STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Abstract Inspirational Others

3  

Swarupa Kulkarni

Abstract Inspirational Others

प्रेम करा...

प्रेम करा...

2 mins
222

 या जगातील सर्वात सुंदर अन् सर्वत्र उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे प्रेम... या नश्वर संसारात तोच काय तो खरा शाश्वत आधार आहे .प्रेम ही नुसती भावना नाही तर ते परमेश्वराचच अस्तित्व आहे. विचार करा लहानपणापासून ते आजवर तुम्ही कधीही नुसत्या वस्तूंनी खूश नाही झालात, जसं आई बाबा आपल्यावर प्रेम करायचे मग त्यांनी आणलेलं छोटंसं चॉकलेट, आजोबांची मिशीदार पप्पी व खाऊ, आजीची प्रेमळ थाप व गुळ शेंगदाणे, खरंच या सगळ्यात कुठेही मोठ्ठ असं काहीच नाही सगळं सर्वसामान्यच पण त्यातलं प्रेमचं आजही लहानपण आठवून देत.. घड्याळाचे काटे भरभर फिरतात, कैक दिवस, महिने पळतायेत पण लक्षात काय रहातं? मनाला भावणारे प्रसंगच ना? मग मन जर प्रेमासाठीच तहानलय जर ते त्यातच सुखीये तर आपण का दूर जातोय एकमेकांपासून? जवळ असूनही दोन ध्रूवांचं अंतर आलय आपल्यात.. जरा लहानपणी च्या जगात डोकवा, आपल्या लहानपणी प्रेम स्वस्त व वस्तू महाग होती आज वस्तू स्वस्त पण प्रेम महागलय.. खरं तर जे सर्वत्र आहे, ज्याला अनुभवण्याचीच खरी गरज आहे, जो ईश्वर असण्याचा खरा पुरावा आहे तो आपण का नाकारतोय? मित्र मित्रात द्वेष, राग, नातेवाईक तर कायमच दूरावलेले, सख्खे मायबाप लेकरांपासून तूटलेले हे चित्र दिवसेंदिवस वाढतय. मनाच्या कोपऱ्यात पडून असलेला जिव्हाळा, माया, प्रेम, स्नेह खरंच बाहेर काढा, त्याची तुम्हाला व समोरच्यालाही नितांत आवश्यकता आहे. प्रेमाने, आपुलकीने राहून तर बघा दिवाळी दसरा रोजच साजरा होईल... 

      प्रेमळ माणसे हीच खरी आजची आपली गरज आहे.. प्रेम करा जगही तुम्हाला ते दुपटीने वापस करेल. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract