प्रेमाची अग्नी परिक्षा
प्रेमाची अग्नी परिक्षा
एका साधारण परिवाराचा घरप्रमुख हा एक सरकारी कर्मचारी होता. तसे त्याचे पूर्वज मूळात शेतकरीच होते. पन पिढ्या-दर-पिढ्या आर्थिक परिस्थिति डामाडोल होत गेल्यामुळे शेती विकण्यात आली होती आणि कौटुंबिक वाटण्यामुळे ती सारखी घटतच गेली होती. शेवटी तो अल्प-भूधारक भूमिपूत्र झाला होता. तो आपली शेती मक्त्याने किंवा बटईने आळी-पाळीने देत होता. त्या घरधन्याला तीन अपत्य होती. मोठा मुलगा शिक्षणात हुषार होता. त्याने इंजिनिअरिंग करुण लगेचच सरकारी नौकरी मिळवली होती. मुलगा कर्तबगार, जवाबदार झाल्यामुळे आई-वडिल अत्यंत हर्षित झाले होते. त्यांचा आनंदा गगणात मावेनासा झाला होता. मुलाची तैनाती एका दूर्गम साधारन शहरात झाली होती. तो तीथे किरायाने एका मकानात राहत होता. त्या मकान मालकाला दोन अतिशय सुंदर, देखण्या, निपुण आणी शिक्षणात हुषार अशा मुली होत्या. संपर्क वाढल्यामुळे त्या इंजिनिअर मुलाला मोठ्या मुलीशी प्रेम झाले होते. मुलगा खटयाळ व कमाऊ असल्यामुळे त्या मुलीला पण तितकेच त्याच्या विषयी आकर्षण होते. तीच्या आई-वडिलांची पण प्रेम संबंधाला मुक सम्मती होती. जेव्हा मुलाने त्या मुलीचा प्रस्ताव आपल्या आई-वडिलांन कडे ठेवला होता. तेव्हा त्याच्या आई-वडिलांचे हात-पाय फुगले होते, कराण ती मुलगी उप-जाती मधे सर्वात निम्म तर मुलगा सर्वात उच्च उप-जातीचा त्या विशिष्ट समाजात होता. पण त्या काळात उप-जातीत पण धार्मिक संस्कारामुळे अंतर-उपजातीय विवाहला मान्यता नव्हती. त्याच्या आई-वडिलांच्या अपेक्षा फार उंचावल्या होत्या. त्यांना आपल्याच समाजातील चांगल्या नावाजलेल्या घरांनदार घराण्याशी संबंध जोड्यावयाचे होते. जर त्यांनी या लग्नाला सहमती दिली असती तर त्यांची समाजात आणी नातेवाईकामधे थु-थु होणार होती. म्हणुन त्यांनी हा प्रस्ताव टाळण्याचा प्रयत्न केला होता. पण ,जब मियां बीबी राजी, तो क्या करेगां काजी ?. मुलाने अट्टाहास धरला होता कि तो फक्त आणि फक्त तीच्याच सोबत लग्न करिल अन्यथा कुठेही लग्न करणार नाही !. आई-वडिलांच्या लक्षात आले होते कि दिल लगा गधी से तो परी क्या चीज ?. शेवटी त्यांनी मुला समोर हात टेकले होते. कारण त्याने तशी सिंहगर्जना केल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी जास्त आजा-गाजा न कर्ता सिमित वराड्यांच्या उपस्थितित लग्न लावून दिले होते. तरी ती बातमी वा-यासारखी सर्वत्र समाजात पसरली होती आणि तो एक सार्वजनिक चर्चेचा विषय समाजात बनला होता.
जरी त्या कुंटुंबाचा सामुहिक तिरस्कार, निंदा व उपहास होत होता. तरी नविन जोडपे आपला राज-राणीचा संसार थाटत करीत होते. हे पाहुन त्याचे आई-वडिल खुश होते. मुलगा इंजिनिअर असल्यामुळे त्याचा संबंध विभागाच्या अनेक ठेकेदारांशी सारखा येत होता.ते ठेकेदार त्याला आपले काम काढण्यासाठी घूस देत होते. सुरुवातीला ते त्याला पटत नव्हते. मग त्याला ते ठेकेदार भेट वस्तु देत होते. अशीच एक भेट वस्तु सर्व ठेकेदारांनी मिळुन, त्याला एक प्लॉट त्याच्या लग्नात भेट वस्तु म्हणुन दिला होता. आता त्यांचा संसार रंगात आला होता. त्याला एक मोठा मुलगा आणि एक मुलगी पण होती. त्यांनी एक शानदार शहरात बंगाला बांधण्याचे धाडस केले होते. त्यासाठी तो चांगलाच कर्जबाजारी झाला होता. उंच जीवनशैलीमुळे घरखर्च अनाप-शनाप वाढला होता. त्याला आधीच घूस खाण्याची सवय जडली होती. आता त्याची घूस खाण्याची भूक फार वाढली होती. त्यामुळे तो घूस खाण्यासाठी निर-निराळे हथकंडे वापरु लागला होता. त्यामुळे त्याच्या विरुध्द अनेक तक्रारी सारख्या प्रधान कार्यालयत येत होत्या. त्याच्या रोजच्या कार्यातही ब-याच अनियमितता सारख्या वाढत होत्या. या सर्वांच्या चौकशीसाठी कार्यालने एक उच्च समितीचे गठण केले होते. त्या समितीच्या अवहाला वर कार्रवाई करुण त्याच्या वर चार्जशिट दाखल करण्यात आली होती. आणी त्याला निलंबित करण्यात आले होते. तरी कार्यालयाने त्याला आपला पक्ष ठेवण्याची संधी दिली होती. त्याच्या वर लावलेल्या आरोपावर त्याला स्पष्टिकरण मागण्यात येत होते. सुरुवातीला काही आरोंपांचे स्पष्टिकरण त्याने कार्यालयाला दिले होते. पण कार्यालय त्या वर पुन्हा काही चौकशी करण्यासाठी सारखी आरोपांची झड लावत होती. त्याला कंटाळुन त्याने त्याचे स्पष्टिकरण देने थांबवले होते. त्या अवधीतच त्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. त्या व्यवसायात त्याला भरपूर यश मिळत होते.
जेव्हा त्याच्या वडिलांना माहित झाले कि त्याला कामावरुन निलंबित करण्यात आले होते. आणि कार्यालयाच्या आरोपांचे त्याने उत्तर देने बंद केले होते. यामुळे आपला मुलगा समोर अडचणीत येवु शक्तो !. कदाचित त्याला भ्रष्टाचार केल्यामुळे जेलपण होवु शकते !. आलेल्या भोगाशी असावे सादर, म्हणुन ती संपूर्ण केस त्याच्या वडिलांनी आपल्या हाती घेतली होती. वडिल या कार्यात फार निपुन होते. पत्रा द्वारा आलेल्या सर्व आरोपांचे ते त्याच्या सही ने त्या कार्यालयाला प्रत्यक्ष न पाठवता त्याचा रेकार्ड एका फाईल मधे सुरक्षित ठेवत होते. त्याच्या पालकाने त्यासाठी एका डाकघरच्या कर्मच्या-याशी साठं-गाठं केली होती. ते प्रत्येक कार्यालयाच्या पत्राचे उत्तर साधारन डाकने पाठवले होते. यासाठी एका पर्ची वर अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग वर पोस्टाचे तारिख असलेले सिल लावुन घेत होते.पण ते पत्र कधीच डाक मधे जात नव्हते. अशा प्रकारे कार्यालयांचा आलेल्या सर्व पत्रांचे उत्तर देत होते. हा सर्व रेकार्ड त्यांनी जपुन ठेवला होता. पण कर्यालयाला त्यांच्या कोणत्याच पत्राचे उत्तर मिळत नव्हते. शेवटी कार्यालयाने त्या इंजिनिअरला कामावरुन काढण्यात आले होते. असा त्याला कार्यालयीन आदेश पाठवला होता. तसा आदेश प्राप्त होताच इंजिनिअरच्या वडिलांनी मुलाच्या वतीने एक याचिका कोर्टात दाखल केली होती. त्या कोर्टात टाकलेल्या केस मधे याचिकाकर्तावर संबंधीत कार्यालयाने लावलेल्या आरोपांची त्रुटिपूर्ण चौकशी केली होती. आणि याचिका -कर्त्याला आवश्यक नियमानुसार आपले स्पष्टिकरण देण्याची संधी दिली नाही असे नमुद केले होते. जेव्हा ही केस न्यायाधिशाकडे कोर्टात सुनावनीसाठी आली होती. तेव्हा न्यायाधिशाने कार्यालयाला विचारले की संबंधीत अधिका-याला स्पष्टिकरण देण्याची संधी कां दिली नाही ?. त्यावर कार्यालयाने लावलेल्या आरोपांची पत्रके न्यायाधिशाला त्यांच्या वकिलाने सुपूर्त केली होती. आणि सांगितले कि संबंधीत अधिका-या तर्फे स्पष्टिकरण प्राप्त झाले नव्हते. तेव्हाच याचिकाकर्ताच्या वकिलाने न्यायाधिशाला संपूर्ण आरोपांची स्पष्टिकरण पाठवल्याचे कागद पत्र पुराव्यानीशी दाखवले होते. आणी त्याने आरोप लावला की कार्यालचा आवाक-जावक कर्मचारी हा लापरवाह असल्यामुळे कार्यालयाला स्पष्टिकरण प्राप्त झाले नसावे. यात त्याचा पक्षाकाराचा काय दोष आहे ?. शेवटी कार्यालयाने दलील दिली की हे सर्व व्यवहार कार्यालयाला पंजीकृत पत्रा द्वारे करायला पाहिजे होता. तेव्हा याचिकाकर्ताच्या वकिलाने दलील दिली की त्याचा पक्षाकार हा निलंबित होता. त्याची आर्थीक परिस्थिती फार बिकट झाल्यामुळे त्याने आपल्या तर्फे सर्व पत्रांची उत्तरे अंडर सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग ने अधिक खर्च करुन पाठविली होती. जर ती सर्व स्पष्टिकरणांची पत्रके ट्रांझिट मधे किंवा अंतिम टोकाला हरवली असतील तर त्यात त्याच्या पक्षाकाराचा चुकी कुठे होती !. शेवटी सर्व पुरावे पक्षाकाराच्या बाजुने असल्यामुळे न्यायाधिशाने कार्यालयाला फटकार लावली होती, आणी त्याला निलंबित केलेल्या तारखे पासुन कामावर पुन्हा बहाली करण्याचे आदेश दिला होता.
आदेशाप्रमाने त्याला पुन्हा कामावर घेण्यात आले होते. आणी त्याला संपूर्ण निलंबन तीथि पासुन तर पुन्हा बहालीच्या तिथि पर्यंतचा नियमाप्रमाने पगार मिळाला होता. त्याने स्वतःचा धंदा सुरु केला होता म्हणुन त्याने काही महिण्यानंतरच स्वैच्छिक सेवानिवृती घेतली होती. त्याला सेवानिवृत्ती वेतन पण मिळत होते. हे सर्व चांगले होत असतांना त्याच्या लाडक्या हुषार मुलाचा मोटसायकलने भयंकर अपघात झाला होता. त्यात त्याच्या मेंदुला भयंकर इजा झाली होते. ब-याच ठिकानी आणी अतोनात पैसा खर्च केल्यानंतर तो काम-चलाऊ ठिक-ठाक झाला होता.
जवान भावा सोबतची आई-वडिलांची पिडा बघुन त्याच्या बी. डी. एस झालेला बहिणीने एका इंजिनिअर मुला सोबत आई-वडिलांना न सांगता लग्न करुन विदेशात निघुन गेली होती. कदाचित तीला कुंटुंबाच्या वेदना असाहय झाल्या होत्या. आता संपूर्ण कुंटुंब अधिकत्तम काळ हा साईबाबा शिर्डीच्या सेवेत देत होते. त्यांना बाबा कडुन काही चमत्काराची आशा कदाचित होती. बाबा काही चमत्कार करतील आणी त्यांच्या साईभक्ति वर प्रसंन्न होवुन त्यांचा मुलगा पूर्वत सारखा होईल हीच आशा कदाचित असावी !. हे सर्व दोन युगल प्रेमी सोबत जे घडले होते. कां ती त्यांच्या ख-या प्रेमाची अग्नी परिक्षा तर नव्हती ?.
