Anuja Dhariya-Sheth

Inspirational

4.0  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational

पैसा म्हणजे सर्वस्व नाही...

पैसा म्हणजे सर्वस्व नाही...

3 mins
364


""आपले आयुष्य म्हणजे असंख्य रत्नांची खाण आहे... पण या खाणीमधील अनमोल रत्न म्हणजे "वेळ" जी एकदा निसटून गेली की कधीच परत मिळत नाही म्हणूनच जे आहे तें आज आत्ता भरभरून जगा....""

हेच सांगणारी कथा आहे हि.... नक्की वाचा....


सतत दुकान... ना मित्र... ना छंद... ना कधी फिरायला जाणे... ना कधी परिवार सोबत वेळ घालवणे.... सतत मला वेळ नाही... मला जमणार नाही.... माझा धंदा एवढा नी तेवढा... एवढे पैसे मिळाले नि तेवढे मिळाले सतत दुकान आणि पैसे... विकलेला माल आणि खरेदी केलेला माल... या शिवाय दिनेश शेठ कधीच गप्पा मारत नसत.... कपड्यांचे मोठे दुकान.... प्रसिद्ध व्यापारी... सतत पैसा... पैसा...पैसा... घरातले सर्व सांगून दमले... मुले, मुली... बायको... पण सर्वांना चिडुन ओरडणं... दात ओठ खाऊन ओरडणं... तुम्हाला काय कळणार? आयते मिळते मग् काय? त्यांच्या अशा या वागण्याला सर्वच कंटाळले होते... कुठे जाणे नाही की येणे नाही... त्यामुळे सर्व राग घरातल्यांवर काढायचे... सर्वच लोकं त्यांच्या या स्वभावाला कंटाळले होते... नातेवाईक यांनीं तर जाणे-येणे कमी केले होते.... पण तें मात्र त्यांचा हेका धरून होते...


अशातच लॉकडाउन आले, कितीतरी उद्योग-धंदे ठप्प झाले... त्यात ह्यांचे दुकान पण बंद झाले... मग् काय २४ तास घरात... चिडचिड वाढत होती... तब्बेत बिघडत होती.... शेवटी एक छोटा अॅटॅक येऊन गेला... 8 दिवसांनी दवाखान्यातून ते घरी आले... या ८ दिवसात ते बरेच काही शिकले होते, त्यांना बरेच काही सुटतय हे जाणवत होते... ते बायकोला म्हणाले, खरच ग...


"आयुष्यभर माणूस ज्याच्यामागे धावत असतो...

दिवसभर त्याच्या करीता राब राबतो....

माझे माझे करून तो साठवतो....

आपल्या माणसांसाठी कमावतो....

त्याच्यासाठी वेळ आली तर रक्ताची नाती तोडतो.....

त्याच्यासाठी माणूस काहीहि करतो.....

कारण जीवनात पुढे जायला तोच तर लागतो...

असा हा पैसा.....

जाताना मात्र इथेच सोडून जातो......"

हे आता पटत आहे मला... खरच तुमच्या सर्वांचा मी गुन्हेगार आहे...


बायको त्यांना म्हणाली, अजूनही वेळ गेली...देवानी तुम्हाला हि दुसरी संधी दिले असे समजा... आणि राहिलेलं आयुष्य भर भरून जगा....


काही दिवसात त्यांच्या मध्ये खूप फरक जाणवला... तें आता त्यांचे छंद जोपासत होते... घरच्यांना वेळ देत होते... त्यामुळे घरातले वातावरण बदलून गेले... हसरे आणि आनंदी झाले...


काही दिवसांनी त्यांचे व्यापारी मित्र त्यांना बघायला आले... तेव्हा लॉकडाउनमुळे आलेला स्ट्रेस आणि त्यातून वाढत गेलेले आजारपण... या सर्वातून बरे झालेले दिनेशशेठ आपल्या मित्रांना सांगत होते.. कितीतरी उद्योग-धंदे ठप्प झाले... त्यामुळे अनेक माणसे मानसिक आजाराने ग्रस्त झाली आहेत... घडाळ्याच्या काट्यावर धावणार्या सर्वांना या कोरोनामुळे घरात बसवले.. ज्यांना दिवस संपून रात्र कधी व्हायची हे कळंत नव्हते.. त्यांना एक-एक मिनिट कसे घालवायचे असा प्रश्न पडला?? अचानक आलेल्या ह्या कोरोनारूपी संकटाने काय शिकवले? पैसा मिळवण्यासाठी आपण कष्ट करतो, एकीकडे सोने-नाणे, गाडी-बंगला सर्व मिळवत श्रीमंत होतो पण आपले आरोग्य, छंद, आपली माणसे यांच्यापासून नकळत लांब होत जातो... हे छोटे छोटे आनंद आपल्याला परवडत नाहीत इतके गरीब होऊन जातो... म्हणूनच सांगतो, संतुलित जीवनशैली जगायला शिका.. वर्कोहोलिक होणे बंद करा...

"पैशाची गुंतवणूक केली तर आपल्याला व्याज मिळते....

पण वेळची गुंतवणूक नात्यांमधील प्रेम आणि आपुलकी वाढवते...."

सर्वांना त्यांचे म्हणणे पटले...टाळ्या वाजवून त्यांच्या बोलण्याचे कौतुक केले....


कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.

आणि अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..

अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे.

सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.

कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational