Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Tejashree Pawar

Tragedy


3  

Tejashree Pawar

Tragedy


नूर (भाग २)

नूर (भाग २)

3 mins 15.3K 3 mins 15.3K

एका अनोळखी जगात नूरचा प्रवेश झाला होता. पूर्णतः वेगळेच विश्व होते ते. 'तिच्या ' नवीन घरात नूरचे आगमन झाले. आत गेल्यावर तिला तिच्यासारख्याच काही मुली दिसल्या. त्यांचे ते भेदरलेले चेहरे तिला अस्वस्थ करून गेले.

पूर्ण दिवस नूरने कसाबसा घालवला. रात्र झाली आणि तिच्या शौहरचे खोलीत आगमन झाले. त्याचे ते असुरी हास्य अन विचित्र हालचाली तिला अजूनच अस्वस्थ करत होते. तो जवळ येऊ लागला, तसे तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. त्याचा तो पहिला स्पर्श आणि नूरच्या सर्वांगावर भीतीने काटा उभा राहिला......ती विरोध करू लागली पण तिचे ऐकून कोण घेणार होते?? काही क्षणांतच ती आपले सर्वस्व हरवून बसली. आपल्या अब्बापेक्षाही वयाने मोठया असणाऱ्या माणसासोबत तिने रात्र घालवली होती.

सकाळ झाली तेव्हा नूर बिछान्यावर पडलेली होती. तशीच विवस्त्र अवस्थेत .....तिला कशाचेही भान राहिलेले नव्हते. रडण्याची ताकद नव्हती किंवा डोळ्यातले अश्रूच सुकून गेले होते. बलात्कारच होता का हा ?? आपल्या स्वप्नांची पंखे घेऊन चहूकडे पहुडणारी, फार फार मोठे होऊन नाव कमावण्याची इच्छा् असणारी, आपल्या कुटुंबासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी असणारी हि नूर ....नियतीने तिला ह्या अश्या अवस्थेत आणून सोडले होते.

थोड्या वेळाने एका मुलीने नूरच्या खोलीत प्रवेश केला. वयाने जेमतेम नुरवाढीचं असावी. तिने नूरला उठवले, तिला सावरले. खोलीबाहेर तिला घेऊन आली. बाहेर तिच्यासारख्याच कितीतरी मुली आपली रोजची कामे करण्यात दंग होत्या. त्यातल्या दोघींना आवाज देऊन हिने नुरकडे लक्ष देण्यास सांगितले. हा सर्व प्रकार त्या मुली इतक्या सहजतेने हाताळताना पाहून त्यांच्यासाठी हे नित्याचेच असावे असे वाटले . इतका वेळ शांत असलेली नूर हळूहळू भानावर येऊ लागली. कालची रात्र काही केल्या तिच्या नजरेसमोरून जात नव्हती. सर्वांगावर त्याचे व्रण अजूनही ताजेच होते. तश्याच प्रकारचे व्रण तिला आपल्या समोर बसलेल्या त्या दोघींच्याही अंगावर दिसले. काही जुने, काही ताजे ..नुरसारखेच !!!

त्या दोघींच्या बोलण्यातून नूरला खोलीबाहेर घेऊन आलेल्या मुलीचे नाव 'सलमा' असल्याचे समजले. त्या सर्वांत अगदी समजूतदार आणि शांत मुलगी. इथे सर्वात आधी तीच आली होती. तिच्या चेहऱ्यावरील धिंगम्भीरता पाहता तिने भरपूर गोष्टी सहन केल्याचे जाणवत होते. हळूहळू त्या मुलींसोबत नूर बोलती झाली त्या सर्वच आपल्या नवऱ्याच्या बायका असल्याचे ऐकून नूर थक्कच झाली !!! त्या सर्वांनाही आई वडिलांनी लग्न करून पाठवले होते. कारण एकच.....घरची परिस्थिती. त्यांच्या लग्नानंतर घरच्यांना भरपूर पैसे मिळणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यांच्याही आसपासच्या गल्लीतल्या कुठल्या न कुठल्या हुसेन ने हा 'सौदा' पक्का केला होता. त्यांचीही इथे आल्यावर 'पहिली रात्र' अशीच गेली होती..... नुरसारखीच. त्यातील प्रत्येक जण आपले घरचे सुखी असतील ह्या एकाच आशेवर जगात होती. आपल्या नवऱ्याकडून आपल्या घरच्यांना वेळोवेळी पैसे पुरवले जात असतील. आपल्या भावंडांची शिक्षणे सुरळीत चालू असतील. किमान आपल्या छोट्या बहिणीवर अशी वेळ येणार नाही , एवढ्याच आशेवर त्यांचे जीवन चालू होते.

दिवसभरात पडेल ती कामे करायची. नवऱ्याला इच्छा होईल तेव्हा खोलीत जाऊन बसायचे. त्यातही प्रकार होते. काहीजण दिवसभर घरातली कामे करत असत. काहींना मात्र 'रात्रीचे' काम असे. फक्त नवराच नव्हे तर त्याचे मित्र आणि इतरही अनेक जण !! नवऱ्याच्या कमाईचा मुख्य साधनाच होत्या त्या. येणारी प्रत्येक रात्र मन खंबीर करणे आणि उगवत्या प्रत्येक दिवसाला आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करणे एवढेच त्यांच्या हातात होते. नूरचे सौंदर्य पाहून तिचा समावेश ह्याच प्रकारात होईल याची कल्पना सलमाला आली होती......


Rate this content
Log in

More marathi story from Tejashree Pawar

Similar marathi story from Tragedy