Anuja Dhariya-Sheth

Inspirational Others


3  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational Others


नवचैतन्य....

नवचैतन्य....

1 min 16 1 min 16

एवढे दिवस बाप्पा होते, त्यामुळे घरात किती आनंदी-उत्साहपूर्ण वातावरण होते.. कोरोनाचे संकट आल्यापासून तर सर्व उदास झाले होते... रीमा म्हणत होती...


सुरेशराव हसत म्हणाले, अगं दरवर्षी बाप्पा गेल्यावर असेच बोलतेस तू...


तिने त्यांच्याकडे बघितले, तिचे डोळे भरून आले होते.. ती म्हणाली दरवर्षी लेकरं जवळ असतात, आरतीचे लग्न झाले आणि अभि...


तसे ते म्हणाले, काळजी करू नको आपला अभि लांब असला तरी सुखरूप आहे..


तेवढ्यात अभिचा फोन येतो, आई माझी सोय झाले, 'वन्दे मातरम' विमानाने मी लवकर परत येतोय....


सुरेशरावांनी लगेच आरतीला फोन लावला... अगदी दूधात साखर पडावी, अशी बातमी विहीणबाईनी सांगितली... आपण आजी-आजोबा होणार आहोत...


रीमा आनंदाने म्हणाली, खरंच देवा, तुझ्या निरोपाचे दुःख करत होते आणि तू मात्र निरोप कसला माझा घेता?? असे म्हणत माझी ओंजळ आनंदाने भरून टाकलीस, माझे आयुष्य नवचैतन्याने भरून गेले.


Rate this content
Log in

More marathi story from Anuja Dhariya-Sheth

Similar marathi story from Inspirational