STORYMIRROR

Anuja Dhariya-Sheth

Inspirational Others

3  

Anuja Dhariya-Sheth

Inspirational Others

निसर्ग... जे पेराल तेच उगवते

निसर्ग... जे पेराल तेच उगवते

3 mins
251

शीsss काय हा पाऊस कधीही येतो.. काही नेम राहिलाच नाही याचा... सुनीता बडबड करत आली... काय हे वातावरण? खरच कंटाळा आला याचा.... ह्यावर्षी तर या देवाने परीक्षाच घ्यायची ठरवली आहे... आधीच हा कोरोना त्यात ते झालेले सायक्लोन वादळ... कसली कसली मेली नाव देतात त्या वादळांना... आठवत पण नाहीत... वेळी-अवेळी येणारे हे पुराचे पाणी... कोसळणाऱ्या दरडी, पाण्याची पातळी वाढली कि वाहून जाणारे रस्ते, तर कधी अनेक गाव... खरच काय आहे काळाच्या पोटात काय माहिती?


उन्हाळ्यात तर वाढणारी गर्मी... केवढा तो उकाडा...! त्याने देखील किती बळी जातात... आमच्या लहानपणी कसे प्रत्येक ऋतुची एक वेगळीच मज्जा होती.... आता कधी कोणता ऋतु बदलेल याचा काही नेम नाही... आराम खुर्चीत बसलेले अण्णा सारं काही ऐकून हसत म्हणाले, आग किती चिडचिड करशील सूनबाई, 'जे पेरलय ना तेच उगवत आहे....!!!'


सुनीता अवाक होऊन ऐकत बसली....अगं अशी काय बघतेस??? विचारात पडलीस ना.... पण निसर्गसुद्धा हा नियम बरोबर पाळतो बरं का....निसर्ग म्हणजे काय ग???? "स्वच्छ हवा, हिरवीगार वनराई आणि अशा वातावरणामधील जीवन म्हणजे जणू स्वर्गच....." पण हल्ली हा असा निसर्ग पाहायला भेटतो का सांग मला... गाव असो नाहीतर शहर सगळीकडे ह्या न त्या कारणासाठी मोठ्या प्रमाणावर कितीतरी वॄक्षतोड होत असते... पूर्वी कशी अंगणात तुळशी वॄंदावन असायची, आजु बाजूला वड,पिंपळ अशी झाडे असायची... शिवाय कोरफड, गवती चहा या सारख्या कितीतरी औषधी वनस्पती घराच्या आजूबाजूला असायचे... पण आता काय त्यांची जागा मनीप्लान्ट सारख्या अनेक शोभेच्या झाडांनी घेतले... त्यात प्लास्टिक नावाचा राक्षस... त्याच्या वर कितीही बंदी आली तरी माणूस याची काही साथ सोडत नाही बघ... विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना तसेच आहे बघ हे...


निसर्गाच्या विरोधात जाऊन आधुनिकतेच्या नावाखाली माणसाने निसर्गाची खूप हानी केली आहे.... आणि माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जे पेरत आहे ना तेच वेगवेगळ्या नैसर्गीक संकटामधुन उगवत आहे.... म्हणूनच हल्ली ह्या निसर्गाला माणूस नको झालाय... ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे, आताच येऊन गेलेली लॉकडाउनची स्थीती, बाहेर बघ ना हवा किती शुद्ध झाले... नद्या स्वच्छ झाल्यात, पक्ष्यांचे गोड आवाज येऊ लागलेत, माणूस घरात अडकला गेला आणि त्यामुळे निसर्ग अगदी मोकळा श्वास घेत होता... येणाऱ्या भविष्यासाठी माणूस जशी आर्थिक पुंजी जतन करतो त्या प्रमाणे निसर्गाची पूंजी सुद्धा जतन केली पाहिजे... निसर्गपण सांगतोय आता... सावध व्हा कारण, " जे पेराल तेच उगवणार आहे......."


सुमित जवळच अभ्यास करत बसला होता... हे सर्व ऐकून तो म्हणाला, आजोबा.... खरच किती भयानक आहे हे...!! मी माझ्या मित्रांना घेऊन आता लॉकडाउनमुळे मिळालेल्या या सुट्टीचा नक्की उपयोग करेन... अण्णा खुश झाले... म्हणाले,करा रे पोरांनो तुम्ही तरूण पोरांनी सुरुवात करा...काही दिवस काही तरी खलबत सुरू होती... अण्णा दुरून लक्ष ठेवून होते.. मुलांनी सोसायटीची मीटिंग ठेवली... आता २०२१ येते आहे तर आम्ही सर्व युवा मंडळींनी असे ठरवलं आहे की, आपल्या सोसायटीच्या बाजूला आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाचे निमित्ताने एक झाड लावायचे... शिवाय आता आपल्या सोसायटी मधील सर्व महिला संक्रातीचे हळदी कुंकू करतिल... कोरोना मुळे फार मोठे केले नाही तरी जेवढे शक्य होईल तेवढा कार्यक्रम करू आणि बायकांना आपण औषधी वनस्पती वाण म्हणून देऊया... आणि या वृक्षसंवर्धनात आपला हातभार लावूया... शिवाय त्यांचे महत्व पटवून देता येईल... सर्वांनाच मुलांचे कौतुक वाटले....


अजून एक महत्वाची गोष्ट... प्लास्टीक बंदी... "My Waste My Responsibility" म्हणुन आपण सर्व कचरा व्यवस्थित वर्गीकरण करून रिसायकलिंगला पाठवणार आहोत... जोरात टाळ्या वाजतात... अण्णांना खूप आनंद होतो... सर्वांसमोर येऊन सुनीता कौतुकाने म्हणाली.... सुमित, निसर्गाचे जाऊ दे बाळा, पण अण्णांनी जे पेरलय ते मात्र उगवताना मला दिसतय... छान काम करताय तुम्ही, आम्ही सर्व तुम्हाला मदत करू... अण्णा खरंच आहे हो तुमचे " आपण जे पेरू तेच उगवणार आहे...."


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational