निशब्द घाटमाथा आठवणीच गाठोड
निशब्द घाटमाथा आठवणीच गाठोड
निशब्द झाला आहे पण आठवण विसरायची नाही एक सुंदर ठिकाण माझ्या शब्दात साधं भोळ घ्या समजून चुकून घावला म्हणून लिहला
माझी एक आठवन तुमची तर लय भारी असणार आठवण लिहा की थोड वाचून तुमच्या शब्दात बस गंमत म्हणून
अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील हा एक फोटो कितीतरी आठवणी जाग्या करतोय
मग भिजेल्या पावसात भजी खायला
भर उन्हात एस टी ची वाट बघत
कधी कधी तर एकट वाट पहात होता
कधी कधी कोणतरी खास यायचं म्हणून
नाही मित्र नातेवाईक हो
दूर कोसावर धुरळा उडाला की टाचा वर करून
बघतच समोर यायची 407 कधी रहिमतपूर वडाप
तर कधी जीप असायची पुसेसावळी ला जाणारी
इतर वाहने भुरकन जायची
लय लय वेळा एकट बसण्यापेक्षा येणाऱ्या पर्यटकांची ओळख करून घ्यायची
घाटमाथा म्हणजे एक उत्तम निवांत बसून राहावे असे ते ठिकाण
तिथून मावळती चा सूर्य दगडावर बसून बघायचा
अहो तवा 📱 मोबाईल ची पहिली रेंज तीत असायची रेंज ची कांडी दिसली की लय भारी वाटायचं
राव पर एकट सूर्यास्त बघून डोळ्याचं पारन फिटायच
कधी गुर यायची खोप घातलेली वडीलधारी मंडळी
नांदोशी तर कधी त्रिमली ची असायची
तंबाखू चा बटवा काढून वडाच्या झाडाखाली विश्रांती घेत गुर
चारत असणार पर लक्ष मात्र येणाऱ्या जाणाऱ्या समद्यावर
पर नवा गडी दिसला की लगोलग भेटायला जवळ येवून चौकशी करणार
म्हणजे बघा तवाच सीसीटीव्ही म्हणा की राव
परत एक हाटील सुरू झालं मग वाटसरू बसून भुकेला असायचा मग काय बोलत बोलत गरम गरम भजी वडा एकच नंबर पोटाला आधार
अन् हळूच कधी मोटासायकलस्वार कधी टेम्पो कधी जीप
आण गुर
त्याची पण बेस आयेट अन मग गुरवार रहिमतपूर बाजार
मंगळवार औंध ला तर कधी पुसेसावळी
मग सकाळी तर कॉलेज ची पोर साच्याला समधी नोकर गडी
घरच्या ओढीची लहान पोर महिला उजाड माळरानावर एका एस टी च्या शेडात
आजूबाजूला एक पण पीक नव्हत रान मोकळी शिवार दिसायचं चोराड पर्यंत
लय लय आठवणी आहेत
कुंती सांगू कुंती नग
पर एकच नंबर ठिकाण होत एक माणूस नव्हता
आज बघा कि तिथं कारखाना सुरू झालं अनेकांना रोजगार मिळाला पर घाटमाथा आजही तेवढाच ताठ मानेनं निशब्द
ग्रदी गोंगाट धूर झाडी आण ऊस तर बोलाय नको
पर आजून नाही विसरत तीच घाटमाथा डोंगर झाडी
