sanket kulkarni

Horror Thriller

2.6  

sanket kulkarni

Horror Thriller

पैंजण

पैंजण

5 mins
12.4K


नाक्यावर सगळे मित्र भेटलो, अमृततुल्य चहाचा घोट घेत.., चेष्टा मस्करी मग ह्याची खेच त्याची खेच करता करता मधेच जुने गमतीदार, रोमांचकारी किस्से निघाले सगळे त्यातच रमून गेले.... आठवणी रंगीत झाल्या बोलता बोलता, लांजाला घडलेल्या प्रसंगाचा देखील उल्लेख निघाला. हा प्रसंग भयावह तितकाच सत्य आहे, हे सत्य कथेच्या स्वरूपात लिहावी अशी कल्पना सुचली. ती घटना अचंबित करणारी आमच्या तोंडचं पाणी पळवले पायाखालची जमीन सरकवली आजतागायत त्यां रात्रीनं थर थर कापायला होतं. पावसाळी पिकनिक कुठे काढावी?? असा प्रश्न विचारताच,बहुमताने “कोकण” ह्या पिकनिक स्पॉटसाठी बिनविरोध ठरावं मंजूर झाला.महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणून प्रचलित असलेले ठिकाण "कोकण”......


रत्नागिरी जिल्यातील ‘लांजा’ हे एक गाव, लांजापासून ८कि.मी अंतरावर ‘निवोशी' खेडेगावात, आमच्या मित्राचं घरं. कोकणात साधारण: ‘मे’ महिन्यात वळवाचा पाऊस भूतलावर अवतरण्यास सुरुवात होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणाकडे आमची स्वारी निघाली. कोकण म्हंटल की निसर्ग,नुसताच निसर्ग नव्हे,डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गरम्य दृश्य. जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान कोकणात हिरवा गालिचा अंथरल्यासारखा दिसतो. पावसाचा थेंब सुपीक लाल मातीत मिसळल्यावर मनमोहून टाकणार सुगंध दरवरळतो. आमराईच्या वनात येणार मधुर सुवास मनाला तृप्त करतो.रस्त्यावर पडणाऱ्या थेंबाचे पारदर्शक फुलांत रूपांतरण होऊन,दोन भागत विभक्ताना खूप छान दिसतें. रस्त्याच्या दुतर्फा वटवृक्ष वड-पिंपळांच्या पारंब्यावरून ओघळणारे पाणी चित्त वेधून घेते. झाडांच्या फांद्या-फांद्यांमधुन पडणारे काचबिंदू आकर्षित करून घेतात,रस्त्याच्या पलीकडे बळीराजा रानात तांदळाची लावणी करताना दिसून येतो. ‘कोकण’चे वर्णनं शब्दांपेक्षा, ‘प्रत्यक्ष दृष्टीत सामावून अनुभूती’ घेण्यायोग्य ठरते. आगंतुक ओढ लागलेल्या कोकणात अकरा तासांचा प्रवास करून संध्याकाळच्या सुमारास निवासस्थानी पोहोचलो. घराच्या मागील बाजूस बारमाही नदी वाहते,


नदीत मनोसक्त डुंबून प्रवासातील शीण दूर करण्यासाठी नदीकडे प्रस्तानं केलं.काही अंतरावर गाड्या उभ्याकरून झुडप्यांच्या बेचक्यातून पायवाट काढतं,एकदाचे नदीत अंग झोकून दिले. दिवेलागणीच्या वेळी प्रत्येकानं घरात असायला हवं अशी पद्धत लक्षात घेऊन तिन्हीसांजेच्या अगोदर घरी दाखल झालो.पावसाळ्यात बऱ्याचदा गावाकडे वीज जाते. अनेकदा दिवस रात्र वीज नसते, त्यादिवशी देखील रात्रीचं आमचं जेवण चिमणीच्या दिव्यात आटोपलं. आल्या दिवशी फार विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागेल, ह्याची आम्हांला भणक देखील नव्हती. शतपावलीचा हट्ट करत स्वनिल बॅटरी घेऊन आला. घराच्या वेशी बाहेर काही अंतरावर एक पडीत रानाच्या बांधावर आम्ही बसलो.क्षणांत आम्ही बालपणीच्या खेळात रमलो कुणाच्या विजेरीचा प्रकाश दूरवर जातो असा पोरखेळ आमच्यात सुरु झाला. कधी रस्त्यावर कधी रानात तर कधी आभाळात. वळवाच्या पावसाळी वातावरणात लख्ख चांदणं पडलं होतं चांदण्याची माहिती कथेच्या स्वरूपात मी सगळ्यांना देत होतो. रानाच्या मागे पन्नास फुटावर हिरव्यागार वृक्षांनी आच्छादलेला डोंगर, डोंगराच्या पायथ्यशी असलेल्या वाटेवर काहीप्रमाणात सुखा पालापाचोळा विखुरलेला होता, वाऱ्याची झुळूक आली की पालापाचोळ्याचा सळसळ.... आमच्या कानी पडत.


प्रवासातील गंमती-जंमतीची उजळणी चालू असताना, अनपेक्षित डोंगराच्या पायथ्याशी चालण्याचा आवाज कानी पडला.माणसं इतक्या रात्रीं येणं शक्य नव्हतचं, गुरं- ढोर तर लांबीचीच गोष्ट.वाऱ्यामुळे आवाज होत असावा.... असं कह्यात घेऊन आम्ही आमच्या गप्पा सुरूच ठेवल्या. दोन-तीन मिनिटात पुन्हा आवाज येऊ लागला, ह्यावेळी मात्र....छन छन.....पैंजाणाचा,काही क्षणाकरता काळजाचा ठोका चुकला ध्वनीच्या दिशेनं कानोसा घेत,विजेरी फिरवली!प्रकाश पडतांच ध्वनी बंद.सलग दोन- चार वेळा असा प्रकार घडला, दुसऱ्या बाजूने रस्त्यावरच्या कुत्र्यांचें कुवकुवणें ऐकू येऊ लागले,घडणाऱ्या घटनेची आगाऊ सूचना देतात असं म्हणतात.....! स्वप्नील जोरात ओरडला...! कोण आहे, रं तिथं? हिम्मत असेल तर ये समोर? आमचं लक्ष कुत्रांच्या ओरडण्याकडे वेधलं गेलं. माहीत नसताना, चेतावणी देणं योग्य नव्हे.......,स्वप्नीलच्या शब्दांना मी उद्देशलो, माझ्या वाक्याला हम्म...!म्हणत, सचिन ने होकारार्थी मान डोलावली. तुला काही दिसलं का....? सचिन ने विचारलं, स्वनिल माझ्या आणि सचिन च्या मधोमध स्तब्ध उभा, आमच्या तिघांची रेकी चालूच होती इतक्यात स्वनिलच्या बोटांनी दोघांच्या मनगटाच्या भोवती विळखा घातला. घाबरू नकोस आम्ही आहोत... सचिन म्हणाला, खरंतर, ती वेळ आमच्या घाबरण्याची होती, स्वनिल स्तब्ध, स्वप्नील उंचीला सहा फुट वरून धिप्पाड त्याची पकडं इतकी घट्ट होत गेली की आमच्या तळहाताला मुंग्या येऊ लागल्या. विचित्र नजरेने आमच्याकडे पाहत होता, त्याच्या डोळ्यांची काळी बुबुळ आता पांढरी ठप्प झालेली,अनोळखी भाषेत बोलत होता आवाज हि जड झाला होता,


स्वप्नीलची पावलं डोंगराच्या दिशेने म्हणजे पैंजणाच्या आवाजाच्या दिशेने पडायला सुरुवात झाली. त्याच्या शरीरावर स्वतःचा ताबा नव्हता हे ओळखताच घाबरून आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आवाज घशातच अडकला, शब्दच फुटेना,श्वास कोंडला जातोय हे समजत होतं तो आम्हांला खेचडत होता त्याला आवरणं आमच्या आवाक्या बाहेरचं होतं. हवेत गारवा असून आम्हांला अक्षरशः घाम फुटला. हात पाय थर-थरत होते स्वप्नीलच बोलणं सुरूच होत. हात सोडवण्यासाठी झटापट करत होतो, खांद्यापासून हात बधिर झाला तरी आमचे प्रयत्न चालूच होते सगळे प्रयत्न निश्फल ठरतं.मेंदूने काम करणंच बंद केलं काय करावं सुचतं नव्हतं, तेवढ्यात आमचा मागोवा घेत प्रशांत तिकडे आला, प्रथमदर्शनी त्याला कळेनाच काय चाललंय, नंतर स्वप्नीलच ते रूप पाहून क्षणभर तो हि भांबावून गेला तो समजून गेला आणि स्वप्नीलच्या मुस्कटात मारण्यास सुरुवात केली. स्वप्नीलवर त्याचा काहीही परिणाम झालाच नाही, अचानक मधेच स्वप्नील थांबला, हळू हळू त्याची मान माझ्याकडे वळली पांढरे फट्ट डोळे मुळ स्वरूपात काळे झाले, आपणं अजून इथे काय करतोय.....?


आमचे हात सोडून,स्वतःचे गाल चोळत....;काही घडलंच नव्हतं ह्या आविर्भावत स्वप्नीलने, प्रश्न केला. पुरता भानावर आला ह्याचा तात्पुरता आनंद होऊन सुटकेचा निःश्वास टाकला, अनर्थ अजूनही टळला नव्हता,उभ्या असल्या जागेपासून अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कापलं होत. मिट्टकाळोख.....स्मशान शांतता......समोर कुणीचं नव्हतं, आता आवाज फर्लांगभर येत होता, “दादा इथून निघू या...!” इति सचिन, सरळ घर गाठायचं, मागून हाक आली! मागे पाहण्याची विनंती केली! वळून अजिबात बघायचं नाही....! सगळ्यांना ठणकावून सांगत जीव मुठीत घेऊन घराकडे झपाट्याने पाऊलं टाकत होतो, रेल्वे इंजिनाच्या वेगाप्रमाणे हृदयाच्या ठोक्याचा वेग वाढतच होता त्याच वेगात, छन छन.....आवाज पाठलाग करत होता, श्लोक, जप जे सुचलं ते म्हणत होतो, राम राम असो, हनुमान चालीसा असो का गणपतीच्या नावाचा धावा असो, घर जवळ आलं आणि माझ्या पायाला काठीचा जोराचा फटका बसला,आई गं.....! माझा आवाज ऐकताच प्रत्येक जण पळत सुटला, प्रशांतचे आई बाबा दार उघडून खलेत(अंगण)आले. मी कसं बस लंगडत पळत होतो.शेवटी मीच होतो,छाती भीतीनं धड धड उडत होती, आमचा पाठलाग चालूच होता.घरच्या गेटला आतून कडी लावलेली, कडी उघडण्याची तसदी न घेता, गेट वरून कठड्यावरून उड्या मारत घराच्या खलेत घुसले, मी लंगडत लंगडत कठडा ओलांडून कसंबसं आवारात पोहोचलो. घडत असलेला प्रकार आई-बाबा बघतच राहिले, त्यांनाही समजेना काय झाले.


छन छन.... पैंजणाचा आवाज आणि आमच्यात काहीस अंतर.आई-बाबां समवेत भीती कमी झाली पणं हात-पाय लटपटंच होते. क्षणार्धात आवाज येणं बंद मित्रांनी एकमेकांकडे पाहिलं, पुन्हा आवाज आलंच नाही, आम्ही सुस्कारा सोडला आणि घरात गेलो. घडलेला सर्व प्रकार आई-बाबांना सांगितला, दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, ह्या प्रकाराबद्दल काहीच न बोलता  ‘मुलांनो आता झोपा उद्या उठल्यावर सविस्तर बोलू.....’ आई म्हणाली; घडलेला प्रकार डोक्यात चकरा मारीत,छन छन छन.... तोच तोच आवाज कानात घुमत होता,ती कोण होती? अतृप्त आत्मा, पिशाच्च, भूत....?? कैदासीन हडळ.....?? का चेटकीण....; वाटसरूनां झपाटणारा चकवा??.....असंख्य प्रश्नांनी मनांत काहूर माजवलेलं, हा विषय तिकडेच सोडून देयचं ठरवलं आज हि तो प्रश्न अनुत्तरित.....?


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror