Nilesh Bamne

Romance

3  

Nilesh Bamne

Romance

प्रेम

प्रेम

10 mins
2.8K


दोन मित्र विजय आणि रमेश चर्चा करत असतात आज त्यांच्या चर्चेचा मूळ विषय प्रेम हा असतो...

रमेश : अरे ! विजय एक एकोणविस वर्षाची मुलगी माझ्या प्रेमात पडली आहे काय करू काही कळत नाही यार माझं तर लग्न करून पोर काढण्याच वय आहे या वयात मी तिच्या प्रेमात पडू ? तू बोलतोस ते मला आज पटतंय प्रेमात पडायला वय ही मर्यादा कधीच नसते. कोणत्याही वयाचीव्यक्ती कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते.

विजय: अरे ! मग ! चांगलच आहे ना ? वय ही जर तिची अडचण नसेल तर तू कशाला इतका व्यथित होतोयस ? इतका विचार का करतो आहेस ?

रमेश : अरे ! पण या वयातील मुली अल्लड असतात, लहान मुलांसारख्या वागतात.

विजय : नाही मला नाही वाटत तसे सगळ्याच तश्या नसतात काही विचाराने प्रगल्भ असतात. सारासार विचार करूनच त्यास प्रेमात पडलेल्या असतात.

रमेश : तुझ्या कोणी अशी मुलगी प्रेमात पडली आहे का ?

विजय : नक्की नाही सांगता येणार प्रेमात पडली होती कि नाही पण माझी एक वीस वर्षांची फेसबुक फ्रेंड आहे कदाचित मी तिला आवडत असणार ! एकदा ती बसमध्ये फेसबुकवर माझे फोटो पाहून गालात गोड हसत होती. तिला माहीत नव्हते की मी तिच्या मागच्या सीटवर बसलोय ! कदाचित तिने हे जाणूनबुजून केलेले असावे. तिचे माझ्याकडे पाहून हसणे हे प्रेमाने असेल अथवा उपहासाने ! ते सांगता येणार नाही .

रमेश : मला आता खरचं वाटू लागलय लग्नासाठी वय ही काही लग्नासाठी तितकिसी महत्वाची गोष्ट नाही ! तुला काय वाटत ?

विजय : खरं सांगू ! माझ्या खऱ्या प्रेमात पडलेली स्त्री वयाने माझ्यापेक्षा खूप लहान असली तरी मी तिच्याशी लग्न करण्यासाठी फार विचार करणार नाही कारण तो विचार तिने अगोदरच केलेला असेल. तिचा विचार झालेला आहे याचा अर्थ तिची त्याबाबतीत मानसिक तयारी पूर्ण झालेलीआहे.

रमेश : मग काय करू तिच्याबाबतीत पुढे जाऊ का ?

विजय : जाऊ का म्हणून मला काय विचारतोयस ? बिनधास्त जा ! आपल्यावर मनापासून खरं प्रेम करणारी व्यक्ती नशिबाने मिळते. नाहीतर हजारो वर्षापासून फक्त देहाचे देहाशीच मिलन होत आहे. एकमेकांच्या शरीराची आग शांत करणे म्हणजे प्रेम नव्हे ! प्रेमाचा आणि लग्नाचा तसाकाही संबंध नाही. शरीराची आग विजविण्यासाठी एका शरीराची अपेक्षा करणे आणि ते मिळविण्यासाठी अट्टहास करणे म्हणजे प्रेम नव्हे ! प्रेम अमर असते पण माणसाच्या बाबतीत त्याच्या मृत्यू पर्यंत त्याच्या सतत समरणात असेल, जे आठवून त्याच्या मनाला सुख, समाधान आणिशांती मिळेल ते प्रेम !

रमेश : म्हणजे माझ्या तिच्या प्रेमात पडण्यात काहीच पाप नाही ? पण कदाचित ! मला तिच्याशी लग्न नाही करता येणार !

विजय : लग्न करून काय होत ? दोन शरीर हा ! नश्वर शरीर एकत्र येतात. एकमेकांच्या शरीराची आग शांत करतात त्या शांत झालेल्या आगीतून आणखी एक आग जन्माला घालतात. दोन नश्वर देह मिळून आणखी एक नश्वर देह जन्माला घालतात. प्रेम अमर असते दोघांच्या प्रेमाला मिळूनप्रेमाला जन्मास घालता येत नाही.

रमेश : विजय ! बरोबर आहे तुझं माझ्या आई बाबांचा प्रेमविवाह झाला आहे पण मी त्यांच्या प्रेमाची निशाणी आहे असे मला कधीच वाटले नाही.

विजय : बहुदा ते कोणालाच वाटत नाही . मुळात मुलं जन्माला येतात ती प्रेमातून नाही शारीरिक मिळणातून , शरीराच्या भोगातून , त्या भोगातून मिळणाऱ्या तृप्तीतून ! त्या तृप्तीतून जन्माला असलेले मुलं ते कोठे असते तृप्त ?

रमेश : म्हणजे तुझं अस स्पष्ट मत आहे का की आज आपण ज्याला प्रेम प्रेम म्हणून डोक्यावर घेतो ते प्रेम नाहीच

विजय : मी तारुण्यात असताना माझे एका मुलीवर खूप प्रेम होते तिचे ही असावे मी कधी तिला विचारले नाही तिने मला कधी सांगितले नाही पण जगाला का कोणास जाणे ते कळले होते आमच्यात घनिष्ठ मैत्री होती तुच्याशिवाय माझे आणि माझ्याशिवाय तिचे पानही हलत नसे मी प्रत्येकव्हॅलेंटाईन डे ला तिला सोबत घेऊन जायचो आणि एक शुभेच्छापत्र विकत घ्यायचो पण तिला ते कधीच दिले नाही तिनेही कधीच मला विचारले नाही ते कोणाला देणार ? हे असेच सात आठ वर्षे चालले तिच्यासोबत लग्नाची संधी मी नाकारली तेव्हा ती मला कारण वाटत होती आता नाहीवाटत तीच लग्न झालं तिला मुलं झाली पण आमच्यातील नात्यातील प्रेम आणि गोडवा आजही तसाच आहे त्यात काडीचाही बदल झालेला नाही आजही माझ्याशी बोलताना तिचा उत्साह ओसंडून वाहत असतो, माझंही काही वेगळं नाही आमच्या प्रेमाला नातं नव्हतं पण आमचं प्रेम मात्रतेथेच होत ते तेथेच राहणार होत कारण ते शारीरिक आकर्षणा पलीकडचं होत आम्ही दोघे ठरवूनही एकमेकांचा तिरस्कार करू शकत नव्हतो.

रमेश : तू नशीबवान आहेस ! पण माझ्या आयुष्यात ज्या ज्या आल्या होत्या त्या साऱ्या शारीरिक आकर्षणाच्या भुकेल्या होत्या भौतिक सुखात गुंतणाऱ्या होत्या.

विजय : आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्याचा भाग होण्यासाठी धडपडत असेल तर आपण फार तानू नये जस मी तानला ! जगाचा त्याच्या नियती नियमांचा फार विचार करण्याची काही गरज नसते.

रमेश : विजय ! खरं सांगतो मला कोणताही निर्णय घेताना जितका त्रास होत नाही त्यापेक्षा अधिक त्रास लग्नाचा निर्णय घेताना होतोय ! माझ्या एका मित्राचं वर्षापूर्वीच लग्न झालं होत तो घटस्फोट घेतोय कारण त्याच लग्न त्याच्या मनाविरुद्ध आई वडिलांच्या दबावाखाली फक्त वय सरतयम्हणून झाला होता. हे असे होण्यापेक्षा प्रेमात पडून लग्न केलेले बरे ! मला लग्न न करणे सहन होईल पण घटस्फोट कल्पना करवत नाही !

विजय : घटस्फोट झाला तेच बर झालं निदान या पुढचं आयुष्य तो आनंदात सुखासमाधानाने जगेल.

रमेश : मला मुळात एक अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे आपले त्या व्यक्तीवर प्रेम नसताना ही कल्पना सहन होत नाही. लग्न झाल्यावर आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल प्रेम निर्माण करणे आणि त्या निर्माण झालेल्या प्रेमातून त्या व्यक्तीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून मुलांना जन्मदेणे आणि आयुष्यभर बायका पोरांवर आपले किती प्रेम आहे हे भासवत जीवन जगत राहणे. एक दिवस आपल्या जोडीदाराने अचानक आपली साथ सोडणे किती भयानक ! शेवटी कोणी कोणाची आयुष्यभर साथ देत नाही. एकटेपणा माणसाचा पिच्छा मरेपर्यत सोडत नाही. गरीब असो वश्रीमंत, विवाहित असो वा अविवाहित प्रत्येकाला मरण्यापूर्वी एकटेपण हे भोगावेच लागते मग त्याचा बाऊ का करायचा ?

विजय : तेच तर मला कळत नाही ! लोक म्हणतात, लग्न कर नाहीतर तुला आयुष्यभर साथ कोण देणार ? अरे ! पण आपण ज्यांच्याशी लग्न करतो ते आपल्याला आयुष्यभर सोडा किती, किती महिने किती वर्षे साथ देणार आहे हे कोणी सांगू शकतो का ? प्रेम विवाह करणार हीे विवाहानंतरवर्षभरातच कुत्र्या मांजरीसारखे भांडत राहतात. पूर्वी मुलांचा विचार करून लग्ने टाकायची पण आता तसे होताना दिसत नाही. माझ्या आई बाबांचाही प्रेमविवाह झाला होता. पण मला त्यांच्यातील प्रेम कधी दिसलं नाही जाणवलं नाही, मग लग्नापूर्वीच त्यांचं प्रेम काय हवेत विरघळून गेलं ? नवरा - बायकोला पोरं झाली म्हणजे त्यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे असे म्हणण्याला काही कारण नाही. प्रेमावरचा विश्वास उडालेली माणसे म्हणतात आमचा प्रेमावर विश्वास नाही म्हणून आम्ही ठरवून विवाह केला. प्रेमावर विश्वास ठेवायला अगोदर प्रेम कळावं लागत हे यांच्यागावातच नसत. मी माझ्या आजूबाजूला शेकडो तरुण तरुणी पाहिल्या आहेत ज्यांचे एकमेकांवर सात आठ वर्षांपासून प्रेम होते, साऱ्या आणाभाका घेऊन झाल्या होत्या. तरी भौतिक कारणांचा विचार करून दोघे वेगवेगळ्या जोडीदारांसोबत संसार करत होते पण त्या संसारात प्रेम कोठे होते ? होती ती फक्त तडजोड एका देहाने दुसऱ्या देहाशी केलेली.

रमेश : विजय ! तुला आता खरचं वाटत नाही का लग्न करावंसं ?

विजय : खरं संगतो मला माझ्या आयुष्यात लग्न हि गोष्ट जधीच इतकी महत्वाची वाटली नव्हती कारण लग्न करून आपल्याला नष्ट हिणाऱ्याच गोष्टी मिळतात, आपण त्या गोष्टींच्या प्रेमात नाही मोहात पडतो. त्या आपल्यापासून दूर गेल्या कि आपण दुःखी होतो. लग्न करायला मलाआवडेल पण कोणाशी ? ज्या व्यक्तीशी आपण लग्न केल्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखादी पोकळी भरून निघत असेल, तिला आंनद समाधान मिळत असेल, आपल्या सोबत जगल्यामुळे तिला जगल्यासारखे वाटत असेल, आपल्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण ती मोत्यासारखाटिपत असेल.

रमेश : म्हणजे तुला शरीर सुखासाठी लग्न नाही करायचय?

विजय : फक्त शरीरसुखासाठी लग्न करायचं असत तर ते मी कधीच केलं असत. मला लग्न करायचय पण ते पूर्णत्वासाठी कोणावरील ओझं होऊन राहण्यासाठी नाही .

रमेश : म्हणजे तू तुझ्यावर प्रेम असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करताना कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाहीस?

विजय : नाही करणार ! माणसाला प्रेमात पडल्यावर भौतिक गोष्टींचा विचार करण्याचा अधिकारच नसतो. प्रेमात पडल्यावर भौतिक गोष्टींचा विचार करणारे प्रेम करत नसतात फक्त प्रेमाच नाटक करत असतात. प्रेमात पडून लग्न करूनही दुसऱ्याच्या मिठीत विसावणारे शेकडो पाहतोय मीमाझ्या भोवती आज !

रमेश : मला सांग ! आपल्याला जगण्यासाठी लग्नाची प्रेमाची खरंच गरज असते का ?

विजय : आपल्याला जगण्यासाठी लग्नाची तितकी गरज नाही पण प्रेमाची आहे, आपल्याशी कोणतेच नाते नसतानाही काही माणसे आपल्याशी फक्त प्रेमाने जोडली गेलेली असतात, प्रेम आपण कुत्र्या मांजरीवरही करतो पण त्यांच्याशी लग्न करत नाही. लग्न करण्यासाठी म्हणून आपण जेप्रेम करतो ते प्रेम नसते ती एक सोय असते आपल्या शरीराची भूक भागविण्यासाठी केलेली. ती भूक संपली कि ते नाटकी प्रेमही संपते क्षणात.

रमेश : असं म्हणतात लग्नाच्या गाठी वर स्वर्गात जुळतात !

विजय : त्या जर स्वर्गात जुळत असत्या तर आम्ही खाली पत्रिका, जात- धर्म, वय , उंची,रंग, सामाजिक स्थान, आवडी निवडी , शिक्षण जुळवत का बसतो ?

रमेश : आता तूच सांग बाबा !

विजय : लग्नाच्या गाठी नाही प्रेमाच्या गासाठी स्वर्गात जुळतात लग्न काय हल्ली कोणाचे कोणाशीही होते. कोणीही कोणाच्या खऱ्या प्रेमात पडत नाही. लग्न झाल्यावर जी मुलं जन्माला येतात त्यांना ते उगाच आपली म्हणतात त्यांचं म्हणावं अस त्यांच्यात असत काय ? त्यांचे शरीरपंचमहाभूतांपासून बनलेले असते, त्याच्यात असणारा आत्मा तो तरी त्यांचा कोठे असतो तो त्याच्यात त्या परमात्म्याने भरलेला असतो. जन्माला आलेले शरीर आपले भोग भोगायला जन्माला आलेले असते मग ! त्या शरीराशी आपला सबंध तो इतकाच कि आपली शारीरिक वासना त्याजीवाला जन्म घेण्यास फक्त निमित्त मात्र ठरलेली असते. परमात्म्याने ठरविले असते तर दोन जीवांच्या मिलनाशिवायही तो जीवास जन्माला घालू शकला असता. पण प्रत्येक जीवात जगण्यातील रस कायम राहावा म्हणून त्याने ही योजना केली. नश्वर देहाच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादामाणूस सर्व भौतिक सुखाचा त्याग करण्याची तयारी करून जेव्हा माणूस प्रेमात पडतो तेव्हा तो प्रेमात पडलेला असतो.

आज मी सर्रास पाहतो आजच्या तरुण तरुणी निर्लज्यासारखे चारचौघात चुम्मा चाटी करत फिरत असतात ते प्रेम नसते, आपला प्रियकर मरणाच्या दरात असताना ती लग्न झालेले नसतानाही त्याच्या उशाशी बसलेली असते आणि तो बरा झाल्यानंतरही त्याच्या आयुष्याची शाश्वतीनसताना त्याच्याशी लग्न करते हे खरे प्रेम ! पण जग आज या अशा प्रेमाची दाखल घेत नाही. नाहीतर काही प्रेमात पडून लग्न करतात आणि मग इतरांसमोर एकमेकांची दुषणे गात बसतात. प्रेमात पडलं तर आपल्या प्रेमात पडण्याची जगणे दखल घ्यायला हवी ! तशी ती जगणे घेतली तरते खरे प्रेम ! नाहीतर कुत्री मांजरी जे करतात तेच आपण करतो आणि त्याला उगाच प्रेम म्हणतो.

लग्न करून आपण जो देह मिळवितो तो आपल्याला किती दिवस सोबत देणार आहे हे कोणालाच माहीत नसते. आज आपण प्रेम करण्यासाठी म्हणून जो देह निवडतो त्याचेही काही वेगळे नसते. त्यामुळे आपण प्रेमात पडण्यासाठी जी व्यक्ती निवडतो तिच्यात काहीतरी खास असायलाच हवे! म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात प्रेमात पडल्याचा पश्चाताप होत नाही. प्रेमात पडल्याचा पश्चाताप न झालेले आज जगात किती असतील?

रमेश : हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील.

विजय : आज आपण चित्रपटात , मालिकांत जे पाहतो अथवा कदंबऱ्यात जे वाचतो तो प्रेमाचा कल्पनाविलास असतो खरें प्रेम त्याच्या फार पलीकडे असते. आपल्या डोळ्यासमोर प्रेमाचे प्रतीक म्हणून असणारे लैला मजनू वैगरे काल्पनिक पात्र आहेत, पृथ्वीराज चव्हाण आणि संयोगीता, बाजीराव मस्तानी, राधा कृष्ण ही प्रेमाची वास्तवातील उदाहरणे म्हणता येतील पण आज आपण त्यांच्या खऱ्या प्रेमाचा आदर्श ठेवत नाही, आमच्या डोळ्यासमोर फालतू चित्रपटातील फालतू नायक आमच्या प्रेमाचे आदर्श आहेत.त्यामुळेच आज प्रेम उगाच बदनाम झालेले आहे. मुळातप्रेमात पडायला आणि प्रेम करायला एक योग्यता लागते तीच आज अभावाने दिसते. सारेच भौतिक सुखात बरबटलेले आहेत.

कोणीतरी कोणाच्यातरी फक्त आठवणीत सुखी असतो पण जग त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करते. लग्न म्हणजे प्रेमाचे प्रतीक नव्हे ! लग्न म्हणजे प्रेमाचे फळ नव्हे ! लग्न म्हणजे मोक्षाचा मार्ग नव्हे ! लग्न फक्त एक माध्यम असते दोन नश्वर देहास एकत्र आणून आणखी एक नश्वर देहनिर्माण करणारे ! आज प्रेम करणारे एकमेकांपासून काही दिवस दूर राहिले की प्रेम हवेत विरगळून जाते. खरे प्रेम तसे नसते ते कालातीत असते. अंतराच्या मर्यादा त्याला नसतात. ते त्या पलीकडे असते. आज भौतिक गोष्टीमुळे कित्येक लोक आपले प्रेम व्यक्त करायला घाबरत असतात. त्यामुळे खरे प्रेम सतत अंधारात राहते आणि खोटे नाटकी प्रेम खरे म्हणून जगासमोर येते. खरे प्रेम कधीच कोणाच्या अपयशाला कारणीभूत नसते. भौतिक गोष्टींचा विचार करण्यात लोक उगाच आपला वेळ वाया घालावीत असतात. भौतिक गोष्टी किती मिळविल्या तरी त्या सोबत नेता येतनाहीत आणि त्यामुळे मिळालेली ओळख फार टिकत नाही.

रमेश : तुझा प्रेमाचा अभ्यास भयंकर दिसतोय ?

विजय : प्रेमात मी बऱ्याचदा पडलो, आजही पडतोय आणि भविष्यातही पडत राहीन. पण दुर्दैवाने जिच्या प्रेमात प्रेममय व्हावं अशी कोणीच भेटली नाही. प्रत्येकीच्या प्रेमाच्या मर्यादा ठरलेल्या होत्या, माझ्या प्रेमाला मर्यादा कधीच नव्हती. कदाचित माझा जन्मच प्रेमात पडण्यासाठी झालाअसेल. खरे प्रेम हाच मीक्षाचा खरा मार्ग आहे, ज्याच्या हृदयात खरे प्रेम असते त्याच्या हृदयात दया, क्षमा, शांती आणि अहिंसा हि असतेच. माझे जर एखाद्या व्यक्तीवर खरे प्रेम आहे तर माझ्या हृदयात त्या व्यक्ती बद्दल दया असायलाच हवी , मला त्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत क्षमाकरता यायला हवे, माझं हृदय त्या व्यक्तीच्या प्रेमात सतत शांत राहायला हवे, त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात चुकूनही तिरस्काराची भावना निर्माण होता कामा नये अर्थात हिंसात्मक विचार येता कामा नये.

रमेश : तुझे हे बाकी मला पटले, खरे प्रेम हे असेच असायला हवे ! आज प्रेमाबाबतचे माझे विचार अधिक स्पष्ट आणि निर्मळ झाले आहेत.

विजय : प्रेम काय आहे हे मला माहीत आहे पण भौतिक मोह मला आपल्याकडे आकर्षित करू पाहतात, त्यामुळे खरे प्रेम काय आहे हे स्वतःला पुन्हा पुन्हा स्वतःच स्वतःला पटवून देण्याची गरज मलाही भासत असते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance