Deepali Mathane

Tragedy

4.3  

Deepali Mathane

Tragedy

फिनिक्स भरारी:--स्वानुभव झुंज

फिनिक्स भरारी:--स्वानुभव झुंज

5 mins
277


लहानपणापासूनच शिक्षणाची , काही तरी नवीन शिकण्याची खूप आवड............पण कधी परिस्थिती तशी जुळून आलीच नाही..... शाळेत मी दरवर्षी वर्गप्रमुख असायची. सगळे शिक्षक खूप माया करायचे.तुपकरीसर, मोहनिकमॅडम, पिंगळेसर यांना मी कधीच विसरू शकत नाही अगदी पोटच्या पोरीसारखी माया केली त्यांनी माझ्या वर आणि आजही ते नाते तसेच टिकून आहे. असो.......!!शिक्षणात प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा ठरलेलाच असायचा. दहावीला असतांना ८५ विद्यार्थ्यांमधून फक्त१२जण पास झाले आमच्या वर्गातले हे मला २०वर्षांनी कळाले. रियुनियनच्या दिवशी.... त्यात मी फर्स्ट क्लासमध्ये पास झाली होती.दहावी ला सायन्स घ्यायचे होते. पण नाही घेता आले. सगळ्यांनी कारणं भरपूर सांगितली. आणि मग आर्ट्स ला ऍडमिशन घ्यावी लागली नाईलाजास्तव.कॉलेजमधल्या प्रत्येक इव्हेंट ,स्पर्धांमध्ये भाग घेतला.अगदी कॉलेजमध्ये सगळ्या टीचर्स ची लाडकी होते. अजूनही त्या विसरल्या नाहीत मला .......यागोष्टीचा खूप आनंद आणि अभिमान आहे मला.........असो! डिस्टींगशन ग्रेडनी बारावी पास झाले. ट्यूशन हा विषय दूर दूर पर्यंत नव्हता.फर्स्ट ईयरला असतांनाच लग्न जुळले आणि वाट लागली शिक्षणाची........... घरच्यांनी शिक्षण पुढे चालू ठेवू म्हटलं पण...............असू दे.......खूप सारे पण होते. खूप जीव जळायचा की आपण आयुष्यात काहीच करू शकलो नाही. पण ईलाज च नव्हता.


लग्नानंतरही शिक्षणाचा विचार शांत बसू देत नव्हता. खूप प्रयत्न केल्यावर घरच्यांना कन्व्हिंन्स केले की मी सगळं सांभाळून अभ्यास करेल. पण मला डि.एड.तरी करू द्या. लग्नाला तो पर्यंत दहा वर्षे झाली होती. दोन चिमुकली गोंडस मुले होती. हो नाही करत गेलो ऍडमिशनला. तिथे पैसे भरून ऍडमिशन करावी लागणार होती. कारण माझा नंबर बाहेर गावी लागला असता आणि घर सोडून दुसरीकडे जाणे शक्यच नव्हते. तिथे पण खूप अडथळे आले. पण म्हणतात ना *किसी चीजं को अगर आप शिद्दत से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती हैं* अगदी तसेच झाले........ !झाली बाबा एकदाची ऍडमिशन.आणि सुरू झाले कॉलेज सकाळी दहा ते सायंकाळी पाच. सकाळी लवकर उठून घरच, लेकरांच सगळं आटोपून कॉलेजला जायचं. सायंकाळी घरी आले की पुन्हा सुरू असा दिनक्रम सुरू झाला.तेव्हा एकही बाई नव्हती घरकामाला.

   

पहिल्या वर्षी कॉलेजमध्ये पाठ वगैरे घेण्यासाठी ड्रॉईंग आणि हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे माझे पाठ खूप छान झाले. पण माझा पहिला पाठ वर्गात देतांना मी टोटली ब्लॅंक झाले होते. हे मी कधीच विसरणार नाही. .....।।..असो!पण शेवटी सगळं छान झालं.

   

माझी लिखाणाची स्पीड खूप कमी पडत होती इतक्या वर्षांचा गॅप गेला होता. म्हटलं अस म्हणून कस चालेल. त्यासाठी मी रफ बुक्स विकत आणून टाईम लिमीट लाऊन न्यूजपेपर मधले लेख लिखाणाचा सराव केला.खूप खूप सराव केला. प्रथम सत्र परिक्षा दिली. आणि त्या परिक्षेत शंभर पैकी फक्त पाच जण पास झाले असे सरांनी वर्गात येऊन सांगितले. मला खूप वाईट वाटत होते. म्हटलं आपण फेल नाही होऊ शकत. गुण कमी मिळतील पण नापास.............या शब्दाची चवच कधी चाखली नव्हती. पण खरचं माझ्या मेहनतीला त्या दिवशी खऱ्या अर्थाने मान मिळाला. जेव्हा सरांनी चौथ्या नंबरवर माझ नाव घोषित केलं. मग काय एवढचं कारण पुरेसं होत अजून मेहनत करायला. कॉलेजमधल्या सगळ्या इव्हेंटमध्ये, स्पर्धांमध्ये पार्टीसिपेट केलं.आणि बक्षिसे पण मिळवली.लग्न झालेली आणि दोन मुलांची आई अशी मी एकटीच होती वर्गात. शिक्षकांनी पण खूप कौतुक केले. सगळं कस छान चाललं होतं. पण सरळसाधं चालेल ते दीपाली च लाईफच नाही. 


           तब्येतीबाबत बरेच कॉम्प्लीकेशन्स होत होते. खूप सारे डॉक्टर्स ला दाखवले पण निदान लागत नव्हते.सगळे म्हणत होते की, तु शिक्षण सोडून दे. आरामात रहा मस्त. म्हटलं ज्या गोष्टी साठी इतकी तरसली ती गोष्ट फक्त तब्येतीसाठी मी सोडणार नाही. मी स्वतःला सांभाळून करते सगळं . आणि अशात जर मी मेली तर मला समाधान राहील की मी माझं हंड्रेड पर्सेंट दिलयं. आणि तुम्हालाही कळेलं की मी खरचं मेहनत घेतली. सारखं दवाखान्यात ऍडमिट कराव लागत होतं. सात सप्टेंबर पासून फायनल परिक्षा होती. सगळा भार महाराजांवर सोपवला, की नर्विघ्न परिक्षा पार होऊ द्या म्हटलं. मी सहन करायला घाबरत नाही फक्त आता परिक्षा आहे तुम्हीच सांभाळा. आणि खरचं महाराजांनी सांभाळलं. परिक्षा अगदी नर्विघ्न पार पडली. मग एकदा खूप सिरियस झाली पल्सरेट 35वर आला होता. ऑक्सिजन लागले होते. पण झाल सगळं नीट............


मग कॅन्सरचा रिपोर्ट आला. आणि मग मात्र नुसते लेकरंच दिसले डोळ्यासमोर....... दोन दिवस खूप भारी गेले. हे मला मुंबईला घेऊन गेले तपासणीसाठी. तर तिथल्या डॉक्टरांनी खूप छान गाईड केले. आणि हा रिपोर्ट चुकीचा आहे. असे सांगितले. पण एक ऑपरेशन कराव लागेल अस म्हटलं. माझी मैत्रीण रुशीता आणि भाऊजी आमच्या सोबत होते. हॉस्पिटलमध्ये कुणालाही थांबण्याची परवानगी नव्हती. म्हणून मला ऍडमिट करून हे सगळे रूमवर गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे ऑपरेशन झाले. आणि मी बेशुध्द होती तेव्हा यांना कॉलेजच्या मॅडमचा फोन आला की मी मेरीट मध्ये88%ने पास झाले आणि मला अशा विषयात मी बोर्डात पहिली होते ज्या विषयात सगळ्यात जास्त जण फेल होत होते. यांना खूप आनंद झाला. मी शुध्दीवर आल्यावर यांनी मला सांगितले. मग काय दुखणं छूमंतर...............सगळे ओरडत होते बोलू नकोस आराम कर पण.......ते काही मला शक्य नव्हतं. एक तर मला जेवायला नसलं तरी चालते पण बोलायला पाहिजे..........कॉलेजमध्ये सत्कार झाला. बक्षीस प्रमाणपत्र मिळाले. शिक्षकांनी खूप कौतुक केलं.मग काय मलाच माझा खूप लाडं येतं होता.मग ठरवलं की दुसऱ्या वर्षी आपण अजून छान करायच सगळं. आणि दुसऱ्या वर्षी देखील मी 86%नी पास झाले. आणि माझ्या मेहनतीला आणि जिद्दीला नवा आयाम मिळाला. म्हणून म्हणते स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे यशाच्या दिशेने पाऊल टाकत रहा.........मग बघा विजय तुमचाच!..............


संकट, अडथळे हे आपल्याला सुलाखून काढतील आणि एक वेगळच तेजोवलय आपल्या व्यक्तीमत्वाला उजळून काढेल. जी परिस्थिती आहे तिला सामोरे जा. माझ्याच नशिबी असे का?.............याचा विचार करण्यापेक्षा त्यातूनही कस बाहेर पडता येईल याचा विचार करून पाऊल उचला.अस आहे मग सगळं ..........खूप काही आहे लिहिण्यासारखं पण शब्दांची मर्यादा येते म्हणून थोडक्यात आपली भूमिका मांडली. आयुष्यात कधीच हार मानू नये.जिद्द आणि चिकाटी अंगी असेल तर आपण आपले ध्येय सहज गाठू शकतो. सकारात्मक विचारसरणी तुम्हाला नैराश्येत जाऊच देत नाही. हे ही तेवढच खरं आहे.

आणि मग आपलंऑल टाईम फेवरेट गाण आठवतं.......

*तुफान तो आना है.......... आकर चले जाना हैं.......

बादल है ये कुछ पल का छा कर ढल जाना है.............*


हे गाण दिवसातुन एकदा ऐकल्याशिवाय दिवस पूर्णच होत नाही माझा. या गाण्यावरून कळतं की शब्द हे आपल्या जगण्याला किती आधार देतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy