फसलेली प्रेम कथा
फसलेली प्रेम कथा
काही दिवसांपूर्वी रजनीने घर सोडलं होत .सगळ्यांचा विरोध असतानाही तिने रवीला निवडल होत .२ दिवसा साठीच्या प्रेमासाठी तिन आयुष्यभर प्रेम करणारे आईवडील डावलले होते .
रवी आणि रजनीने लग्न केल .थोडे दिवस नीट चाललं पण मग मात्र परिस्थिती वेगाने बदलली .रवी काहीच काम नव्हता करत .रजनीने घरून आणलेल्या पैशातच त्यांचे दिवस चालले होते .रवी आता पिऊ ही लागला होता .रजनीला मारहाणही करू लागला .
दूरवरून सुंदर वाटणार प्रेम किती फसवं असतं हे आता रजनीला कळून चुकलं होत . ती ह्या गोष्टी घरी सांगूही शकत नव्हती .कारण घरच्यांच्या विरोधात घेतलेला निर्णय होता तो .आता कोणत्या तोंडाने माघारी जावं तिला काहीएक समजत नव्हतं .
रजनी आज पुन्हा रडत होती .तिला हुंदके अनावर झाले होते .इतक्या दिवस अडवलेल्या अश्रूंना आता तिने वाट मोकळी करून दिली. मनात साठलेल्या त्रासाला तिने अश्रूंसोबत बाहेर काढलं .त्यात मोबाईल वाजला बघितल तर तिझ्या आईचा फोन होता .तिने अश्रूंना कसबसं आवरलं आणि काही झालच नाही अशा अविर्भावात ती आईशी बोलू लागली .
आई - रजनी बाळा काय करतेयस ? आवरलं का तुझं ? रवी गेला का कामावर ?
रजनी - हो आई आत्ताच आवरलं .तो आत्ताच गेला बघ इथून .
आई - रजनी काय झालं पोरी.. तुझा आवाज असा रडवेला का झालाय .
रजनीच्या आईने ओळखलं होत की रजनी रडलेली होती .शेवटी आई ही आईच असतें .आपल्या मुलाला काय होतय हे तिला लगेच जाणवत जणू ती काही जादूगारच असतें .अगदी आपल्याला बोलता येत नसतं तेव्हा देखील तिला समजतं की नक्की आपल्याला काय हवं आहे आता तर आपल्याला बोलता येत .आईसारखा जादूगार ,तत्वज्ञ ,शिल्पकार ,शास्त्रज्ञ ,वकील ,न्यायाधीश कोणच असू शकत नाही .कारण आपल्या मुलाला बालपणापासून ते एक चांगला नागरिक घडवण्यापर्यंत तिला या सगळ्या रूपातून जावं लागत .स्वर्ग ही जिच्यापुढे फिक पडत त्या आईच्याकडून रजनीचा रडवेला आवाज सुटला नव्हता .
रजनी - खरच काही नाही ग आई .
रजनी वायफळ प्रयत्न करत होती परिस्थिती सांभाळायचा पण ती विसरली होती की ती तिची आई असतें .
आई - रजनी बाळा मी तुझी आई आहे .सांग लवकर काय झालं ते .
तिला आता हुंदका अनावर झाला.प्रयत्न करूनही ती रडू थांबवू शकली नाही .अखेर तिने तिझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली .अश्रू नदीला पूर आलेल्या पाण्यासारखे गालावरून वाहू लागले
आई - शांत हो बाळा .शांत हो .काय झालं ?
रजनी - काही नाही ग आई .रवीच आणि माझं भांडण झालं .
आई - अग मग त्यात काय एवढं ? नवराबायकोचे भांडणं होतच असतात .घर तिथं भांड्याला भांड लागणारच .आता तुझ्या बाबांचे आणि माझे अजूनही भांडणं होतात .मग मी असच रडते का ?
रजनी आणखी जोरात रडायला लागली .आज तिझे अश्रू कोणीही थांबवू शकत नव्हतं .
ज्यावेळी अतोनात वेदना होतात आणि आपण त्या व्यक्त इच्छा असूनही करू शकत नाही त्यावेळी त्या अश्रूच्या रूपातून बाहेर पडतात .
रजनी- अगं आई ते तर मलाही कळत ग पण आमची रोजच भांडण होतात .तो मला समजूनच घेत नाही .
आई - म्हणजे ? त्याच्याशी लग्न करायचा तर तुझाच निर्णय होता ना आणि तूच तर सांगत होती बाबांना की तो मला खूप समजून घेतो .माझ्यावर खूप प्रेम करतो .आता कुठं गेलं ते प्रेम आणि समज ?
रजनी - असा का ? वागत आहे तो मला समजेना खूप बदल झालाय त्याझ्यात लग्न झाल्यापासून .नुसता छळून घेतो मला .
आई- आम्ही तुला सांगत होतो त्यावेळी की मुलगा काही बरोबर नाही .पण ऐकशील तर शप्पथ ना.
म्हणतात ना प्रेम आंधळं असत त्यावेळी तू कोणाचच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती .शेवटी आमचा नाविलाज झाला.
रजनी - चुकले ग आई .खरच चुकले मी .आता माझे डोळे उघडले .लग्न होयच्या अगोदर खूप छान वागायचा मला थोडाही त्रास देत नव्हता पण आता जीव नकोसा केलाय माझा .खूप भांडतो .
माझं प्रेम फसवं निघालं आई .
असं बोलून रजनी पुन्हा रडू लागली तिझे अश्रू वेगाने गालावरून वाहत होते .
आईच्या डोळ्यातूनही आता अश्रू निघू लागले .तिला काय करावे हेच समजत नव्हतं .रजनीचे वडील हार्ट पेशंट होते त्यामुळे त्यांना ही गोष्ट सांगणे म्हणजे शुद्ध मूर्खपणाच .
आई - पण आता असं म्हणून कस चालल रजनी .आयुष्यच हे वळण तू आता बदलू शकत नाही तुला ते वळण घ्यावाच लागणार आहे .मी बोलून बघू का ?
त्याच्याशी .
रजनी - नाही नको आई .त्याला समजलं की मी तुला सांगितलं तर माझा जीवच घेईल तो .
आई - म्हणजे तुला मारतोही तो .
आता रजनीच्या आईचा पारा हलला माझ्या पोरीवर हात कसाकाय उगरतो तो .एवढ्या लडिवाळात वाढलेली रजनी एकुलती एक पोर .काळजाचा तुकडा .अचानक कोणीतरी येतो आणि तो तिला त्यांच्यापासून तोडून घेऊन जातो .तिला जपायचं तिला समजायचं सोडून हात उगारतो .रजनीची आई खूप रागावली होती डोळ्यातून गरम पाणी बाहेर पडत होत .
आई - सरळ बॅगा भर आणि घरी निघून ये .तू जरी आमच्या मनाविरुद्ध वागली असशील तरी आमचा जीव की प्राण आहेस .आम्हाला तू ९ महिने पोटात नाही जड झालीस तर आत्ता कशी होशील .आयुष्यभर बसून खाशील इतकं कमावलं आहे तुझ्या बाबांनी .लगेच निघून ये .
रजनीचं रडणं काही थांबत नव्हतं तिझ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबा बरोबर तिझ्या आईचं काळीज तीळ तीळ तुटत होत .पोटच्या गोळ्याला होणारा त्रास तीही सहन करू शकत नव्हती .कितीही केल तरी रजनी लहान होती .तिझा निर्णय चुकला होता. तिझ प्रेम फसवं निघालं होत .ती आता एकटीच पडली होती .
दूरवरून पाणी दिसावं आणि जवळ गेलं तर काहीच नाही अशा मृगजळाला ती बळी पडली होती .लग्नाअगोदर प्रेमाचं अमिष दाखवून त्याने तिला स्वतःच्या जाळ्यात ओढलं होत .एखाद पाखरू जाळ्यात पडावं आणि सुटण्यासाठी धरपड करावी तस राजनीचं झालं होत .
आईचे शब्द तिला दहा हत्तीच बळ देत होते ती भराभर बॅगा भरत होती .तिझे अश्रू अनावर झाले होते पण ते आनंदाचे होते .
फसवं प्रेम सोडून ती आता निःस्वार्थ प्रेमाकडे म्हणजेच आपल्या आई वडिलांकडे जाणार होती
