vaishali vartak

Romance Others

2  

vaishali vartak

Romance Others

नसतोस घरी तू जेव्हा

नसतोस घरी तू जेव्हा

2 mins
74


खर म्हणजे एक वेळ होती की जेव्हा नजरे आड झालेेला तू आवडायचा नाहीस .वाटे सदान् कदा  याने माझ्या अवती भवती असावे.जराही दोघांनी एकमेकान पासून क्षणभर पण दूर होऊ नये .अर्थात हे कसे शक्य असणार .नोकरी धंदा पाणी तर केलेच पाहिजेना .नाहीतर खाणार काय .... नुसते प्रेम... आकर्षण ?

आता त्याला नाव देते आकर्षण पण तेव्हा प्रेमच वाटायचे.

पण आता गेले ते दिवस .आता दोघे रिटायर्ड जीवन सुखाने व्यतीत करत आहोत .त्यामुळे कुठे जाण्याची घाई नाही ..दिमतीला बाई पण असते वर कामास ..त्यामुळे .तसेही कामाचे परिश्रम नाहीत ..जोडीला तोंडी लावयला म्हणा ...वा विरंगुळा म्हणून नातवंडे... त्यामुळे सुखी जीवन जगत आहोत .

" हे " यांचे वाचनालय.. बागेत वरिष्ठ नागरिकात जाऊन बसणे गप्पा मारणे...

सोसायटी च्या कमिटीत त्यामुळे ..सोसायटीच्या मंडळीत बसणे ..वगैरे  व त्या   निमित्याने

बाहेर जातात .पण खर सांगू ..... आता त्याचे थोडे ,.बाहेर जाणे आवडते. "नसता घरी तू जेव्हा " ची , ती पूर्वी ची हळहळ आता वाटत नाही. अशा विचाराने कधी कधी वाटते आपले प्रेम तर कमी झाले नाही ना. !   .....पण नाही , प्रेम तितकेच आहे .ठराविक वेळेच्या पेक्षा जरा उशीर झाला तर लगेच काळजी वाटते. हात मोबाईलकडे धाव घेतात. ...पण आता पहीले आकर्षण उरले नाही ..

कारण , आता हे नसले की , ..मी व मोबाईल यांचे छान नाते जुळते. फेस बूकच्या व whatsapp च्या विविध समुहावर हजरी लावता येते. सतत चालणा-या स्पर्धेत भाग घेता येतो. व मनास एक अनामिक आनंद मिळतो. या विविध समुहाने किती ज्ञानात भर करिता येते. व चालू जगाशी जवळीक साधता येते.

हे घरी असले तर करता येत नाही असे नव्हे ......पण प्रत्येकाला स्पेस हवीच ना. आपापले छंद आवडी... विरंगुळा जोपायाला. तर, सांगायचे की , 

ते त्यांचे व मी माझे छंद जोपासत असतो. त्यामुळे "नसतोस घरी तू जेव्हा " तीळ तीळ तुटतो सारखी स्थिती नसते .जरा आपापले विचार करण्यास मस्त वेळ मिळतो .उलट एखाद दिवशी जर घरात हे असले तर फेस बूक सुटतय असे वाटते. कारण सहाजिकच थोडे फार इतर वा विषयातंर होते .व अनाहुत पणे लिखाणात व्यत्यय होतो. मग उगीच चीड चीड काही विचाराची लिंक तुटते तर कधी whatsapp चे साहित्य ..म्हणा वा मित्र मैत्रिणीच्या गप्पात उगाच खंड पडतो. व मधेच जे सर्वत्र फिरत असलेले msg " हे "ऐकवत बसतात. मला त्यात रस नसतो .

पण मी मात्र लिहीलेले ,वाचलेले ,यांनी ऐकावे असे वाटते .मग पुन्हा वाद..... असो.

पण धरून ठेवले तरी त्रास ,सोडले तरी त्रास .पण डोळ्या समोर असावा

सतत नजरेत असावा असे सतत वाटते. छान काही केले की लगेच आठवण येते.

बर.... , छान गोष्टीचा, लिखाणाचा ,मनापासून झालेल्या कामाचा, आनंद शेअर करण्यास "हे "

 घरी नसता उणीव सदा जाणवतेच ना.!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance