निवडणूकीची हवा
निवडणूकीची हवा
सगळीकडे सुरू कशी
निवडणुकीची हवा...
ज्याला त्याला वाटातयं
माझाच पॅनल निवडून यावा....
काहींनी सुचवलं असं...
निवडणूक बिनविरोध करू
यावर्षी मंडळावर...
महिला उमेदवार भरू....
काहींनी दिल समर्थन
काहींनी दिला नकार
नेहमीप्रमाणे यावर्षी देखील
बसवलं जावं सरकार...
जे ते पुढारी आपले
उमेदवार शोधु लागले
कोणत्या उमेदवाराचे
प्रस्थ आहे चांगले......
कुणी म्हणतं प्रगती
कुणी म्हणतं परिवर्तन
एकटा चालतो कुणी
कुणास सोबती चारजण
जो तो म्हणतो आहे....
लक्ष ठेवा माझ्यावर
मी आहे उभा जाण्या
निवडून मंडळावर...
कुणी आपल्या पक्षाचा
अजेंडा वाचून दाखवतो
हा असा तो तसा....
सांगत साऱ्यांना सुटतो
कुणी देतात गृहभेटी
संपर्कात आता वरचेवर
संकल्पना घेऊन नवी
'डोअर टू 'डोअर.....
माझ्या प्रिय मतदारांनो
आपण पाईक लोकशाईचे
हातात आपल्या ताकत ठेवा
साधण्या हित संवर्गाचे
आपले अमूल्य मत देताना
आवडीचा उमेदवार निवडा
आपला विवेक जागृत ठेवून
पक्ष,पॅनल हा विषय सोडा
तुमच्या हातून कल्याण होवो
हीच संवर्गाची ईच्छा...
उभ्या साऱ्या उमेदवारांना
विजयी भव सदिच्छा.....
(यातील भावना ही सर्वसामान्य मतदारांची आहे त्यामुळे कुणीही वाईट वाटून घेऊ नये...सर्व निवडणुका मध्ये हीच परिस्थिती असते..आपण तीच परिस्थिती आपल्या संवर्गात देखील निर्माण करू नये.उमेदवारांनी जबाबदारीने लोकशाही मूल्यांचा अंगीकार करून निवडणूक लढवावी आणि प्रिय मतदार बंधू भगिनी यांनी जागरूक मतदारांप्रमाणे मतदान करावे....अन्यथा आपल्यात आणि अंधभक्तांत काही फरक उरणार नाही हीच माफक अपेक्षा....)
