पाणी आहे का?
पाणी आहे का?

1 min

15.8K
गर्मीचे दिवस आणि त्यात तिच्याजवळ विनाकारण बोलणे म्हणजे भर दुपारी उन्हात उभं राहून उष्माघाताने मरणे होय. असं मला वाटायचं पण ती तर भलतीच थंडगार सावली निघाली..!
ती आणि मी एकाच लायब्ररीत जायचो आणि कधी कधी एकमेकांच्या बाजूला पण बसायचो पण कधी बोलणं काही झालं नाही. म्हणून म्हटलं की काही करून बोलायचं . गर्मीचे दिवस असल्याने सगळ्यांकडे पाण्याची बाटली सोबत असायची. तिच्याशी बोलायचं म्हणून मी दुसऱ्या दिवशी पाण्याची बाटली सोबत घेतली नाही किमान पाणी मागण्याच्या निमित्ताने तर आमचं बोलणं होईल.
मग शेवटी घाबरत घाबरत धीर करून तिच्याकडे पाहिलं आणि तेवढ्यात तिने पण माझ्याकडे पाहिले.
पुढे दोघांच्या तोंडयातून एकच प्रश्न बाहेर पडला...
"पाणी आहे का ????"
तात्पर्य:- तहान दोघांनाही लागली होती