प्रमोद राऊत

Tragedy

3  

प्रमोद राऊत

Tragedy

दुःखात असणारी भूक

दुःखात असणारी भूक

4 mins
412


गेल्या आठवड्यात मी सातारा येथे एक सावडणे विधी करण्यासाठी गेलो होतो. दक्षिण काशी असे त्या ठिकाणच्या पवित्र अश्या वेण्णा आणि कृष्णा नघ्या त्यांच्या संगमावर अतिशय सर्व सोयीनियुक्त अद्यावत अशी स्मशानभूमीत तीत अगोदर गेल्या 9 महिन्याच्याकाळात कोरोना मुळे दुर्दैवाने गेलेले अनेक अबाल वृद्ध ह्यांच्या वर अंतिम संस्कार केले जातात. 

अंत्यविधी ही एक गोष्ट अतिशय दुःखद असते, आपल्या मनात कायम घर केलेल्या सुख दुःख आनंद मोह माया प्रेम भावना व्यक्त करताना ज्यांनी आपल्या ला सोडून देवाघरी गेलेल्या जवळच्या नातेवाईक ह्यांच्या वर त्या कुटुंबातील सदस्य ह्यांच्या हातून अग्नी संस्कार केले जातात.

हे सगळं बघताना अगोदर असणार दुःख ह्याने मन भरून आलेलं असत मृत वयक्ती त्या अग्नी चा दाह सोसत असते पण ती निशब्द असते निर्जीव असते.

काही वेळेत सगळे जातात तो देह अखंड तिते राहतो एकटा मग वाटत कोणि नाही कोणाचं एकट यायचं एकट जायचं आयुष्य म्हणजे सुख दुःख आनंद आशा भावना निराश न होता उद्या ची वाट बघत बालपण तरुणाई आणि वृद्धपकाळात चांगले वाईट अनुभव घेत दिवस ढकलून फक्त जगायचं हो एवढं सगळं का करायचं कोणासाठी स्वतः साठी नाही माहीत पण जे दिसत दुसऱ्या च तस जगण्याचा प्रयत्न करायचा अन पुढे पुढे जायचं असे सगळे प्रवास वर्णन करणारे आपण एक दिवस अग्नि संस्कारात एकटेच जातो

जातो. आपण निघून गेल्यावर आठवणी स्मृती सुख दुःख भोग यातना सह प्रवासी ह्यांच्या दुखमय चर्चा नुसत्या होतात. आपण संपतो तेव्हा ते राखेतून अपेक्षा वयक्त करत सावडणे चा विधी करून परत शोधून बघतात असा हा दुःखद प्रसंग जिथं आठवणीचा समुद्र डोळ्यात ओथंबलेले असतात अश्रू राखेत पुन्हा शोध घेतात आणि त्यात काही भाग मिळतो त्याला परत जलसमाधी विधिवत करतात. 

त्यानंतर आवडणारे पदार्थ पिंडावर ठेवून परत शोध घेतात. मग सगळ्या नातेवाईक मित्र स्नेही प्रत्येक जण स्मृती जागवून नमस्कार करून दूर जातात आणि एक वेगळा क्षण असतो तो म्हणजे पिंडाला कावळा शिवणे म्हणजे मृत वयक्ती ची इच्छा पुर्ती झाली असा समज पूर्वमर चालत आला आहे. 

असा हा विधी करण्यासाठी मी तिते सकाळी उपस्थित होतो मग निरीक्षण सुरू होते. थंडी होती नदी काठी तसा सकाळी जास्त गारवा होता. त्यात सुद्धा समजणे आणि उमजने ह्याचा संघर्ष माझ्या मनात सुरू झाला इतके विदारक चित्र होते अगोदर बघत होतो तेव्हा पिंडदान करण्यासाठी केलेल्या चुलीत थंडीत गारठले गेलेलं एक कुत्रा येऊन गरम राखेत बसला म्हणजे ही वेदना समजून घेतली तर जाणीव होते म्हणजे प्राणी ह्यांना उबेची गरज असताना माझ्या नजरेत काही कातकरी समाजात जन्माला आलेली लहान अनवाणी अपुऱ्या कपड्यात असणारी मूल मुली बालक दिसली, अगोदर ह्या परिसरात रोज सकाळी विधी होत असतात मग सकाळी ह्या धार्मिक संस्कार करण्यासाठी आणलेलं सगळं तीत ठेवून ते जात असतात, त्यात सगळे आवडते पदार्थ असतात आणि हा विधी सकाळी असतो पण गरीबी भूक ह्या पुढे नतमस्तक होते. सगळा रोज उपस्थित असणारा समाज फक्त बघत असतो ते वास्तव भयानक की ती सगळी मूल फक्त आणि फक्त नातेवाईक ह्यांच्या विधी पूर्तता होण्याची वाट बघत असतात. एकदा विधी झाला मग पिंडाला कावळा स्पर्श करण्यास येणार तेव्हा त्याचे सगळे लक्ष फक्त आणि फक्त त्या पिंडावर काय काय आहे त्यातील मला काय मिळेल ह्यावर असते. नातेवाईक बिचारे दुःखात असतात एक भयानक शांतता पसरली असते तीत एकीकडे भूक आणि दुःख ह्यांचा कृष्णा वेण्णा ह्यावरील संगम ईश्वर साक्ष सगळे बघत असतात मग काही क्षणातच पिंडावर कावळा येतो त्याचा स्पर्श फक्त पुरेशा त्यावर दुःखी असणाऱ्या नातेवाईक ह्यांचा कार्यभाग संपतो आणि भूक वेगवान होते मग ने निष्पाप गरीब गरजू अनवाणी थंडीत कुडकुडत असणारे सगळे त्या पिंडावर असणारे फळ आणि इतर खाऊ चे सगळे पदार्थ गोळा करून सापडेल ते घेऊन ही मुलं खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाजूला निघून जातात अस रोज घडतंय...... 

एवढ्यावर सगळं थांबत नाही पुढे तीच मूल थंडीत नदीच्या पात्रात केलेल्या दानात सुध्दा शोध घेत असतात त्यात पण त्यांची गरज असते.

मोह माया ह्यांच्या संगमावर मी हा दुःख आणि भूक हा सोहळा पहिला मन दुःखी झाले कोण म्हणतं आम्ही महासत्ता आहोत तंत्रज्ञान विकसित केले आहे. समाज प्रगत झाला आहे गरिबी संपली सब कूच खोट आहे म्हणायला हाच एक प्रसंग पुरेसा आहे. दुर्गंधी अस्वच्छता अपुरे शिक्षण भूक वेदना किती दिवस बघ्यांची भूमिका घ्याची कोण थांबवेल ही भूक कोणाला समजतील त्याच्या वेदना येणारे दुःखी असतात जाताना पिंडदान केल्याचं समाधान घेऊन निघून जातात आणि हे बिचारे रोजच ऊन वारा पाऊस ह्याच्या मारा सहन करून अनवाणी सकाळी सकाळी लवकर उठून पिंडदान होण्याची वाट बघत असतात. 

खर ही कथा नाही वास्तव आहे पण सगळे रोज बघत असतात मी पण बघितले नुसत बघून सोडून द्यावे असे एक जसे तुम्ही पण वाचून विसरून जाणार भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ ह्या वळणावर असे म्हणत जीवन जगणारे सगळे अस रोज काहीतरी नवीन बघत असतो. पण बोलत नसतो मूक बधिरता आपली उपयोगी नाही थोडं पुढे येऊन असे भूक आणि दुःख ह्यांच्या संगमावर आपली संस्कृती आणि जबाबदारी ह्याची जाणीव तरी पण कोणाच्या तरी भुकेवर भाकरीचा चंद्र उगवेल तो यावा हीच सदिच्छा माझी एक साधा विचार मन सुन्न झाले लिहायचं सुचत नाही.. 13 दिवसांनी लिहतोय अजूनही माझ्या डोळ्यात अश्रू चा सागर भरून आला त्याला थांबवून शब्दांत विचार मांडला मला वाटला मी म्हणून मांडत आहे व्यथा आणि वेदना ह्यांचा दाह असणारी काही चित्र काढली, पण ती टाकून त्यांना बदनाम करणे किंवा कोरडा जिव्हाळा दाखवून माझा मोठेपणा किंवा मला मिळवा हा उद्देश नाही. 

फक्त एकच विनंती ज्याची ज्यांची ही नैतिक जबाबदारी आहे तो समाज प्रशासन ह्यांना दोष देत नाही पण एक न पुसणारा ओरखडा माझ्या मनावर ओढला गेला कोण संपवले ह्या दुःख आणि भूक ह्यातील वेदना नुसत बघून उपयोग होत नाही. कायम स्वरूपात ठोस अस काहीतरी करून हा असा विदारक विषय कायमस्वरूपी संपवून टाकूया.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy