Sameer Govind Gudekar

2.5  

Sameer Govind Gudekar

गुरुत्वाकर्षण

गुरुत्वाकर्षण

1 min
2.0K



एकदा मी आणि माझी प्रेयसी नदीकिनारी आंब्याच्या झाडाखाली गप्पा मारत बसलो होतो. नदी अगदी शांतपणे वहात होती.इतक्यात एक आंबा आमच्या जवळ पडला आणि मी लगेच ओरडलो न्यूटन ! तिने माझ्याकडे रागाने पाहिले आणि त्वेषाने विचारले कोण ही नूतन ? तिचा आणि आंब्याचा काय संबंध ? कधी मला तिच्याबद्दल सांगितलं का नाहीस?
” गुरुत्वाकर्षण ! गुरुत्वाकर्षण ! गुरुत्वाकर्षण ! “, असं म्हणून शांत झालो.
हे ऐकताच ती अधिकच चिडली. गुरू! (ती मला प्रेमाने गुरू म्हणायची कारण तिला वाटायचं की ती बरसो रे मेघा मेघा मधली सुजाता -ऐश्वर्या राय आणि मी गुरुकांत देसाई! कसाही) गुरू तुला तिच्याबद्दल आकर्षण होतं? आता आपलं हे शेवटचं ब्रेकप..! चल मी निघते, असं म्हणून पाय आपटत आपटत निघून गेली.!

-आला मोठा शाइनटिस्ट


Rate this content
Log in