अमोल धों सुर्यवंशी

Tragedy Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy Others

पाटीवाला... एक सुदामा

पाटीवाला... एक सुदामा

3 mins
307


गरिबीची मजाक नका उडवू मी सांगिल ते काम करीन पण आमची इज्जत करा साहेब.... एक धोतरवाला म्हाताऱ्या एका शेठ माणसाला बोलत होता हरामचं नाही मागत कष्टाच मागतोय माझे वीस रुपये द्या गुमान त्या शेठची बायको लय चिकट दहा रुपये देऊन गाडीत बसली शेठने त्याला गाडीच्या मागे जाऊन गपचूप अजून दहा देऊन टाकले आणि तिथून निघून गेला.... 


मुंबईमध्ये कोणीही उपाशी राहू शकत नाही हे खरं आहे जे पडलं ते काम करता आले तर तो मुंबईमध्ये राहू शकतो आणि आपली पाळेमुळे गाडू शकतो. मुंबईमध्ये अनेक परप्रांतीय आपल्याला दिसतात तसेच गुण्यागोविंदाने ते आपली कामे करून गुजारा करत असतात त्यामध्ये मजूर (हमाल) प्रमुखाने यू पी बिहार कडील लोक जास्त दिसतात. हे लोक स्वतः जे काम करतात तिथे आपल्या गाववाल्याला घेऊन येतात यांच्यामध्ये हे एक वेगळेपण दिसते. गुजराती मारवाडीसारखे कमी तिथे आम्ही नेहमीच असे ब्रीद मनी बाळगणारे भय्यालोक म्हणून ओळखले जाणारे ही माणसे कष्ट पूर्ण कामे करत असतात... मुंबईमध्ये डबेवाले खूप प्रसिद्ध आहेत ऐकलं असलं बघितलंसुद्धा असलं तुम्ही पाटीवाले हे कमी लोकांना माहित असेल हे लोक खूप मेहनती असतात यांचे राहणीमान हे खूप वेगळे आहे कुठे आणि कसे राहतात त्यांचे जगणे मांडण्याचा छोटासा प्रयत्न... 


ज्या दुकानाची हमाली करतात तिथेचं दुकान बंद झाल्यावर फुटपाथवर संध्याकाळ झाली की जेवण बनवताना दिसतात तिथे झोपतात असे हलाखीचे जगणं जगत असतात.. 


आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बघू शकतो सकाळच्या प्रहरी डोक्यावर भरलेली मच्छीची पाटी घेऊन वाहणारे ट्रेनमध्ये चढवून देताना जे हमाल दिसतात ते पाटीवाले महात्मा जोतीराव फुल मार्केट इथेसुद्धा दिसतात. सर्वांत जास्तीतजास्त यांची जमात मस्जिद बंदर, भातबाजार इथे दिसते. यांचं काम सांगितल्याप्रमाणे पडेल ते कोणाला मेन रस्त्यापर्यंत काही सामान घेऊन जाणे आणि त्याप्रमाणे पैसे आकारणे वजन कितीही असो ते उचलतात मस्जिद मार्केटमध्ये यांच्या हातगाड्यासुद्धा आहेत. काही लोक त्यावरून ट्रान्सपोर्टला माल पोहचवण्याचे काम करतात.. ही सर्व उठाठेव करतात व आपल्या गरजा पूर्ण करतात. अशाच एका पाटीवाल्याची कथा लिहावी असं ठरवले... 


रघु मुंबईमध्ये २०१३ ला आला तो मेडिकलमध्ये कामालासुद्धा लागला. काम काही जमेना त्याला एका मित्राने दुसरे काम बघितले भातबाजार केशवजी नायक रोड एका गोदामामध्ये मालगाडीतून उतरून घेणे, माल हातगाडीतून दुसऱ्या दुकानात पाठवणे पगार पंधराशे रुपये... तो काम करू लागला. पाटीवाल्यांकडून सर्व कामं करून घेणे दुकानाचे पेमेन्ट गोळा करणे... ही सारी कामे करत असताना तिथेच त्याची ओळख सुदामा काकाबरोबर झाली. ते एक ६० वर्षीय माणूस हातगाडी जोमाने ओढणारा आणि प्रामाणिकपणे काम करणारे काका. रघुची आणि त्यांची खूप जमे...काकांचा स्वभाव खूप छान होता म्हणून रघुला त्यांच्याबरोबर राहायला आवडे. सुदामा काका राहत होता तिथे पडेल ते काम करी व बाहेरील भेटलं ते काम करी. त्याला तीन मुलगे होते तरीसुद्धा म्हातारपणी घरी बसून राहणे त्याला जमत नसे. रघु त्याला सारखा बोले काका आता जा गावाला आणि नको येऊ पण सुदामा नाही म्हणायचा आता इथेचं मरायचं बाबा... म्हातारी होती तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता गावी मन लागत नाही. काका दणकट होता, उंचीने नाटका होता पण लय चपळ होता. साठीचा काका ऐंशी किलो वजन खानकनी उचले. सुदामा काका मराठी खूप छान बोलत असे. रघु त्याला कामामध्ये मदत करत असे. हातगाडीला धक्का मारणे, माल खाली करून देणे इत्यादी...


पाच वर्ष काकासोबत राहून रघु भोजपुरीही शिकला. त्याच्या गावी आजमगडला राहून आलेला होता. पाच वर्षांनी रघुने काम बदलले. २०१८ मध्ये काकापण गावी गेला. फोनवरून बोलणे होत असे. हळूहळू बोलणे कमी होऊ लागले. त्याचे कारण तो जेव्हा पण फोन करायचा तेव्हा काकांच्या सुना सांगत असत, बाहर गये है... परत काकाचा फोनपण येत नसे. काही दिवसांनंतर फोनवर सुनील काकांच्या मोठ्या मुलाने सांगितले, काका वारले म्हणून... विश्वास बसेना रघूला. तो काकांच्या गाववाल्यांकडे विचारपूस करायला गेला तर त्या गाववाल्यांनी सांगितले ते खूप धक्कादायक होते. सुदामाने फाशी घेतली. रघुच्या पायाखालची जमीन सरकली. अरे मी त्याला माझ्या लग्नासाठी बोलवणार होतो. त्याला सांगितलं होतं हे खरं आहे का? तर तो बोलला त्या चांडाळनींनी जमून म्हाताऱ्याला मारला. रोज भांडण करत होत्या. म्हणून ते वारले. सुदामा एक ६५ वर्षांचा माणूस कसा काय आत्महत्या करतो हे तर विचाराच्या पलीकडे आहे. तो शेतकरी नव्हता कोणी पडेल ते काम करणारा मजूर होता. त्याला स्वाभिमान खूप होता आपल्या हक्काचं कधी सोडत नसे. स्वावलंबी असल्यामुळे तो गेला तेव्हा त्याच्या पैशावर उड्या मारणारे आता त्याला विसरले कारण तो कमवत नव्हता म्हणून एक बाबाला तीन लेकरं सांभाळू शकली नाहीत. पण एक बाप तीन मुलांना जगवू शकतो हे खरं आहे... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy