STORYMIRROR

Pradnya Tambe-Borhade

Horror

3  

Pradnya Tambe-Borhade

Horror

ओढ तुझ्या प्रेमाची

ओढ तुझ्या प्रेमाची

8 mins
162

रवी देखणा,उंचपूरा, गालावर खळी पडणारा,अत्यंत हुशार मुलगा. त्याला आयुष्यात सर्व गोष्टी मनासारख्या मिळत होत्या. आपली नोकरी करण्याची इच्छा देखील लवकर पूर्ण होईल असे रवीला वाटत होते. रवी अनेक ठिकाणी नोकरी मिळवण्याकरता मुलाखतीला जात होता. परंतु, रवीला नोकरीत मिळवण्यात अपयश येत होते.


रवीला नोकरी सरते शेवटी मिळेल का...?? रवीच आयुष्य कस आकार घेत जाईल हे आपण पाहूयात...!!!!


रवी : आई, बघ ना. कधी मिळणार आहे मला नोकरी. इतक्या ठिकाणी मुलाखत देऊन सुद्धा सतत काही ना काही कारणाने नोकरी मिळत नाही. देव माझ्या पदरात अजून किती नैराश्य देणार आहे काय माहित..??


आई : अस धीर सोडून कस चालेल. तू हुशार आहेस. शिकलेला आहेस. तुला हवी असणारी नोकरी नक्की मिळेल. हे घे दही- साखर.


रवी : (स्मित हास्य) येतो मी आता.


आई : सावकाश जा. होईल सगळे नीट.


रवी : आजचा दिवस मस्त उगवला होता. आई, हा पेढ्याचा बाॅक्स देवाजवळ ठेव. आनंदाची बातमी आहे. मला नामांकित आय. टी. कंपनीत नोकरी मिळाली.


आई : मी बोलले होते ना तुला. देवपूजा करताना आज मला प्रसन्न वाटत होते. काहीतरी चांगले घडणार सतत वाटत होते. तसेच झाले.


रवीचा आज नोकरीला जाण्याचा पहिला दिवस. आईने रवीला आवडणारी मेथीची भाजी, प्रसादा सारखा केळ घालून शिरा डब्यात भरुन ठेवला होता. आज पासून माझ्या मुलाच्या आयुष्यात अश्याच आनंददायी घटना घडत जावो.


आई : रवी, हा घे डबा. वेळेवर जेवण कर. नोकरी वरचा पहिला दिवस आहे. हळूहळू सवय होईल कामाची तुला. कामाच स्वरुप एकदा समजल की जमेल तुला सगळे काम.


रवी : किती काळजी करतेस, आई. काम समजून घेईल मी. बर, येतो मी आता. पहिलाच दिवस आहे. उशीर नको पोहचायला. इथेच तूझ्याशी नेहमी सारख्या गप्पा मारत बसायचो.


रवी कामावर जातो. कामावर जाण्याची उत्सुकता आणि नोकरी मिळवण्याच्या आनंदात वेळेआधीच कामावर पोहचतो. आधीच्या शिफ्ट मधले अजून काम करत असतात. पुढची शिफ्ट सुरु होण्याआधी साफ-सफाई सुरु असते.


सीमा : जरा थांबता का...?? इथे कचरा गोळा करुन ठेवायचा आहे. थोड बाजूला सरकता का.


रवी : माफ करा. मी माझी शिफ्ट सुरु होण्या आधीच आलो आहे. माझा आज पहिलाच दिवस आहे.


सीमा : अच्छा. संपलेच इतक्यात शिफ्ट. पुढची शिफ्ट सुरु होण्याआधी सफाई चालू असते.


रवी : अच्छा.


रवीचा कामावरचा दिवस सुरु होतो. पहिलाच दिवस असल्याने कंपनी विषयी माहिती असणारे पी. डि. एफ वाचायला देतात. कामाच थोडक्यात स्वरुप समजावून सांगतात.


आई : कसा गेला आजचा दिवस. आवडल का काम तुला. डबा वेळेवर खाल्लास ना.


रवी : आई खाल्ला मी डबा वेळेवर. छान गेला दिवस. तू बनवलेली मेथीची भाजी, शीरा लाजवाब बनवला होता.


आई : पुरे आता कौतुक माझे. आवरुन ये खाली. मी चहा बनवते.


रवी : कामावरुन आल्यावर तुझ्या हातचा असा चहा मिळणार असेल तर...., आधीच नोकरी का नाही मिळाली मला असे वाटते आहे????


आई : जस काही मी तुला कधी चहा देतच नाही. अस बोलतोस......


रवी : मस्करी करतो ग. आज दिवसभर घराबाहेर राहून तुझ्या हातचा चहा पिण्यात वेगळेच समाधान वाटत आहे.


रवीला नित्यनियमाने कंपनीत येऊन बघता बघता सहा महिने देखील पूर्ण होतात.रवीला आता कामाची आवड निर्माण होऊन काम जोमाने सुरु होते.


आई : आज काय भाजी देऊ , रवी.


रवी : तू बनवलेली प्रत्येक भाजी मस्तच बनते. आता माझे मित्र देखील माझा डबा माझ्या वाट्याला येऊन देत नाही.


आई : हे मला महिन्याभराताच लक्षात आले तू कामावर गेल्यावर. एरव्ही न आवडणारी भाजी देखील कश्या काय संपतात.नंतर लक्षात येत गेलं माझ्या. म्हणून मी भाजी थोडी जास्तच देत होते.


या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर राहिलीच ना....

ती म्हणजे सीमा आणि रवीची कंपनीमध्ये रोज गाठ होत असायची. संवाद जरी होत नसला तरी एकमेंकाकडे पाहून हसून दोघे पुढे जात होते.


रवी : अरेच्चा , सीमा आज दिसत का नाही. मला अस का होतं आहे आज.


सीमा : (दुस-या दिवशी) झाडाखाली रडत बसलेली दिसते.


रवी : सीमा जवळ धावत येतो. काय झाल तुला. का रडते?? काल आली नव्हती तू कंपनीत.


सीमा : काही नाही. मी ठिक आहे. एवढे बोलून निघणार इतक्यात....


रवी : आपण ओळखतो एकमेकांना , मी कंपनीत रुजू झाल्यापासून आपली ओळख आहे.


सीमा : आपणहून तुम्ही माझी चौकशी करत आहात. यामुळे तुम्ही मला खूप आवडता.


रवी : काय?? बोलली सीमा तू. परत बोल.


सीमा : (लाजून) काय नाही ते चुकून.


रवी : सीमाकडे एकटक पाहू लागला. आज सीमा वेगळीच दिसत होती. लाजेने गुलाबी झाली होती.


सीमा : येते मी.


रवी : थांब. सांग तर काय झाले. रडण्याचे कारण तर सांगितलेच नाही मला.


सीमा : उद्या सांगते.


रवी : रात्रभर सीमाच्याच विचारात असतो. खरतर पहिल्या क्षणी पाहताच सीमा आवडली होती. उद्या कंपनीत गेल्यावर लवकर जाऊन मनातल सीमाला बोलतो.


सीमा : मी हे काय बोलून बसले. उद्या रवीला भेटल्यावर काय बोलेल तो??


रवी : थांब,सीमा जरा. मला बोलायच आहे थोड.


सीमा : बोला ना.


रवी : माझ जिवापाड प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे का?? वेळ घे, तुला हवा तेवढा. घाई नाही काही. जरी तुला मी आवडत नसलो तरी देखील सांग खर काय ते, नकार असला तरी आपली मैत्री आहे अशीच कायम राहिल.


सीमा : मी...... माझ पण प्रेम आहे.


आता काय प्रेमाचा होकार दोन्हींकडून मिळालेला होता. प्रेमाची गोड सुरवात या क्षणा पासून सुरू झाली होती. कंपनीतून सुटल्यावर रवी आणि सीमाच्या गाठीभेटी होत राहिल्या. रोज नवनविन ठिकाणांच्या शोधात प्रेम बहरत चालले होते. कधी चित्रपट, बाग, मंदिरांमध्ये जाणे चालू होते. रवी सीमाला कंपनीत येताना कधी गुलाबाचे फूल, कॅडबरी अशा भेटवस्तू देत होता. रवी सीमाला खरेदिला घेऊन जात असे. सीमाच्या आवडीचे कपडे घेऊन कंपनीत येताना तेच आवडीने घालून येत असे.


रवी : उद्या कंपनीतून सुटलो की बागेजवळ येऊन थांब. मी तिथे येतो. आपण तिथून पुढे बाहेर जाऊया.


सीमा : चालेल.


रवी : सीमा मला सांगयचे तुला. आपल आता असे भेटणं,खूप झाले. मला तुला आपलसं करायचं आहे. तेही सर्वां समक्ष.


सीमा : बरोबर आहे. माझ्या घरचे नाही ऐकणार. आपल्या नात्याला संमती नाही देणार.


रवी : माझ्यात काय कमतरता आहे. तुला सुखात ठेवेल मी. लग्नानंतर तू नोकरी देखील करायची नाही. मी आहे ना. मी ह्या रविवारी येतो घरी.


सीमा : नको. येऊ तू. त्यांना प्रेमाचा अर्थ नाही कळणार. आपल्या भावना नाही पोहचणार त्यांच्यापर्यंत. तू जर घरी आलास तर...., कदाचित यापुढे मी तुला कधीच दिसणारं नाही कदाचित...!!


रवी : चल...., वेडाबाई. आपल प्रेम एवढ कमकुवत नाही. लग्नाची गाठ देवाच्या दरबारात बांधल्या जातात. आपली त्यातलीच एक आहे. मी घरी सांगतो आईला. रविवारी तुमच्याकडे येऊन घरी सांगेन. देतील ते ही परवानगी.


सीमा : ऐक ना. घरचे नाही देणार परवानगी. थांब ना. बोलूना आज थोडावेळ.


रवी : नको.मला आता उद्याची उत्सुकता आहे. आज जातो लवकर. तुला घरच्यांसमवेक्ष पाहून बोलायचे आहे मला.


रवी घरी जाताच. आईला एकदा कधी सांगतो असे झाले. घरी आल्यावर आईला सांगितल्यावर आईकडून लग्नाला परवानगी मिळते. रवी खूप खूश होतो. रवीला आता हुरहूर आहे ती सीमाशी लग्न करण्याची. आता फक्त सीमाच्या घरचे तयार झाले की लग्न करण्यात कोणतीच अडचण येणार नाही. रोज सुट्टीच्या दिवशी आरामात उठणारा रवी आज मात्र लवकर उठून कधी एकदा सीमाच्या घरी मागणी घालायला जातोय अस वाटत होते.


रवी : नमस्कार!! मी रवी मनोज देशपांडे. सीमा इथेच राहते ना. आम्ही एकाच कंपनीत कामाला आहोत.


सीमाच्या घरचे : या आत. बसा.


रवी : सीमा. बोलवा तीला. आम्हांला दोघांनाही बोलायचे आहे.


सीमाच्या घरातले : ( गांभिर्याने ) ऐका जरा.


रवी : तुम्ही ऐका ना माझ. मी सीमावर मनापासून प्रेम करतो. तीच देखील माझ्यावर प्रेम आहे. आम्ही दोघे लग्न करणार आहोत. त्याविषयी बोलायचं आहे.


सीमाची आई ओक्साबोक्सी रडू लागते. आता तुम्ही आलात का...?? तीला सावरत बाकीचे रवीला सांगू लागतात. सीमाचा हार घातलेल्या फोटो रवीला दाखवतात, सीमा तुम्हांला कशी आणि कुठे भेटली. तीला हे जग सोडून पाच वर्ष झाले. तीच महेश नावाच्या मुलावर जिवापाड प्रेम होतं.पण आम्हांला ते मान्य नव्हतं. एकदा लांबच्या नातेवाईकाच्या लग्नाला आम्ही सगळे गावी गेलो होतो. ती बोलली माझी मन:स्थिती नाही. तुम्ही लग्नाला जाऊन या. मी राहते. असे बोलून एकटी राहण्यामागे असा काही तीचा हेतू असेल असं आम्हांला माहित देखील नव्हते. सीमाने आत्महत्या केली.


रवी : काय सांगताय...?? आमच लग्न मान्य नसेल तर तस सांगा. उगाच तीच्या फोटोला हार घालून तीला मृत म्हणून अस घोषित नका करु.


सीमाच्या घरातले : आम्ही बोलतो ते खर आहे. असे बोलून काही वर्तमान पेपर दाखवतात.


त्या पेपर मध्ये मागच्या चार वर्षात सीमाला मागणी घालायला आलेल्या मुलांविषयी छापून आले होते. ती मुले हे शहर सोडून निघून गेली.रवी तिथेच रडायला लागला. सीमाच्या घरच्यांनी सांगितले. आमच्यावर नाही पण वर्तमान पेपरवर विश्वास ठेवा. खरतरं आमची चूक झाली. आम्ही सगळ्यांनी त्या दोघांच प्रेम नाकारल. तीच महेश नावाच्या मुलावर प्रेम होत. तो श्रीमंत घरातला होता. श्रीमंत लोकांचा काय भरवसा आहे. आम्ही एकतर गरीब माणस. काय करणार होतो आम्ही. मुलीला फसवल असत तर..... कोणाच्या तोंडाकडे पाहिले असते आम्ही. म्हणून परवानगी नव्हतो देत. सीमा अस काही करेल याचा अंदाजही नव्हता आम्हांला. पेपर मध्ये तर वाचले असेलच तुम्ही. दरवर्षी तुमच्या सारखा एक मुलगा सीमाला मागणी घालायला आमच्या घरी येतो. सत्य समजताच हे शहर सोडून दूर निघून जातात.


सीमाचा आत्मा अजूनही भटकतो आहे. दरवर्षी अस तीला मुलं मागणी घालायला घरी येतात. तिचं प्रेम नाकारुन आम्ही चूक केली. याची जाणीव करुन देत आहे.आता तरी आम्हांला माफ कर. तुझं प्रेम आम्ही समजून घेतले नाही. तू परत आमच्यात सामील होण शक्य नाही. तुला प्रेमाकरता अस झूरताना पाहून आम्हांला ते बघवत नाही.


रवी : मी जे पेपर मध्ये वाचले आणि तुम्ही जे बोलता या वरुन सीमा अस का??? बोलली ते आत्ता मला समजत आहे. तीच काल माझ्याशी बोलण्यासाठी आतूर असणे. तीचे पाणावलेले डोळे. मीच समजू नाही शकलो सीमा. सीमा मला बोलली तू माझ्या घरी आलास तर मी तूला दिसणार नाही. हे जर त्यावेळी मी ऐकले असते, तर......, कदाचित सीमा आणि मी आजही सोबत असतो.

आज जे सत्य समोर आले त्यावरुन आपण सीमाच्या आत्माची शांती करुया.


सीमाच्या घरातले : तू म्हणतो. तसेच करुया. एवढे आत्मयितेने सांगणारा तुच आहेस. बाकीचे हा प्रकार ऐकल्यावर आम्हांला कधीच येवून भेटले नाही. उलट हे शहर सोडून गेले.


ठरलेल्या ठिकाणी सीमाच्या घरातले पोहचतात. रवी आपल्या आईला घेऊन पोहचतो. पूजेच्या ठिकाणी रवी बोलतो. सीमा तू मला पाहत असशील. मी तूझ्यावर जिवापाड प्रेम केल आहे. तूझा आत्मा असा भटकताना मी नाही पाहू शकत. माझा जीव जळतो आहे, हे पाहून. आम्ही आज इथे तुझ्या आत्माच्या शांती करता जमलो आहोत. तुझ्या घरातल्यांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतो आहे. पण ते तुझ्या काळजीपोटी तसे बोलत होते. त्यांची केविलवाणी अवस्था पाहवत नाही. त्यांना माफ कर.


मी फक्त तूझाच आहे. तुझ्या शिवाय मी दुस-या कोणत्याच मुलीचा विचार करु शकणार नाही. जीवात जीव असेपर्यंत आता तूझ्या आठवणींवरच जगणार आहे. हे देवा..., माझ्या सीमाच्या आत्माला मुक्ती दे. तीला अस भटकत नको ठेवू.


दूर दूर चालली आज माझी सावली

कशी सांज हि उरी गोठली

उरलो हरलो दुखः झाले सोबती


काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला

मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला

मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा

रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा

आपुलाच तो रस्ता जुना मी एकटा चालू किती

उरलो हरलो दुखः झाले सोबती !!


असे म्हणून रवी घास देत असताना त्या नैवद्याला कावळा येऊन स्पर्श करतो.


रवी आणि सीमाच्या घरातले डोळ्यातले आसवे सावरत बोलतात की सीमा आता मुक्त झाली. रवी आपल दु:ख मनात ठेवून सर्वांना सावारण्याचा प्रयत्न करत असतो.


घरी आल्यावर रवी ( मनाशीच ) सीमा का अशी मला सोडून गेलीस. रडत असतानाच रवीला झोप लागते. रवीला झोपेत सीमा दिसते. ती रवीचे आभार मानते. माझं प्रेम महेशवर होतं.आमच प्रेम तुझ्यामुळेच घरच्यांपर्यंत पोहचलं.प्रेम करण सोप असतं.पण ते निभावताना संकटे आली तरी त्यातून शांतपणे मार्ग देखील काढता येतो. हे तुझ्याकडे पाहून समजलं.तू माझी मुक्तता केली. तू माझ्यावर केलेले हे प्रेम मला प्रेमाच्या पलिकडचे वाटते आहे........ काय बोलू याला मी......

इतक्यात रवीला झोपेतून जाग येते. त्यानंतर सीमा पुन्हा कधी कोणाला दिसली नाही. ना स्वप्नात, ना तीचा आवाज ऐकू आला. दरवर्षी सीमाला मागणी घालायला येणारी मुलेही बंद झाली.


सीमाचा भटकता आत्मा आता शांत झाला होता.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Horror