भावना
भावना
आज सकाळी जाग आली होती कोणीतरी साद घातली असा भास1झाला होता पण तो आवाज ओळखीचा होता म्हणून चोरट्या नजरेतुन बघत होतो तेव्हा मात्र पटकन उठून बसलो ते भीतीने कारण तो दिवस क्षणात आठवला
शाळेत निघालो होतो रस्ता लांबचा होतो वेळ सकाळची होती एकटाच पाठीवर दप्तराचे ओझं घेऊन निघालो होतो अन त्या वेळी मला गंध आणि आवड नसलेल्या चित्रकला विषयाचे शिक्षक दिसले.
अगोदर नावड त्यात त्यांची चालताना साद अन साथ मिळाली मग काहीतरी त्यांनी विचारले मग हू हो नाही अश्या उतरा मध्ये संवाद सुरू होता.
त्यात ते म्हणाले अरे वा छान कपडे घातलें आहेत मग मात्र घाबरलो कारण घाईतच आज युनिफॉर्म घातला नव्हता आता मात्र जाम घाबरलो खर बोलणं हेच जगणं संस्कारित होत.
त्यानं खर उत्तर दिलं की आज विसरलो अस म्हणता क्षणी प्रतिक्रिया आली ती सडक कानफटात बसली ही विचारायची गोष्ट आहे का
शब्दच संपले उत्तर संपली कशाला भेट झाली ह्या भावनेत दुःख झाले... पण न बोलताच सार समजल अशी अबोल भावना व्यक्त केली... पळता येत नाही न.. बोलता चालत चालत शाळेत गेलो .
असे एक ना अनेक घटना प्रसंग त्यातील त्यांचे तेव्हाचे शब्द मनावर कोरले त्याची भावना चांगली होती. पण तेव्हा मात्र प्रचंड राग होता आज तो अनुराग समर्थ सामर्थ्यवान म्हणून जगायला शिकवयोय की विसरायची भावना नको.