अमोल धों सुर्यवंशी

Others

3  

अमोल धों सुर्यवंशी

Others

हिन शिवाय हिंक मिळत नाही

हिन शिवाय हिंक मिळत नाही

6 mins
916


आदर्शवादी विचार जपावेत त्यातून निर्माण होते प्रेरणा. जसे शिक्षणाचे कोणतेच वय नसते तसेच वय वाढत गेले म्हणून थांबू नये.जो पर्यंत किर्डीचे बांबू रचत नाहीत तो पर्यंत आपल्या गुरूचा उपदेश आणि आई वडीलांचे संस्कार विसरू नये. या पेक्षा मोठ ज्ञान काहीही नाही .

ज्ञान हेच सन्मान चिन्ह आहे जगण्याची खरी ओळख दाखवणारे खोट्या ला हरवणारे सत्याला मरण नाही ते अनंत आहे तसेच त्या शितिज्याला गवसणी घालण्यासाठी शिक्षणाची लाठीच कामी येते.

हे एकमेव अबाधित सत्य आहे...

जय शिवराय....

हे माझे प्रेरणादायी स्त्रोत..

मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य रक्षिले.लढले बेभान रंणभूमी असे हे राजे युक्तीने आणि बुध्दी च्या बळावर. गनिमी कावा दाखवून शत्रूला पाणी पाजले असे आमचे दैवत एकच शिवराय..

मोडेन पण वाकणार नाही धडा पासून शिर आलक केले तरी नमले नाही असे महाराष्ट्रचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराज शक्तीच्या बळावर गड किल्ले जिंकले एक हि लढाई हारले नाहीत असा हा महायोधा जगाच्या पाठीवर कुठेही दिसणार नाही.अभिमांनी संभाजी राजे.

 मरेपर्यंत माघार घ्यायची नाही लढत राहणे प्रत्येक शहनी. झुंजावे स्वतःशी स्वताला घडवण्यासाठी परिस्थिती ची जाणीव होई पर्यंत एक नवे वादळ होण्यासाठी. अशी शिकवण मिळते या दोन महान झुंजार युध्दाकडून ...

जय महाराष्ट्र माझा....

अशा महाराष्ट्रात आमचा जन्म हेचे आमचे भाग्य समजतो.......

हिनवल्या शिवाय हिंक मिळत नाही.

अनेक महापुरुषांच्या बाबतीत अशी कोणती ना कोणती घटना घडली त्यामूळे त्याच्या मध्ये एक वेगळी संवेदना निमित्ती झाली. त्यांनी स्वताला बदले म्हणून ते आता आपले आदर्श आहेत. हे नक्कीच माणूस स्वताची कमी दाखवत नाहीत पण दुसर्‍याला चूकीचा ठरवून दवंडी पेटवतो त्यात कसला आनंद मिळतो हेच समजत नाही.

अशा वरबडत्या परिस्थितीतून जगणार्‍या एक उनाड गावठीची..कथा

सातारा मध्ये असलेले नानेल गावतील नारायण गुरव यांची कथा आई वडील फार श्रीमंत तेही मनाचे. बाकी पदरी डपकेच शेतावर पोट आणि हातावर मत येवढीच वडीलांची संपत्ती.

आजोबा देव माणूस पावन्या गावी गुण्यागोविंदाने खपला पण खुप जोडल त्यांन आजी बरोबर लग्न झाल्यानंतर घरजावाई म्हणून तिथे च राहिला म्हणुन तो तिथला पावना नारायण चे वडील कष्टकरी होते. आई भाबडी ती पण घर कामा बरोबर शेतात राबे नारायण हुशार मूलगा चोर्‍या करण्यात. शाळेत म्हणून निघणार व माळावर जाऊन कोंबड्या चोरी करणे ग्रामपंचायतीच्या दवाखान्यातील काॅडंम चोरी करणे असा रोज उद्योग याचा चोरटा टग्या रोज बाबाचा मार खाल्या शिवाय झोप लागतच नाही त्याला आई त्याची बाजू घेई बाबा समोर असल्यावर आणि बाबा निघून गेले कि मग काय अशी झोडपून काढी की नारायण महिनाभर चोरी करणे सोडून देई पण म्हणतात ना बेवडा नाही म्हणला तरी दारू पितो तसा नारायण आहे सुधारणा फक्त फाट्यावर. त्याला म्हैसी घेऊन चराय जाने आवडते मासे मारणे आणि चोरी करण यामुळे त्याचे जास्त मित्र नाहित सतत भांडण करत असे चिडका, त्यामुळे त्याला खेळण्यासाठी कोणी घेत नसे. त्यामुळे नारायण एकटा पडत गेला त्याला सर्व सर्किट म्हणून चिडवत असत त्याला पोरांचा वैताग यायचा दहावी शिक्षण पुर्ण करून तो पुण्यात कामासाठी मामाकडे आला. किराणा स्टोर मध्ये काम करू लागला पण तीथे पण चोरी करे गल्यातील पैसे चोरतांना सापडला व साहेबांनी काढून टाकल कामावरून मग काय परत गावाला गावात येऊन नवीन च लपड सुरू केल त्याने रिना नावाच्या मुलीच्या मागे लागला. खूप दिवस झाले पण पोरीन त्याला दाद नाही दिली हा रोज तीच्या मागे सारा गाव फिरत असे तिच्या भावाला समजले मग काय नदीच्या काठवर पकडला भाऊला आणि चोपला सारा गाव थूथू करत होता बाबांनी तर त्याची काकड आरती काढली दुसर्‍या दिवशी नारायण सकाळच्या बसणे मुंबई ला भावाकडे तो गोदाम मध्ये कामाला लागला काम करी पगार मिळेल तो भावाकडे देत जाई तीन महिन्यांने तो जत्रेला गावाला निघाला भावाला बोला दादा मला पैसे दे मी गावी जातोय भाऊ बोला मी गावी पाटवले आहे माझ्याकडे पैसे नाहीत दोघात बाचाबाची झाली व तो तिथून निघून गेला मुंबई हे शहर कोणाला ही उपाशी झोपू देत नाही ज्याच्या मध्ये स्वताला झोकून देऊन प्रामाणिकपणे कष्ट केले तर तो खरा मुंबईकर झाला हे नक्कीच या माया नगरीची मायाच वेगळी सकाळी धावणारी संध्याकाळी धावणारी अशी हि भूमी नारायण ला भावाने फसवले तो कामात राहू लागला गोदाम संध्याकाळी बंद झाल की तो कड्यावर झोपे त्याबरोबर दोन बिहारी कामातील मित्र हि राहत जेवायला बाहेर रस्त्यावरचे भेटल ते आशा परिस्थितीत राहीला पैसाचे महत्त्व समजले पाऊसाचे दिवस होते नारायण आणि त्याचे मित्र गोदाम च्या बाहेर जेवन बनवत होते त्यानी जेवणाचे सर्व सामुग्री घेतली होती आणि बाहेर खाण्यापेक्षा स्वताच बनवत पाऊस आला की बाहेर जेवत, पाऊसाळी झोपण्याची हि गैर सोय होई एक दिवसी जोरात पाऊस पडत होता नारायण ने ताडपत्री घेऊन झोपला होता पण पाऊस ऐवढा मोठा होता की तो संपूर्ण भिजला. हे सर्व बाजूच्या गोदामच्या मालकांनी हे सार बघितले आज्याज भाईला दया आली व त्याला आपल्या घरी घेऊन आले. नारायण एका मुस्लिमांच्या घरात जाताना खूप घाबरला घरात गेल्यावर जात बदलायला बोलल मोठ्याचे मटाण दिल असे विचार मनात येत होते तो घरात जाईनाच आज्याज बोले ये नारायण नको मी बाहेर झोपतो. आरे तू महिमान आहेस बाहेर झोपलास तर अल्ला माफ नाही करणार मला ये आत निझिम पाणी घेऊन आली आज्याज नी सर्व हाकीकत सांगितली. निझिम बेटा नाम क्या तेरा नारायण खाना खाऊगे नको आज्याज आरे निझिम वो गाईच मास आहे ना दे त्याला खायाला नारायण काय वो भाई मी चालो निझिम बच्चेको मत डराव आरे तो आल्या पासून बघतोय दोषी नजरेने काही ना काही तरी शोधल्या सारखे किवा हरवलेल्या सारखे त्याचे मन आणि डोळे थुर झालेत कळतय मला नारायण तू हिंदू नाही आहे. नारायण वो याड लागल का? आरे तू माणूस आहे आणि मी सुद्धा एक साधारण माणूसच माणुसकी जपतोय धर्म नाही .समजल तूझे अम्मा आणि आबा तसाच अम्हाला समज कळल? ये, जेवायला. मोठ्याच नको!! नाही रे राजा ये. तुझ शिक्षण किती झाले आहे ? कुपटा पर्यंत काटे लागत होते सोडून दिल, म्हणजे दहावी पास आरे मग पुढे काय भात काय द्या काही नाही दोन महिने कामात भरणार आणि गावी परत मुंबई नको बाबा शेती खुप आहे करीन काय तरी

छान आहे जा गावी तु ऐवढा का भित होतास काही नाही असचं तू दोन महिने हितेच राहा तुमची मुल कुठे असतात ते वेगळे राहतात आणि आम्ही वेगळे तू नक्की राहा हिते उद्या सांगतो का काही नाही झोप आल्या जाऊ का जा निझिम अच्छा बच्चा हे..

सकाळी आज्याज ने त्याला उठवले नारायण तयारी करून निघिला आज्याज माझ्या बरोबर चल ठिक आहे आणि दोघेही घरा बाहेर पडले कामत गेला कामावर सर्व मित्रांना सांगितले की तिकडे राहायला जाणार आहे. काही मैत्रांना राग आला हिंदु आहेस आरे ते आपले शत्रू आहेत जाऊ नको गोड बोलून तूझा धर्म बाटवेल मुसलमान आहेत ते कळल.

नारायण मी तरी कुठे चांगला आहे चोर आहे अवल चोर आहे. नारायण कामावरून सुटल्यावर दोघे परत घरी आले आज्याज ला त्यांने सांगितले सर्व प्रकार आज्याज बोला विश्वास नसेल तर तू जा हितून आरे महाराष्ट्र हि कर्म भूमी आहे आमची समजल पाटीवर पाठीवर वार करणारे नाही. आम्ही जावद्या ना आज्याज भाई मला नाही फिकीर या लोकांची. आज्याज भाई धर्म श्रेष्ठ आहे पण तो काॅम पुरता समजल? जाऊ द्यांना आरे, नारायण विस वर्षा पासून आग जळते मनात म्हणून आम्ही विष पेरत नाही कळल... काय नारायण आज्याज भाई मला तू माला राग नव्हता आणायचा माप करा मी चांगला असतो तर तुमचे सिगरेट नसती चोरली ... माणूस मतलबी असतो त्याला आपल ते आपलंच कळत. आरे मी सिगारेट नाही ओढत, मी तुझ्यासाठीच आणले आहे. तू चूक माफ केलीस हे बर केलेस. नारायण विषय बद्द्लण्यासाठी बोला आज्याज स्वभावाचे चांगले होते पण रागीट पण मग घरी पोचले. आज्याज भाई नारायण तू शिक्षण पूर्ण कर मी मदत करतो नको मी गावी जाणार आहे आरे गप्प साला त्या बापावर दया कर नालयक आरे तूझ्या पदरी फाटक जगणे नको यायला म्हणून तूला दुर केला आहे. त्याच्या मनात खंत निर्माण होईल उनडग्या पोराला समोर बघून कळल का तूला हो आता तू जेवन करून घे उद्या पासून कामावर जाऊ नको..

उद्या पासून काॅलेज ला जा नारायण भाई मी शिक्षण पुर्ण करेन पण काम करून रात्र शाळा आहे का कुठे? वा हुशार मेरा भेटा आज्याज ला अवडले. त्याचे शब्द आणि त्याचा संपुर्ण खरच करून त्याला काॅलेज प्रवेश मिळवून दिला....

आज्याज भाई चे उपकार नारायण कधीच विसरला नाही आता नारायण एका मोठ्या कंपनीचा नॅशनल मॅनेजर आहे......

उपकार करणारा धर्म बघत नाही किंवा धन हि बघत नाही जातीची भाषा म्हणजे एक खुन केल्यासारखा गुन्हा हेच माणुसकी पणाची भावना. ....


Rate this content
Log in