kanchan chabukswar

Crime

4.0  

kanchan chabukswar

Crime

पॉलिसी ठकसेन

पॉलिसी ठकसेन

4 mins
487


मंगळवारची दुपार, वसुंधरा निवांतपणे पेपर वाचत बसली होती. रिटायर होऊन दोन वर्ष झाली होती, हळूहळू निवांत आयुष्याची आणि सुखाची सुरुवात झाली होती. विजयराव पण नेहमीप्रमाणे दुपारची वामकुक्षी घेत होते तेवढ्यात फोन खणखणला.

" वसुंधरा विजय कारखानीस आहेत का?"

" हो मी वसुंधरा बोलते"

" अहो तुम्ही 2012 मध्ये एक पॉलिसी घेतली होती, एच एस सी लाईफ सिक्युरिटी ची, 2012 आणि 2013 मध्ये तुम्ही प्रत्येकी 50 हजार रुपये पॉलिसी प्रीमियम म्हणून भरले होते. पण त्याच्यानंतर तुम्ही कुठलेही प्रीमियम भरले नाहीत "


" हो का? मग तुम्ही मला रिमाइंडर का नाही पाठवले?"

"मॅडम आमच्याकडे तुमचे काहीही डिटेल्स नाहीत."

" हो का! मग आत्ता कसा बरं फोन केला?"

" मॅडम आम्ही तुमच्या बँके वरून फोन नंबर काढला,"

" बरं मग आता काय म्हणणं आहे तुमचं?"


" वसुंधरा मॅडम तुमची पॉलिसी तर आता बंद पडलेली आहे आणि एक लाख रुपये पाण्यात जाणार आहेत पण जर तुम्हाला पैसे काढून घ्यायची असतील तर त्याला एक उपाय आहे. पहिला उपाय म्हणजे उरलेल्या वर्षांचा प्रेमियम ते तीन लाख रुपये आहे ते तुम्ही एक साथ भरा आणि 2022 आली तुम्हाला तुमचे पाच लाख रुपये परत मिळतील."


" बापरे! तीन लाख आणि एकदम! मला शक्य नाही."

" ठीक आहे वसुंधरा मॅडम, दुसरा पण एक उपाय आहे,"

" कोणता?"

" वसुंधरा मॅडम तुम्ही या आठवड्याच्या आत 50 हजार रुपये डेबिट कार्ड ने आम्ही सांगतो त्या लिंक वर ती भरा, मग हे पैसे आम्ही दुसऱ्या पॉलिसीसाठी वापरून तुमच्या दोन्हीही पॉलिसी पुढच्या वर्षी तुम्हाला परत करू."

" अरे वा! चांगला उपाय आहे की, मी माझ्या मिस्टरांना विचारते आणि पैशाची तजवीज करते. पण काय हो, पॉलिसी तर नेहमीच चेक ने देतात, कोणीही डेबिट कार्डने मागत नाही."


" वसुंधरा मॅडम, एक तर तुम्ही पोलिसी चे प्रीमियम भरलेच नाहीत, त्यामुळे पैसे वाया जाणार आहेत, तुमचे पैसे वाचावे म्हणून आम्ही हा उपाय शोधला आहे. असं करा आम्ही आता तुम्हाला तुमचं पॉलिसी नंबर पण सांगतो, 1708 40 22.

मॅडम जर तुम्ही या आठवड्यामध्ये पैसे भरले नाहीत तर तुमचे एक लाख पाण्यात जातील."


" ठीक आहे मी कळवते तुम्हाला." दुपारच्या चहा च्या वेळेस वसुंधरा ने विजय रावां पाशी विषय काढला.....


विजय रावांनी ताबडतोब आपली डायरी काढली, 2012 चे पान उघडून आपल्या गुंतवणुकीचे तपशील बघितले, कुठेही सांगितलेल्या पॉलिसीचा नाव देखील नव्हतं. दोघेजण गप्प बसले. संध्याकाळची वेळ, डिस्पेंसरी मध्ये भरपूर पेशंट्स आलेले होते. डॉक्टर वीणाचा फोन खणखणला.

" डॉक्टर वीणा आहेत का?"

" हो मी डॉक्टर वीणा बोलतेय "

" डॉक्टर मी एच एस सी लाईव्ह सिक्युरिटी मधून बोलते, डॉक्टर तुम्ही 2013मध्ये एक पॉलिसी घेतली होती ज्याचा प्रीमियम एक लाख रुपये होतं. तुम्ही 2013 आणि 2014 मध्ये प्रिमियम भरलं ज्याची मॅच्युरिटी डेट आहे 2021.

डॉक्टर तुम्ही त्याच्या नंतर एकही प्रीमियम भरलं नाही त्याच्यामुळे पोलीसि मधून मिळणारे पैसे तुम्हाला आता मिळणार नाहीत."

" अहो असं कसं होईल, मी कायम माझा प्रीमियम भरते."

" डॉक्टर, तुमच्या बिझी शेड्युल मुळे कदाचित तुम्हाला आठवत नसेल पण आम्ही तुम्हाला कायम मेल पाठवून आठवण करत राहिलो."

" हो का? मग आता काय करायचं?"


" डॉक्टर तुम्ही काही काळजी करू नका, आपल्याला पॉलिसी वाचवता येईल, तुम्ही असं करा उरलेल्या तीन वर्षाचे तीन लाख रुपये डेबिट कार्ड द्वारे या लिंक वर ती पाठवून द्या."" आम्ही पॉलिसी परत चालू करू आणि पुढच्या वर्षी तुमच्या पॉलिसी सात लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू."


" अहो काहीतरीच काय? तीन लाख रुपये? डेबिट कार्डने? कसं शक्य आहे? मला इन्कम टॅक्स जबाब द्यावा लागेल एवढा मोठा ट्रांजेक्शन मी कधीही डेबिट कार्डने करत नाही."


" डॉक्टर, डेबिट कार्डने पैसे ताबडतोब जमा होतील आणि तुमची पॉलिसी चालू राहील, तुमचे दोन लाख रुपये बुडले असे समजा."

" मी चेक देऊ शकते."

" डॉक्टर या आठवड्यामध्ये तीन दिवस बँकांच्या सुट्टी आहेत तुम्ही केव्हा चेक देणार! केव्हा तो वटणार! तुमची पॉलिसी बुडीत खात्यात जमा होईल आणि तुमचे दोन लाख रुपये बुडतील. त्यापेक्षा असं करा रोज 99000 प्रमाणे तीन दिवस आमच्या लींक वरती पैसे जमा करा. म्हणजे तुमची पॉलिसी पण वाचेल आणि तुम्हाला पुढच्या वर्षी तुमची पूर्ण रक्कम जी सात लाख रुपये होती ती मिळेल. तुम्ही पाहिजे तर वेगवेगळ्या डेबिट कार्ड न पेमेंट करू शकता मात्र पेमेंट पुढच्या दोन दिवसात झाली पाहिजे."


डॉक्टर वीणाच्या डोक्याला आधीच त्रास होता, दवाखान्यामध्ये पेशंटची भरपूर गर्दी होती, तिला काही सुचेना, उगीच दोन लाख रुपये वाया जाण्यापेक्षा पटापट डेबिट कार्डने पैसे भरलेले बरे असे समजून तिने पैसे द्यायचे ठरवले. डॉक्टर वीणाच्या समोर बसलेला पेशंट अजय म्हात्रे बँकेत काम करणारे कर्मचारी होता. त्याने वीणा चे सर्व बोलणे ऐकले होते.


अजय वीणाला म्हणाला," डॉक्टर तुम्ही अजिबात पैसे भरू नका. तुम्ही आधी तुमची पॉलिसी शोधा पॉलिसी असेल तरच पैसे भरा नाहीतर जाऊ द्या." ज्या कंपनीची पॉलिसी आहे असेही लोक म्हणत आहेत त्याची काहीतरी मेल तुमच्या मेल बॉक्समध्ये आलेली असेल तुमचं कंप्यूटर माझ्याकडे द्या मी शोधून काढतो.


अजय तिथल्यातिथे 2013 साल चा मेल बॉक्स उघडून शोधायचा प्रयत्न केला तिथे वरील नावाची एकही मेल आलेली नव्हती. अजयने डॉक्टर वीणाला सांगितले की हे सगळे लुबाडण्याचे धंदे आहेत आणि तुमच्यासारख्या बिझी डॉक्टरला फोन करून असं जाणवण्यात येतं की कुठलीतरी पॉलिसी आणि त्याचे पैसे भरायचे राहिले. डेबिट कार्ड न कधीही मोठाली रक्कम देऊच नाही ,कोण कुठली लिंक पाठवतो ,काय करतो ,आपल्याला त्याच्यावरती कुठलाही प्रकारचा ताबा नसतो .एकदा पैसे घेतले की यांच्या कंपन्याच गायब होऊन जातात. अजयने जणू काही डॉक्टरला मदतच केली आणि पैसे वाचले.


अनु घरी आली असताना व वसुंधरा आणि विजयने पॉलिसीचा विषय काढला. अनुने ताबडतोब आई-वडिलांचे जुने चेकबुक बाहेर काढून कुठे कुठे त्यांनी चेक दिले होते याची तपासणी केली. 2012 किंवा 13 च्या वर्षी कुठलाही चेक 50 हजार रुपयांचा नव्हता एक बनावट टोळी कार्यरत असल्याचे त्यांना जाणवले. अनुने ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि आलेले नंबर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस आता पॉलिसी ठकसेन यांचा शोध घेत आहेत तेव्हा सर्वजण सावधान.


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime