Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Anuja Dhariya-Sheth

Inspirational


3  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational


प्रेम... असे हे मैत्रीमधले... - भाग १

प्रेम... असे हे मैत्रीमधले... - भाग १

2 mins 213 2 mins 213

बस स्टॉपवर उभी असताना कावेरीला अचानक मानस दिसतो. तिला समजेना हा इथे कसा? ती त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तो सपशेल दुर्लक्ष करतो. कावेरीला धक्का बसतो... हा काय असा मला ओळखलं का नाही याने.....कोणत्या विचारात होता...की स्वतःच्या मैत्रिणीला ओळखले नाही याने...(हा थोडी जाडी झाले मी आता पण न ओळखता यावी एवढी पण नाही) मनात म्हणाली ती....उद्या जातेच घरी आणि खबर घेते याची.....ह्या वेळेला मी खूप सुटटी घेऊन आले....सगळ्यांना भेटते पण पहिली खबर ह्याची घेते...


कावेरी आणि मानस लहान असल्या पासून एकत्र वाढले....खूप घट्ट मैत्री होती....काही लपवायचे नाही एकमेकांपासून.....कॉलेजला गेल्यावर मात्र दोघांची साइड वेगळी.....मानस ने इंजिनीरिंग केले....आणि हिने बी.कॉम करून मग एमबीए केले....त्यामुळे थोडा दुरावा आला मैत्रीमध्ये पण रोज रात्री जेवल्यावर शतपावली करायला सोबत जायचे....सगळ्यांना वाटत होते आता हे लग्न करणार....पण त्यांच्यामध्ये फ़क्त मैत्री होती.....मानसला ऋतू आवडायची....त्याने कावेरीला सांगितले तसे....ऋतू आणि मानस यांच प्रेम कावेरीने जमवून दिले....तसे थोडे थोडे कावेरी आणि मानस लांब झाले....आणि मग कावेरीचे लग्न ठरले....लग्नाला ते दोघेही आले होते.....लग्न झाले मग अजून बोलणे कमी झाले.....


तिच्या लग्नाला ह्या सगळ्यात सहा महिने होऊन गेले....पण तिच्या नवऱ्याची बदली लगेच झाली म्हणून गेल्या ६ महिन्यात ती माहेरी आलीच नव्हती....आणि मानस पण तिला आता आठ दिवसात एकदाच फोन करायचा....तसा तिचा नवरा एकदम फ्रेंडली होता....तरी पण नको असे मानस बोलायचा....ती पण बिझी झाली होती....एकदा मानसने फोनवर सांगितलं की त्याने घरात ऋतूचा विषय काढला होता....जास्त कोणी चिडले नाही...भेटायला घेऊन ये बोलले....तेव्हा कावेरीला खूप आनंद झाला....आता ती वाट बघत होती मानसच्या फोनची....की काय सांगतोय?? घरचे काय म्हणतात?? म्हणजे लग्नाच निमित्त घेऊन ती पण आईकडे आली असती.....पण फोन येत नाही ती फोन करते तर लागत नव्हता....वाट बघणं हा एकच पर्याय होता...आणि फोन आला तो म्हणाला काऊ, आमचे लग्न ठरले....आई बाबा सगळ्यांनी परमिशन दिली....तुला नक्की यायचंय....


तिला पण खूप आनंद झाला...आता मला पण आईकडे जायला मिळेल....तिने तारीख विचारली....तर तो म्हणाला नाही काढली....पण काढू लवकरच....कळवतो तुला.....आणि त्याने फोन ठेवला....तिच्या नवऱ्याला सुटटी मिळणं शक्य नव्हते....त्याने तिला जायला सांगितलं....पण तारीख ठरेल तेव्हा ती जाईल ना....आता तिने आईला फोन केला....आग आई मानस आणि ऋतूचे लग्न ठरले....आता मी येईन.....आई म्हणते आग आम्हाला काहीच माहिती नाही....तुझे लग्न झाले आणि त्याचं नवीन घर त्यांनी घेतलंय ना तिकडे ते शिफ्ट झाले....


कावेरी म्हणते, मला काहींच बोलला नाही तो...आई म्हणते अगं ते जाऊ दे तू कशी आहेस आणि कधी येतेस....अगं ते मी तुला कळवते मग....त्याचा फोन आला की... आणि कावेरी मनात विचार करते....मला काहीच कस बोलला नाही....शिफ्ट झाला तें.....परत विचार करते....लग्नाच्या टेन्शनमध्ये विसरून गेला असेल....जाऊ देत....फोन आला की विचारते... आणि ती परत तिच्या कामात बिझी होते....आता पहिली दिवाळी आलेली असते....त्यामुळे ती माहेरी जाणार म्हणून खुश असते....सगळ्यांना भेटणार म्हणून... स्पेशल म्हणजे मानस आणि ऋतूला.....त्याचं लग्न एवढ्यात नाही म्हणून काय झालं....एक गिफ्ट घेऊन जाऊ असे ठरवते... आणि सर्व तयारी करते.....आकाश ...तिचा नवरा पण तिच्या सोबत घरी येतो... (क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Anuja Dhariya-Sheth

Similar marathi story from Inspirational