Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

फरक नजरेतला...

फरक नजरेतला...

3 mins
240


रचना आणि जुई दोघी बालमैत्रिणी... आज बऱ्याच दिवसांनी अचानक बाजारात भेटल्या... मग् काय गप्पा... जुई तिला म्हणाली, चल आपण मस्त कॉफी प्यायला जाऊ... पण रचना खूप घाईत होती... ती जॉईंट फॅमिली मध्ये रहात होती.. त्यात सासू सासरे, आजी सासूबाई, काका-काकी सासूबाई सर्व एकत्र रहात होते... त्यामुळे रचना थोडी गोंधळून गेली.. ती म्हणाली आता नको ग.. आता मला घाई आहे... परत कधीतरी...


पण ऐकेल ती जुई कसली... दोघे राजा राणी यांचा संसार त्यात करीअरच्या नावा खाली दहा वर्षे झाली तरी मूल नको असल्या विचारांची... ती म्हणाली, रचना आग इथे नाही तर आपण तुझ्या घरी जाऊ कॉफी प्यायला.. रचना ला काहीच सुचत नव्हते.... नाही कस म्हणणार म्हणून ती हो म्हणाली...


इकडे सासूबाई नुसत्या चिडल्या होत्या... जरा कळकळ नाही म्हणून तीच्या नावाने शंख करत होत्या... काकी सासूबाई आगीत तेल ओतत होत्या... ती नेहमीं असेच करते वहिनी... बाहेर गेली की बाहेरचीच होते... त्यात छोट्या नणंदबाई नुकत्याच नवऱ्याला घटस्फोट देऊन आल्या होत्या.. आणि घरात कसे वागावं याचे धडे रचनाला देण्यात त्यांना खूपच इंटरेस्ट होता... आजी सासूबाईंचा खूप जीव होता रचनावर त्यांचा आणि तीच्या नवऱ्याचा सपोर्ट होता म्हणून तर ती हे सर्व करू शकत होती...


घरी आल्या आल्या तिला पाणी दिले... अन् सासूबाईंचा अवतार बघून ती जे समजायच तें समजली... घाईघाईत पुढच्या तयारीला लागली... कूकर, भाजी असे करत करत दोघी साठी कॉफी ठेवली... तेवढ्यात औषध देऊन आली, आजी सासूबाईंना दूध दिले.. आणि मग् जुई सोबत बसली... कॉफी पिता पिता जुई गप्पा मारत होती


रचना कसे ग करतेस?? एवढी माणसे तुझ्या घरात त्यात सासू सासरे म्हणजे?? आजारी म्हटल्यावर वेळेवर जेवण, नाष्टा, औषधं... मला नाही बाई जमायचं... आम्ही दोघे तरी मी कंटाळते, तू रोज दहा प्रकार पथ्यपाणी कसे करतेस?? जुई म्हणते.


रचना हसून म्हणाली, मी त्यांच्याकडे कधीच एवढी माणसे म्हणून बघत नाही तर माझी माणसे म्हणून बघते, आणि वेळेवर सगळे द्यायचे म्हणजे नियोजन असते माझे मग् त्याचा एवढा बाउ नाही वाटत मला... वयस्कर माणसे असली की घराला घरपण येते ग आणि शिस्त लागतें.... त्यांच्या असण्याने घरात एक वेगळीच मायेची ऊब असते...


वटवृक्षासारखी आपल्यावर सावली असते त्यांची... अगं सगळ आपल्या नजरेतल्या दृष्टीकोनावर अवलंबून असते ग... आपण त्यांना त्रास समजायच की आधार हे आपल्यावर असते... अगं आपण चांगल्या नजरेतून बघायचं सर्व...


जुई म्हणाली ग्रेट आहेस बाई...!!! मी नाही एवढे करू शकतं... तुझ्या जागी मी असते तर हे सर्व कधीच सोडून गेले असते...


रचना म्हणाली, म्हातारपण असेच असते ग... आपण पण उद्यां म्हातारे होऊ... आपल्या आई बाबांशी आपण असे वागू का?? नाही ना...!!! मग् सासू सासरे यांच्या शी का वागायचं.. जशी दृष्टी तशी सृष्टी... कोणी कसेही वागले तरी आपण नेहमीं चांगलेच वागावे...


जुई म्हणते, आताच्या जनरेशन मध्ये अशी सून नसते ग... रचना म्हणते सोड ना तू.. ह्या बाबतीत तुझे माझे नाही पटणार... मी घरात शांतता राहावे म्हणून प्रयत्न करते बाकी काही नाही... माझ्या बद्दल कॊणी काही विचार करू दे.. मी सर्वांशी चांगलेच वागणार... कोणी चांगले बोलावे म्हणून मी काही करत नाही.. मला जे पटत तें मी करते... शेवटी प्रत्येकाच्या नजरेतला फरक आहे...


जर ९९ कामे चांगली झाली अन एक काम नजरचुकीने राहिले म्हणून जर कॊणी त्या वाईट कामावर नजर ठेवणारे असेल तर ठेवू दे.. त्यातून फायदा माझाच होतो.. आणि म्हणून मी एवढी परफेक्ट होऊ शकले... जुई म्हणाली खरच कमाल आहे तुझी एवढ सर्व करून देखील स्वतःला वेळ देतेस, तुझे छंद जोपासतेस खरच रचू यू आर रिअली ग्रेट....!!!


तिच्या सासूबाई बाहेरून सर्व ऐकत असतात... त्यांना स्वतःचीच लाज वाट्ते... आपल्याला एवढी चांगली सून मिळाले आणि आपण सतत तिच्या चुकाच नजरेत धरतो... दोन दिवसात त्यांच्या वागण्यात, नजरेत असलेला बदल रचनाला जाणवत असतो... घरात कॊणी नाही बघून त्या तिची माफी मागतात... पोरी तू एवढी चांगली आहेस.. की तुझ्या नजरेला नजर द्यायची माझी हिम्मत नाही...


रचना म्हणते आई असे का बोलता? आपल्या बाळाला दृष्ट लागू नये, नजर लागू नये म्हणून आई काळा तिट लावते तसेच तिची नजर कायम आपल्या बाळावर एखाद्या कॅमेऱ्यासारखी असते... तशीच तुमची नजरसुद्धा मी चुकू नये, चांगले काम करावे म्हणून नेहमीच माझ्यावर ठेवत जा.. तुमचे शब्द जरी कडू आले तरी त्यामागे तुमची भावना शुद्ध आहे याची मला जाणीव आहे..


सासू सून यांच्या नजरेत आज एकमेकांसाठी वेगळेच भाव दिसत होते...


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational