अमोल धों सुर्यवंशी

Tragedy

3.3  

अमोल धों सुर्यवंशी

Tragedy

काजळी खोरे.

काजळी खोरे.

6 mins
1.2K


काजळी खोर हे जणू नंदनवन. कासणेत गावापासून जवळपास असलेले बैल डोंगराला जोडलेले धर्मा नदीच्या काटी वसलेले घनदाट जंगल आणि पक्षी प्राण्यांची राहिवट असणारे. तिथे शैतानाचा कसा जन्म झाला. आणि नंदनवनाचा भूत कारखाना सूरू झाला. आलाड बुध्दी जिवान मुळे अनेक रहश्य लपलेले आहेत असे हे भूताड खोरे

काजळी ओड्यावर तळे विभागाने मासे मारी बंदी केली. मासे मारणारे कातकरी समाजातील लोक मोठ्याप्रमाणावर जात होते व तिथे राहत पण होते त्या लोकांची वस्ती दिवसेंदिवस वाढू लागली लातूर मधून सांगलीतील बिड मधील जमाती उसांच्या तोडी साठी येणारी व काजळी ओड्यावर झोपडी उभारत आणि उसाची तोड झाली तरी ही परत घरी जात नसे ते लोक जून जुलै मध्ये निघून जात. काही लोक बैलदेव टेकडीवर आपला बस बसवून राहतात ते परत जात नाहीत कारण पावसाळ्यात पुराच्या फुगीने काजळी खोर्‍यात मासांचा चड चडतो नदीचे पात्र जवळ असल्यामूळे. नदीला पूर आला की तिथे राहण्यास गैर सोय होते म्हणून हे लोक वर डोंगरवार राहतात जगंल असलेल्या मूळे अनेक प्राणी आडळतात प्रामुख्याने लोकांनी हास्वली पाहिल्या आहेत म्हणून त्या खोर्‍याला  हास्वलिचे खोरे असे ही संबोधिले जाते त्या ठिकाणी हास्वली आणि अनेक प्राणी आढळतात म्हणून तळे विभागाने ती जागा अभयारण्य म्हणून घोषीत केली.

गावा पासून फक्त सात किलोमीटरवर असल्यामुळे नदी पासून ते थेट बैलदेव डोंगरा पर्यंत लोंखडी तारेचे कूपन केलेले आहे. पाऊसाळी पाणी भरते त्यामूळे फाॅरिस्ट ऑफिस घांगी तिकट्यावर उभारले आहे. त्या मुळे जनावरांची गावकऱ्यांना भीती नसते.

 तिन्ही ऋतू मध्ये हि जमात तिथे मासे मारी, डुकरांची शिकर करणे असले उद्योग करत असे प्रमुख्याने शिकार रात्रीची करत त्यामूळे त्याची तक्रार कळत नसे. शिकार करण्यासाठी गावाच्या हिरिकॅशनच्या लाईटचा उपयोग करत होते. आकडा डाकून तारेला करंट देणे. खेडे गावा मध्ये लाईटच्या खांबांवर आकडा टाकून लाईट चोरी करण्याचा प्रकार दिसतो तसे शिकार करण्यासाठी पण उपयोग करतात. या मध्ये पाणी पिण्यासाठी येणारी जनावरे आडकतात.  शिकारी मुळे आणि मासे मारी मूळी ही मोखाची जागा या लोकांनी निवडली होती.

 जूलै महीन्या मध्ये यांची टोळी निघून गेली थाप्पा आणि त्याचा मामे भाऊ सहपरिवार गेले नाहीत. थाप्पाची बयोक आणि तिन पोर पाल्टू याच नविन लग्न झालेल होत तोही हिथेच राहीला पाऊसाचे दिवस होते तरी यांनी तंबू हाटवला नाही, मासे भेटत होते चार पैसे जास्त मिळू लागल्यामुळे हे लोक हितेच थांबले. पाऊसाची सुरवात जोरात झाली पेरणी लोकांची झाली रोपच्या (लावनी) टोल्यात ढगात दुष्काळ पडला आणि लागवडीची घमघाय सुरू असल्यामुळे गावकऱ्यांनी तातोबा काकांना हिरिकँशन जोडण्यास सांगितले. दुपारी हिरिकॅशन जोडून झाले फ्यूज टाकून ठेवल्या. त्या रात्री थाप्पा सह परिवार झोपड्यात गार झोपली होते. हिरिकॅशन ची लाईट चालू आहे हे माहित नव्हते पावसाची झड सूरू झाली. आकडा काढलाच नाही तार गोळा करून झोपडीच्या वळचणीला ठेवली होती पाऊसाचे पाणी हळूहळू झोपडीत शिरकाव करू लागले आणि त्या पाण्या बरोबर करंट येऊ लागला आणि झोपी गेला थाप्पाचा सारा परिवार तडफडून मेला. या प्रकारची माहिती कोणालाही लागली नाही गावकऱ्यांना वाटले थाप्पाचा परिवर बैल डोंगरवार नाही आल्यामुळे हे सारे गावाला निघून गेले. तिन दिवसांनी ईखाचा भाऊ रक्षाबंधनासाठी बहिणीला घेऊन जाण्यासाठी आला तेव्हा त्याने पाहिला हा सारा प्रकार. तो दचकून गेला कोणाचे हात तूटलेत कूणाच डोक फोडलेल हे सार पाहून तो गावत आला.

सर्व गावकऱ्यांना सांगितले पोलिसांना घेऊन काजळी खोर्‍यात गेला. पोलिसांनी सर्वांच्या डेट बाॅड्या ताब्यात घेतल्या चिमूरडी पोर डूबून वहरफाळली व झोपीच मेले हे कोणाला माहिती नसल्या मूळे रानटी कूत्रांनी मृत्यूच्या बाॅडीचे खानडूळी केली असावी. काजळी खोर्‍यात जणांवराची ये जा असल्यामूळे ही त्यांच्या बाॅडीची हि हालत झाली असावी हे ही कारण असू शकते .

 थाप्पा कुटूंब व्यवहारिक होते . ह्या घटनेचा तपास चालू झाला पण पोलिसांना ही काही निदान सापडले नाही असे गावकऱ्यांनी सर्वांना सांगितले. त्या सर्वांच्या प्रेताला त्याच जागी आग्नि दिली ऐवढा मोठा घात घडला आख कुटूंब त्यात नाहिस झाल. या प्रकाराने गावात भितीचे थैमान घातले. नाक्या नाक्यावर चर्चा वेगवेगळ्या ऐकाय मिळत होत्या कोणी म्हणे हास्वली ने तर कोणी म्हणे कूत्रांने तर काही लोक सांगत भूतानी 

त्या घटने नंतर. त्या लोकांची कोणतीच टोळी या गावाच्या दिशेने आली नाही.

त्यानंतर दोन वर्ष गावतील एक कुत्रपण फिरकल नाही काजळी खोर्‍यात. गावातील हुशार तबांकू चुणा मळणार्‍यानी त्या विषयाला वेगवेगळ्या प्रकारे रंग वले आसा कोणता हि आसूर त्यांनी सोडला नाही जे पोलिसांना कळले नाही ते गावातील भुतगोल शास्त्रज्ञांना कळले व यांनी सरपंच याना सांगून हिरिकॅशनची जी जागा होती ती बदलवून घेतली. आणि जिथे ऊसाचे मळे होते गावाच्या जवळपास नदी लगत तिथे लावण्यात आले. गावातील महाभागांनी ऊसाकडे येणाऱ्या जगंली डूकराची शिकार करण्यात सुरूवात केली उसांच्या चारी भाजूने फलाटाला लाईट कंरट तारा गोपल्या व जनावर मारण्यात सुरूवात केली हा प्रकार गावातील माणसांना माहिती होता त्यामूळे तिकडे कोणी जात नव्हते .

झाले काय ?

गणपतीच्या सणासाठी मुंबई मध्ये असणारे चाकरमानी झाडून गावाला जातात गावी गेल्यावर हीकडे हिंड तिकडे फिर असे यांचे उद्योग सुरू असतात  

घळाने मासे मारने हा छंद जगदीश पाटील आणि सदाशिव लोखंडे या दोन दोस्तांना होता छोट्या डोहात मासे मारायला जायचे. आणि अचानक भयानक दुसर्‍या दिवशी ते दोघांनी ठरवले छडी घेतली काडू घेतले (गाडूंळ) आणि मळ्यातून खाली नदीच्या काटी जायच आणि निघाले. मुंबई मधून आलेली लेकर त्यांना माहीत पण नाही हा तारेचा प्रकार पहिल्या बांधावरून ऊडी मारली आणि तारा चुकवल्या वेळ न्हवती काळ आला होता खाली उतरताना कवळ काळीज करपून मेले दोघेही चिटाकले व जागीच ठार झाले. गावातील शिकारी भामट्याना हे कळताच त्यानीं जमून 

या दोघांना उचलून काजळी खोर्‍यात फेकून दिले आणि गावात बोंब ठोकली थाप्पाच्या च्या भुतांन पोरांचे लचके तोडलेत या भाड लोकाच्या काहणीना सुरुवात झाली. कोणी म्हणतो मी माझ्या सख्या डोळ्यान बघीतल सदाच्या छाताडावर बसला होतो आणि गळा दाबत रक्त पित होता थाप्पा खविस झालाय पोरांना सोडत नाही पुढे रचना रचत सुरात सुर मिसळून दुसरा म्हणतो जगदीश चा हात दगड मारून तोडला. आम्ही मशाली घेऊन पोहचे परंत हा घात सारा घडला. त्याना गावकऱ्यांनी काही उलट सूलट विचारल नाही कारण भुतांच प्रकरण असेल तर ते लिबूं मिर्ची आणि कोंबडी बकरीने सटलेमेंट करणारे हे ढोबळ लोक न्यायाची अन्याची भाषा कळत नाही त्यांना फक्त भूतांची भाषा कळती बाकी काही नाही.

 हे प्रकरण पोलिसांन पासून दाबून गाडल गेल. आणि काजळी खोर्‍यात भूतांचा जन्म झाला कोणा ताप आला कोबंड कापा थाप्पाच्या नावान. त्याची राखन सूरू करा तळतळाट करत राहतो त्यांच्या कुटूंबा बद्ल. सारा गाव रात्र झाली कि थाप्पा ओरडतो. मोठ मोठ्याने रडतो तो लहान मुलांना मारून टाकतो.

थाप्पाला पण भूतानच मारलय भूताच्या भवंडर मध्ये तो आणि त्याच्या परिवार घावला त्याच्या पोराचे काळीज काडले डोळे फोडले तडफडून फाडून खाल भूतांनी त्यांना. म्हणून तो बदला घेतोय रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना आडवतो.

सख्या म्हातारा हा तर महामनव म्हणाचा आर गड्यांनो एके दिवसी म्या तालूक्याला गेलो होतो गाडी सूटली. म्हणुन टाईम झाला गावात येताना कूपवात कूसकूस वाजत होत म्हणून लक्ष दिल नाही. असेल एखाद किडूक पण पुढे आलो तर एका गड्याचा आवज आला सख्याबा आर थांब गड्या मी तूला हाका मारतोय न तू पुढ जातोय हो गुमान विसरला हो मला आण थांबलो मी जरा माझ्या मनात पाल कुचकुचली घात होणार थाप्पा आसणार नक्कीच मग काय आता मेलो मी तरी पण भीलो नाय गड्या भनकवलो त्यावर थाप्पा गड्या का अस करतोय भिती दाखतो तू लोकांना आर काय पाहिजे तूला मग गेलो पुढ त्याच्या समोर कसला दिसतो. तो केशाचा झटा करून डोळे लपवले होते माझा बर बोला तो. ओळखल नाय हो ? ओळखल की भादरा काय? पाहिजे या गरिबाकडून तूला. म्हणतो तबांकू दे आणि मी दिला त्याच्या तोंडातून हिरवी लाळ गळत होती नख त्याची सुरा वाणी आहेत पाय तूटलेले आहेत पायातून रक्त वाहतय ते पण काळ कूट काही न विचार करता तबांकू दिला पण चूना नाय दिला. मी पण लय शाहना आय चूना दिला तर आपण मेलो तो बोला सख्याबा आर चूना कूठ आहे? मि बोल आर पडली डबी शोधून आणून देतो म्हणून वेळ भागवली व निघून आलो. गड्या ते मागे फिरलोच नाय. काही गावकऱ्यांनी तर पल्टू बरोबर मारामारी केल्या आहेत काजळी खोर्‍यात त्याला माती चारली आहे .

तेव्हा पासून शापित आहे काजळी खोर . भुतांचा वनवा फेटत आहे दिवस रात्र लोकाच्या मुखातून ऐकणाऱ्या काना परंत.......



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy