नराधम
नराधम
नराधम-कथा-भाग-1
आपण नेहमी म्हणत असतो की महिला अबला आहेत. स्त्री पुरुष समानता आहे; पण स्री वरील अन्याय अजून तरी कमी झालेले नाही. लैंगिक शोषण ग्रामीण व शहरी भागात अजूनही छुप्या पद्धतीने वेगात चालू आहेत. अशीच ग्रामीण भागात राजकीय वर्चस्व असलेली गावगुंड धमकी देऊन देह शोषण करतात. नंतर त्या असहाय मुलीला, स्रीला जीवे मारन्याचे धाडस करतात. पोलिस स्टेशन पर्यंत पोहचू दिले जात नाही. प्रकरण फाईल बंद करण्यासाठी पोलिस स्टेशनवर हे गावगुंड राजकीय दबाव आणतात व मेलेल्या स्रीला न्याय् मिळत नाही.
अशी क्रूर वागणारी माणसे परत गुन्हा करण्यासाठी सरसवतात. अशी माणसे भर रस्त्यात लोकांसमोर क्रूर पद्धतीने ह्त्या करतात. तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देतात. काहींवर तर हल्ले देखील केलेले आहेत. मग मुलगी किंवा स्री सुरक्षित कुठे?
अशीच एका खेड्यात एक स्री आपले पोट भरण्यासाठी आली होते. तिचा नवरा मेल्यामुळे ती गावागावातून फेरीवर पेरू विकण्याचा धंदा करत होती.
संध्याकाळ झाल्यावर ती भाड्याने घेतलेल्या घरी आली व जेवण करून झोपली होती.रात्रीचे बारा वाजले होते.
गावात लोडशेडिंग असल्याकारणाने वीजेचा लपंडाव चालू होता. अचानक वीज गेली. गावातील नराधमानी
डाव साधला. पाच सहा जन होते. जबरस्तीने दरवाजा उघडण्यास भाग पाडले होते. सगळे दारू प्यायलेले होते.
बऱ्याच दिवसांनी ते एकत्र येवून हा प्लान आखला होता.
तिला धमकी देऊन तिचे तोंड बंद केले होते. त्यांची पाशवी वृत्ती जागी झाली होती. तसे सर्वजण लग्न झालेले पन्नाशीच्या आसपास वयाने होते. त्यांना ही मुली होत्या. पण आपल्या मुलीच्या बरोबर वयाने असलेल्या त्या स्रीच्या देहाचे लचके ते नराधम तोडत होते. एका मागून एक असे पाच सहाजन बलात्कार करत होते. शेवटी असहाय स्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्यासाठी गावातील कोणीही न्याय करणारे नव्हते. शेवटी त्या स्रीने स्वतःला सरकारी दवाखान्यात दाखल होऊन घेतले. ते नराधम काही न झाल्यासारखे सफेद पुढार्यांचे कपडे घालून फिरत होते. त्यांना कोणी विचारु शकत नव्हते कारण ते गब्बर पैस्यावाले व राजकारणी होते. गावची सत्ताही त्यांच्याच हातात होती.