परंतु ते आपले आयुष्य उध्वस्त करते. शारीरिक, मानसिक बदल होतात. माणूस फक्त शब्दावर जगत असतो. त्यात विश्वास, प्रेम, ह्रदय नसते. नैराश्य वाट्याला येते. एकतर्फी प्रेम जीव देते किंवा जीव घेते. परंतु असे आयुष्य न जगता त्यावर विस्मरण करणे काळाची गरज आहे. त्यासाठी झुरत बसणे म्हणजे आयुष्यातील सोनेरी क्षण गमावून बसणे होय. आर्थिक, सामाजिक, नैतिकता संपणे होय. समोरची व्यक्ती आपल्याला त्यात फसवू शकते. मानसिक गुलाम समजू लागते. ज्यात तुम्हाला व तुमच्या विचाराला किंमत नसते.

यात तो आपले मानसिक संतूलन हरवतो. आयुष्य देशोधडीला लावतो. ह्यासाठी अशा गोष्टींपासून लांब राहणे योग्य आहे. जीवन समृद्ध बनवा. उत्कर्ष करा, स्वतः विकसित होण्यासाठी तरुणानी अशा फसव्या प्रेमापासून दूर राहवे. मग प्रेम कुणावर करावे ? तर प्रेम व्यक्तीच्या विचारावर, उच्च शिक्षणावर, गुणावर, कष्टावर, विश्वासावर, बुद्धीवर करावे. त्यातून योग्य मार्ग निघू शकतो. हळू हळू प्रेम वाढू लागते. विकास दोघांचाही होऊ शकतो. प्रेम करताना त्याची व तुमची वैचारिक पातळी तपासा. नाहीतर आयुष्यात घाईचा निर्णय डोकेदुखी ठरू शकतो. हृदयातील प्रेम तुमच्या प्रामाणिकपणे सुख दुःख जाणते. आयुष्यभर साथ देते. गरीबीत आधार, सहारा असते. प्रेम ही कृत्रिम अवस्था नसून ती नैसर्गिक आहे. म्हणून कृत्रिम प्रेमात न पडता खऱ्या, नैसर्गिक प्रेमात पडणे योग्य आहे. कृत्रिम प्रेमात कधीच पश्चाताप करू नये. आनंदी जीवन जगावे. स्वास्थ्य टिकवावे. कारण सिर सलामत तो पगडी हजार.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational