Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here
Independence Day Book Fair - 75% flat discount all physical books and all E-books for free! Use coupon code "FREE75". Click here

Sameer Govind Gudekar

Comedy


3.7  

Sameer Govind Gudekar

Comedy


भेटली ती पुन्हा

भेटली ती पुन्हा

2 mins 9.1K 2 mins 9.1K

मला अजूनही आठवत आहे की काही वर्षांपूर्वी तिच्या चारित्र्यावर अनेकांनी शिंतोडे उडविले होते त्यानंतर ती गायब झाली होती. मधून मधून तिची आठवण यायची तस पाहायला गेलं तर तिचा राग मलाही येऊ लागला होता.तिन सर्वांचा विश्वासघात केला होता. याआधी प्रत्येक वेळी माझ्या संकटकाळी माझ्यासाठी धाऊन आली होती पण मी देखील इतरांच्या सांगण्यावरून तिच्यावर संशय घेतला.त्यादिवसापासून आई देखील तिचा राग करू लागली होती. तिचं घरी नाव घेण देखीलं वर्ज्य होतं घरी आणणे राहिले दूर.! हॉस्टेल वर होतो तेव्हा तीला आणायचो कधी कधी रूमवर! त्या वाईट प्रसंगानंतर मला तिचा खूप राग येत होता पण खरं सांगू का? मला तिची आठवण खूप यायची पण शेवटी आईपुढे मी नमलो.

    मला ती अजिबात आवडत नव्हती हे जरी खरं असलं तरी आता ती पुन्हा आली आहे आणि मी तिला केव्हाच माफ केलं आहे.ती पुन्हा आवडू लागली आहे कारण आता तिच्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही . शेवटी दोन मिनिटात तिने मन जिंकल होतं! आईने तिला अजिबात माफ केले नाही. राग करते. पण आई जेव्हा बाहेर तेव्हा पूर्वीसारखं आताही तिला घरी आणतो.तिच्यासोबत TV पहाणे मला अजूनही खूप आवडतं..! 

एकदा आई घरी नसताना तिला आणलं .ती गरम पाण्याने अंघोळ करत होती आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत होतो .आई घरी यायच्या आत सगळं उरकून घ्यायचं होत. सुगधं दरवळत होता आणि मला विरघळवत होता.शेवटी ती वेळ आली ती बाहेर आली तेव्हा अगदी हळद लावलेल्या नवरीप्रमाणे दिसत होती. तिला पाहून मी एकदम सुखावलो..मला राहवलं नाही म्हणून मागचा पुढचा विचार न करता पहिला घास तोंडात घेतला..

Maggie !! I love you So Much❤

  


Rate this content
Log in

More marathi story from Sameer Govind Gudekar

Similar marathi story from Comedy