अमोल धों सुर्यवंशी

Others

2.5  

अमोल धों सुर्यवंशी

Others

कथा शौर्य एक स्वप्न भंग

कथा शौर्य एक स्वप्न भंग

5 mins
1.4K


माझ्या माय भूमीत विरांचे आखाडे

 मृत्यूला ही मातीत गाडूंनी

कणा कणात मिसळले असे हे रांगडे

देश रक्षणासाठी भकश होई

डोळीवर बांधूनी कफन

भारत मातेचा सुपुत्र सदा राही अमर

एक स्वप्न आहे साधारण शेतकरी मुलाचं

देशासाठी लढाईच देशासाठी मरायचं.....

कथा शौर्य एक स्वप्न भंग

वीरांनो सलाम तूमच्या शौर्याला..


.. अनेक घटना घडत आहेत सीमेवर.रोज एका कुटुंबाचा बुरूंज ढासाळतोय परिवार रस्त्यावर येतोय एका आईवडिलांचा आधार लुटला जातोय. तर एका बयकोचे जग हरपतय संसाराला वणवाच लागतोय जणू.या समाजात मुलांना बापावीना जगणे म्हणजे बोचरणारे घावच. तरी ही सीमेवर जाण्याची ईच्छा सर्वात जास्त खेड्यातील मुलांन मध्ये दिसते. विरांचे घर खेडे कपार तिथेचं लहानाचे मोठे झाले हे महाशुर .मरण देशा साठी जळते अंगारे होऊन.

या जळत्या आग्नि चा धग येवढा विशाल आहे कि हिथे प्रत्येक तरूण जळण्यासाठी तयार आहे हे प्रेम आहे देशावर माय भूमी रक्षणासाठी. एक महान देश माझा जय भारत असा.

कथा वास्तविक असावी तिला कल्पनेचे पंख असावेत पण ते सत्याकडे झेपवण्यासाठी

आणि जवानांची वास्तविक स्थिती अशी आहे की आता जवान युद्धात मृत्यू मुखी नाही पडत आहे तर शत्रू घरात घुसून पाटीवर वार करतोय . आरे त्या निचड पाकिस्तांनच्या लाड्यांची एवढी हिम्मत कुठे आहे कि समोरासमोर वार करतील.

आमच्याच देशा मध्ये यंत्रणा कमजोर झाले कि मृत्यू स्वस्त झाला आहे हेच समजत नाही

उरी मध्ये घडलेली घटना असो किंवा काश्मीरमध्ये घडलेली घटना चाळीस जवानांना जीव गमवावा लागला. युध्द भूमीवर येवढे ही मरत नाहीत. तेवढे अशा घटानान मध्ये बळी पडतायत एक माणूस येतो काय बाॅम टाकतोय काय म्हणजे सिमेवरच नाहितर सिमेच्या आत ही जवान मरत आहे . यंत्रणा कमजोर आहे किंवा आपलेच काही बिकाऊ आहेत

सैनिक हा स्वतंत्र दिवशा वेळीच आठवतो लोकांना आणि राजकारण्यांना सुध्दा हे विसरू नका

सिमेवर जाणारा प्रत्येक व्यक्ती हा गरिब कुटुंबातील असतो त्याला सेवत रूजूकरण्यासाठी हि दलालांना पैसे मोजावे लागतात हे वास्तविक सत्य आहे.


अमहदनगर...

 सकाळी पाचा ठोका कोंबडा बनवण्याच्या आधी उम्या बामणांचा डोंगर पार करून दुध खरेदी कराय गेला. धनगर वाड्यावर पोहचला भिरूबा उम्या बा कूठ हाय बा नाय येणार म्याचं येईन रोज व्यापार कराय. ये बाबा मरशील वाघ सुटलाय, गवाने. थैमान मांडलाय उद्या पासून बा ला धाड कळल का? भिरूबा मला माप कर पण बा ला ठावूक आहे आरे बा कमवतोय ना म तू का येतोय भिरूबा म्या आर्मीत जाणार आहे .आई नाय बोलते .मग पैसे पण नाहीत म्हणून शरीराला सकाळी लवकर उठाची सवय लावयची म्हणून येतो आणि कसरत पण होते ना गावातले बि. एम.मेजर बोले धावांची सवय राक म्हणजे होतय सिलेक्ट म्हणून येतो. भिरूबा करट्या मरशील जणावर आहेत .तालुक्यात आहे तालीम जा तिथे नको मी माझ्यान होईल ते करण आणि सिलेक्ट का काय झालेकी सांगीन तुम्ही आता कोनाला सांगू नका. वीस लिटर दूध घेऊन तो बामण कडा उत्तराचा म्हणजे त्याला काळीज लागत ते पण सुपा ऐवढ अस साद चालायला जमणार नाही कोणाला पण हा पट्या स्वप्नाच्या दुनियेत हरवला होता

 सैनिक बनावे हे भुत त्याला शाळेत चावल पी टी चे दशरथ गुरूजींनी मुलांच्या मनावर देश रक्षणासाचे धडे शिकवले त्यांच्या प्रेरणेने उमेशने ठरवले सैन्यात रूजू वाहचे

त्या दिवसा पासून तो स्वत ला तयार करत होता एकुलता एक मुलगा म्हणून आई चा नकार आणि गरिब परिस्थीतीचं घाडग म्हणजे काही सर्वात मोठे आव्हानच त्यामुळे उमेश भुड शाळा शिकत हे सर्व करी. देशाचा सैनिक बनण्यासाठी

कसरत शरीराला बळकट बनवते त्यासाठी आखाडे कशाला म्हणून डोंगर चढून दुध आने नदीच्या काठी जाऊन दगडी उचलून शेतामध्ये ताल घालणे तो या मार्गाने शरिर धडधाकट ठेवत होता.


नवी मुंबई

 रघुलीला मॉल गेटवर एक वाचमेन एका उनाड मुलाला धूत होता. मॉलमधील काही मुलींनी त्याची कंप्लिट केली होती तो मुलींना छेडत होता. त्यामुळे त्याला वाचमेन मारत होता थोड्यावेळाने तीथे गर्दी जमली लोक खूप जन्मल्यानंतर वाचमेन चा मॅनेजर आला व त्यांनी वॉचमनला सांगितले तु तुझे काम कर बाकींच्या गोष्टींमध्ये नाक नको खुपसू तू काय मोठा पोलीस लागून गेला नाहीस कळल पोलिसांचे कामे पोलिस बघून घेतली वॉचमेन भडकून बोलला असल्या भाडखाउकांना उभा पाडलं पाहिजे मॅनेजर नी धक्का मारला सांगितलं तू तुझं काम कर येते माझं चालतं सांगितलं तेवढं ऐक आणि जा हितून

 तो मुलगा ही त्याला उलट बोलू लागला तू माझ्या मॅटरमध्ये पडू नको नाहीतर तुला हानीन धरून. तितक्यात तो बोलला साल्या चार वेळा मिलिटरी ची भरती मध्ये पहिला आलोय फाडून तर दाखव तुला उभा फाडीन मॅनेजरने सरवासारव करून वॉचमनला बाजूला सारले व तो मुलगा निघून गेला थोड्या वेळानंतर सुनिल तिथे पोचला उमेशराव काय झालं रागारागानं तू घरी चालला तेव्हा तुला बोललो साला तिथे पण दाबून ठेवावे लागते स्वताला

कंटाळा आलाय या जीवनाचा आणि तिथून निघून गेला संध्याकाळी उम्या सुनिल आणि कांडी नेहमीच्या ठिकाणी भेटले बिल्डिंग नंबर सात च्या पाठीमागे त्यांचा अड्डा चार बिअर आणि पिणारे तिघेजण उम्या बसनिला दोन बियर पी तरीही त्याला चढत नसेल असा हा रांगडा गावठी म्हणून त्याला चिडत असत सुनीलनं विचारलं उम्या गावाला जाणार की नाही

 भाऊ धाडशी उठला आणि रडत रडत बोलत होता स्वप्न काय होतं आणि आता आलोय कुठे कसं दाखवू गावाला( हात फिरवून) दाखवू गावाला तोंड काय माझ स्वप्न होतं मी आता मी काय करतोय . बघ माझ्याकडे आरे गावाकडली नदीच्या ढोहत कसे डोकावून बघू लाज वाटते जिथे मी कसरत केली अरे नदीच्या तपासून माझ्या फौजी प्रतिबिंब वर येणार कसं विसरु लाचारीसाठी किनारा येऊन आदळून तुटलं

(रडत रडत)कसं सांगू त्या उंच बामन डोंगराला माझ्या स्वप्नांना पेक्षा कमी झोकायचो पायाने तुडवत त्याला नमवायचो स्वप्नांच्या महत्त्वाकांक्षेने . त्याच्याकडे पाहायची ही लाज वाटलं हासेल माझ्याकडे बघून उंचपणाचा माज आहे त्याला.

कांडी भाई तूला जाम झाल्या झेपणार नाही बस कर

उम्या आरे नाहीरे थोडा जावदे भिरूबाची आठवण आली

 कसं तोंड दाखवू त्या भिरुबाला त्याच्या वाघांना आणि गवांना हिसकावून लावलं होतं त्या जंगलांमधून आईच्या मनात नव्हतं रे बापाच्या मनात होतं माझ्या शूर विचारांना त्यांचा पाठिंबा होता गरिबीनं वरला असेल पण मागे सरला नव्हता .

कसं जाऊ गावाला जिथे पावलापावलावर माझ्या घामाचे दवबिंदू आहेत त्यांना आता उडवण्याची ताकत नाही रे माझ्यात .

माझ स्वप्न अशी भालेदार टोपी डोकयावर आणि हातात बंदूक आयटी मध्ये चालणारा रुबाब फक्त तेवढाच पाहिजे होता. पण काही भाडखाउ मुळे असं नाही होता आलं सीमेवर मलाही जायचं होतं आताही जावसं वाटतं तिथे जाऊन बघायचंय लढायचं आहे वेळ पडली तर मरायचं पण आहे 


Rate this content
Log in