वाट परतीची
वाट परतीची
नभ उतरू आले, पण न बोलता निघून गेले. आस लावलेल्या शेतकऱ्यांना मात्र दुःख झालं जाणीव झाली वेदना झाल्या संकटात सापडलेल्या त्याच्या समोर जाणाऱ्या ढगांनी सरळ वाट धरली. त्याला काहीच सुचेना कोणाला सांगायला हवे कोण मार्ग काढून देईल माझ्या दुःखात कोण मला मदत करेल नुसती आशा.
निराश न होता वर बघत दिस गेला मावळतीला. मग संपला आज उद्या ची आशा निर्माण झाली. मग त्याला पण जरा अपेक्षा वाढली. जाऊ दे, आज नाही झाला रुसला असेल परं उद्या होईल म्हणून खोळ घेतली डोक्यावर तिच्या वर चिंताच ओझं सोडली जनावर त्यांचं पोट दिसभर फिरून भरलं नव्हतं. तरी, जायचंय म्हणून हुडकत हुडकत एक दोन घास चरत निघाले मालकाच्या मागे.
लगबगीने घराकडे जायला निघाले म्हणून, जातना एक दोन ओळखीचे भेटले त्यांनी विचारपूस केली तर जाताना पावसाचं काय कस व्हायचं आपलं, अस बोलून विसरलेल्या प्रश्नांची उकल डोक्यात सुरू झाली. पावलं जड झाली. एक दिवस असेल की चिंता नसेल होईल खूप चांगलं म्हणत, निघाला बिचारा पाठीवर असणाऱ्या पिशवीत मोकळा डबा, पाण्याची मोकळी बाटली, त्यामुळे हलकं होत सात वाजलं घरी जायला गेल्या गेल्या लहान मुलं ओरडत आली. त्यांना बघून सार दिवसाच काम त्याचा ताण त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यावर हसू बघून थांबलं.
जड पावली घरात गेला आशा ठेवून बसलेली कारभारीन हसत हसत बोलली उशीर केला का व थांबा चहा ठेवते.