Tejashree Pawar

Tragedy

2.0  

Tejashree Pawar

Tragedy

नूर (भाग 3)

नूर (भाग 3)

3 mins
16.9K


सलमाची भीती खरी ठरली. नूरचे सौंदर्य पाहून रोज येणाऱ्या लोकांची संख्या वाढूच लागली. रोज नवी व्यक्ती. रोज तोच अत्याचार. एवढ्याश्या त्या जिवाच्या अंगाची लाहीलाही होत असे. मावळणारा प्रत्येक दिवस नकोसा होत असे. आजूबाजूच्या प्रत्यकीची अवस्था तीच असल्याने कोणालाही त्याचे सोयरे सुतक नव्हते. नूरही आता त्या वातावरणात 'रुळू ' लागली होती. तिलाही हे सर्व आता नित्याचेच वाटू लागले होते.

हळू हळू दिवस जाऊ लागले तसे मात्र नूरला सर्वच असह्य होऊन लागले. परिस्थितीपुढे शरण जाण्याऱ्यांमधली ती नव्हती. तिने काहीतरी करायचे ठरवले आणि त्या दिशेने पहिले पाऊलही उचलले. तिने फार कष्टाने आपल्या अम्मी अबाबाशी संपर्क साधला. तब्बल एक वर्षाने ती त्यांच्याशी बोलत होती. अगदी खुशीत वाटत होते ते !!! तिलाही फार समाधान वाटले. आपल्या परिस्थितीविषयी सांगून त्यांच्या आनंदावर विरजण घालण्याची तिची मुळीच इचछा नव्हती. शब्द ओठावर आले होते; पण पुन्हा मागे घेतले. आपले सर्वकाही खुशाल असल्याचे तिने सांगितले आणि आलेला हुंदका तसाच आत घेतला.

अम्मी अब्बाशी बोलून झाल्यावर आपल्या छोट्या बहिणीशी नूर बोलू लागली. थोड्या वेळ व्यवस्थित बोलल्यावर ती अचानक रडू लागली. ते ऐकून नूर घाबरून गेली. भरपूर विचारल्यावर तिने खरे काय ते सांगितले. घरची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. नूरच्या नवऱ्याकडून त्यांना कुठलीही आर्थिक मदत होत नव्हती. उलट लग्नाच्या प्रसंगी तिच्या घरच्यांना देण्यात आलेले पैसे आणि सर्व किमती वस्तू परत घेत्यात आल्या होत्या. हे सर्व झाल्यानंतर केवळ आपली मुलगी परदेशात सुखी असे ह्या एका आशेवर ते सर्व होते. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर नूर स्तब्ध झाली. तिला भयंकर संताप आला. आपल्या बहिणीला शांत करून तिने फोने ठेवला. आता मात्र नूरने काहीतरी करार्यचे ठरवले. ह्या सर्वातून बाहेर पडण्याचा निश्चय केला. त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेन हे तिने मनाशी पक्के केले. तिने एकटीने इथून बाहेर पडायचे ठरवले असते तर तिच्यासाठी ते जरा सोप्पे होते; परंतु आपल्या बरोबरच्या सर्वच मुलींना यातून बाहेर काढायचे तिने ठरवले.

त्यासाठी तिने प्रयत्न सुरु केले. फार कष्टानंतर आपल्यासाठी एका मोबाईल ची व्यवस्था तिने केली. त्याद्वारे तिने आपल्या बहिणीशी संपर्क साधायला सुरवात केली. इथल्या परिस्थितीची तिला पूर्णपणे जाणीव करून दिली. त्याबद्दल जवळच्या पोलिसांशी तिला संपर्क करायला सांगितलं. गेल्या वर्षभरात जे काही झाले ते सर्वकाही तिला तेथे जाऊन सांगायला लावले. हे सर्व करत असताना ती क्षणक्षणी बहिणीला हिम्मत देत होती. पोलिसांना झाल्या प्रकारची माहिती मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब नुरशी संपर्क साधला. तिच्याशी बोलून त्यांनी सर्व प्रकरणाची खात्री करून घेतली. हे सारं ऐकल्यावर त्यांनी कामाला सुरवात केली. इतक्या मोठया प्रमाणावरील रॅकेट इतक्या दिवसांपासून चालू असतानाही त्यांना ह्याविषयी साधी कल्पना सुद्धा नव्हती याचे त्यांना आश्चर्य वाटले. तिकडे संपर्क साधून त्यांनी ह्या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले. बऱ्याच दिवसांपासून शोधात असलेल्या व्यक्तींचा त्यांनाही थांग लागला. हुसेनसारखे अनेक महारथी ह्या क्षेत्रात आधीपासून कार्यरत होते. आपल्यासोबत अनेक काझींनाही त्यांनी यात सामील करून घेतले होते. गरीब घरातील मुलींवर पाळत ठेवणे. त्याच्या आई वडिलांना अवेळीच ह्या जाळ्यात ओढणे. अरब शेख लोकांशी वेळोवेळी संपर्कात राहणे. त्यांना हव्या तश्या मुलींचा पुरवठा करणे. त्यासाठी विवाहाचा घाट घालणे. काझीची व्यवस्था करणे. मुलीच्या घरच्यांना पैश्याआहे ऑझचे आमिष दाखवणे आणि एकदा मुलीला परदेशी पाठवले कि आपले कमिशन घेऊन ह्यातून सुटका करून घेणे , असा हा ह्यांचा क्रम गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे चालू होता. आपली मुलगी सुखात राहावी ह्यासाठी आई वडील शांत बसत आणि आपले आई वडील निश्चित राहावे यासाठी मुलीही शांत बसत. पडेल ती कामे, शारीरिक अत्याचार, अपमान सर्वकाही त्या मुकाट्याने सहन करत. काहींना शारीरिक उपभोग करून सोडून दिले जाई. अश्या मुली अनोळखी जगात आलेलं ती कामे करून आपला चरितार्थ भागवीत.

नूरच्या एका धाडसी पावलांमुळे या सर्वांचं आयुष्य बदलणार होते. यापुढे अश्या काळोखात कोणीही ढकलले जाणार नव्हते. नूरच्या अम्मी अब्बाला आणि संपूर्ण देशाला याची माहिती मिळाली. नूरसोबत सर्वच मुलींची सुटका करण्यात आली आणि त्या दिवसापासून त्या सर्वांचे आयुष्यच बदलून गेले. सर्वांनी आपले जीवन नव्याने सुरु केले. अश्या सर्व मुलींसाठी नूर आता एक संस्था काढली आणि त्या सर्वांच्या मदतीने त्याचा कारभार यशस्वीपणे सांभाळू लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy