अमोल धों सुर्यवंशी

Others

2  

अमोल धों सुर्यवंशी

Others

व्यथा पोटतिडकीची

व्यथा पोटतिडकीची

2 mins
160


आता आम्ही सामान्य माणस आहे की नाही हेच कळत नाही कारण आता आरामात घरी राहतो तुमच्या बोलण्या प्रमाणे. आता  दिवसा झोपतो रात्री झोपतो ते ही मुलां बाळा सोबत  उपाशी.. कसा जगतोय याची परवा राजकारणयांना नाही या सग्या सोयऱ्याला बर का,,  त्यांनी साठवलेले खरंच करत असतील.. किंवा लुटलेल. असो पण आम्ही रोज कामवतो गाढवा सारखं (बोलात  तरी अपमान नाही होणार) कारण आता लाचार झालो आहे या फाटक्या परस्थितीचा ते ही तुमच्या मुळे. आमचं जगणं असं आहे की आम्हाला ताण भागवन्यासाठी रोज विहीर उपसावी लागते...तेही  उरा पोटाने. तेव्हा कुठे माझा परिवार त्या दिवशी पोट भर अन्न जेवतो. आणि त्यावेळी आनंदाने झोप ही लागते ही मेहनत प्रमाणिक पणे करतो. आता झोप  ही लागत नाही गेल्या सहा महिने देणी कशी भागवावी या विचार वेडा करून सोडतो खूप वेदना भोगतोय आम्ही...आणि तुमचा पंधरा दिवसाचा लॉक डाउन उघडत नाही पंधरा पंधरा म्हणता म्हणता आमच्या बाराव्याचे जेवण जेवलं तुम्ही पण तुमचे पंधरा काय संपत नाही. कडू आहे पण तिखटासारखं जोम्बल पायजेत हे शब्द... हे जे आम्हांला छळतय कोरोनाच भूत मोठया लोकांनी केलेली करणी आहे आमच्या वाईटावर उठली आहे. राव.भोग आमचे कसे मानावे तुमचे आभार त्यासाठी ही दंडवत तुम्हांला. चीनचा रोग भारतात मोठा होतोय  आणि भारतातील गरीब रस्त्यावर येतोय त्याच्या स्वागता साठी दिवे आणि ताटल्या पीठऊन घेतल्या तुम्ही पुढे आमची जोरात वाजणार आहे हे कळविण्यासाठी हा उठाठेव होता की काय  असो आता चालू झालं आहे सगळ बस मधी मेंढर भरतात तशी गर्दी चालते त्यांना रोग होत नाही  पण ट्रेने प्रवास केला तर कोरोना होतो बर का ट्रेनमधी कोरोना आमचीच वाट बघत बसला आहे काय चालू आहे हिते पण मोठया पगार वाल्याना सूट दिल्या साहेब बस चे बजेट वाढवायचं आहे का म्हणून आम्हाला दाणीला देताय...न्यूजवाले आमचे वैरी झाले आहेत त्यांना आमच्या गावातील मुले कोरोनावाले बोलतात आज हिते एवढे सापडले उद्या हिते येवढ सापडले आरे सापडू दे लोकांचे मनोबल खच्ची होतेय. चार महिने यांनी बातम्यांचा पाक गिरगठ घाना केला आहे ही लोक माणसाचा तिसरा डोळा आहे पण हीच माणसांचे डोळ फोडू लागले न्यूज बघून भिकेला लागलो.... मुलांचे शिक्षण आता ऑनलाईन झालं आहे मोबाईल कुठे आहे आमच्या कडे गरीबाची थट्टा लावल्या तुम्ही असं जागा आणि असं राहावा हिते खायला भाकरी नाय आणि मास्क लावा कसा सामना करायचा आम्ही या संकटाचा ते तुम्ही बोला संकट म्हणजे रोग नाही आता तो होहून पण बरा झाला असेल आता समोर खूप आव्हानाना तोंड द्याचं आहे त्या बदल बोलतोय महागाई दिवसेंदिवस खूप वाढत आहे अजून वाढणार लॉकडाउनमध्ये काही देशभक्तांनी तर वस्तू किमतीपेक्षा जास्त पैसे घेतले आहेत. त्यांना कोरोना झाला तर लय बर होहील. पण आता महागाई कमी होणार नाही या लाचारीमध्ये आमच्याकडे लक्ष टाकावं काहीतरी उपाययोजना करावी आम्ही कोणाचं घोडं नाही मारलं की आम्हांला असं जगावं लागत आहे एक वेळ कोरोना होऊन मेलो तरी चालेल पण उपासमारीने नको... रोग थांबवा जनजीवन व्यवस्थित चालू द्या.फायदा बघण्याचे दिवस नाहीत लूटमार करून नका...... जगू द्या......... दुःखात ते ही आनंदाने...


Rate this content
Log in