Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Pramod Raut

Others


0.7  

Pramod Raut

Others


अभिमान

अभिमान

3 mins 588 3 mins 588

आज एक चांगली गोष्ट समरणात आली त्या 16 जून च्या दिवशी थोडी पावसाने सुरुवात केली होती नकळतपणे थोडा थोडा म्हणत तो येत होता त्याच येन आमच्या साठी आनंद होता कारण नुकताच पाण्याचा संघर्ष संपलं असा तो दिवस होता

घाईत भिजत आलो पहिल्या पावसाने मला भिजवून टाकलं मन पण चिंब झाले होते थोडी थंडी भिजल्यावर वाजत होती पण वेळेत जाण्यासाठी घाई होती तरी भिजत गेलो

मन आनंदी होत आज पहिला दिवस होता खूप खुश होतो सुट्टी संपली नवीन सुरवात ह्या वर्षी ची पहिल्या दिवसासाठी नियोजन करून आलो होतो आणि त्या नुसार डोक्यात विचार सुरू होताच

तेवड्यात जुन्या सहकारी मंडळी नि नेमक्या कोणत्या उद्देशाने माहीत नाही पण एक अस्वस्थता निर्माण करणारा प्रश्न केला अरे वा आला होय आम्हाला वाटलं आणि त्यांचे शब्द थांबले

काय विचारायचं असेल कुणास ठाऊक की कुचेष्टा केली माहीत नाही गेलो स्टाफ रूम मध्ये

तेवढ्यात दबक्या आवाजात एक हाक ऐकू आली मी आत येऊ आदर आदर्श आनंद सुखाच्या शिखरावर जाणारे पण शरीर भिजलेल्या ओळखीच्या अनोळखी वयक्ती चा तो भारदस्त आवाज होता आजही तोच ताल अन रुबाबदार पणा होता

हो या या स्वागत तुमचे आल्या आल्या प्रथम त्याने वाकून नमस्कार केला हलकेच हसत हसत त्याने नाव सांगितले आणि विचारले कसे आहेत तुम्ही खूप दिवसांनी भेट होत आहे

मग नेहमीच उत्तर एकदम मस्त पण अजून अंदाज येत नव्हता कोण तरी पण हसत हसत तुझं काय मित्रा तू खूप मोठा झालास कसा आहेस कुट असतो कसे आहे तुझे असे एकदम सगळे प्रश्न त्याची ओळख निघावी म्हणून विचारले

त्याने सुरवात भयानक केली, .. विसरला मला एवढं महान कार्य माझ्या काळात मी केले होते अनेक चुका केल्या शिक्षा भोगल्या त्रास दिला भांडण वाद शिस्त सगळे बिघडवून टाकण्यात क्रमांक मिळवत तुम्हाला नाकी नऊ आणणाऱ्या विसरलात सर ओळखले की नाही आठवत नाही तो मीच एक म्हणता म्हणता त्याने 20 चुका सांगितल्या

हळू हळू आठवलं होकार दिला मग त्याने भूतकाळ थांबवला आणि वर्तमान सांगितले की तो सैन्यात आहे लेह ला असतो 20 वर्ष झाली मेजर आहे एकदम उत्तम नोकरी करतो पण होतो तोपर्यंत फक्त तुम्हाला त्रास देण्याचं कर्तव्य करणारा मी माझ्या सगळ्या सहकारी मित्राच्या संगतीत राहून फक्त फक्त तुम्हाला खुप त्रास दिला

पण एक सांगतो जेव्हा भरती झालो त्या दिवशी खूपच आनंदात होतो घरातील सगळे आले होते मला सोडायला बस स्टँड वर कुणी जागा धरली कुणी बॅग ठेवली आई चे डोळे भरून आले होते वडील नजर चुकवत बोलत होते मित्र तर जाम खुश होते कारण त्याच वेगळं होत आता कोटा फिक्स झाला महिन्याच्या काळात ताई पण तशी नाराज होती रोज भांडण करणारी आज गप्प होती

कंडक्टर आला मी वाकून नमस्कार केला आणि गाडीत येऊन बसलो. बेल वाजली गाडी निघाली तेवढ्यात तिकीट तर अगोदरच घेतलं होतं वडिलांनी ते खिशात होत प्रवास सुरु झाला दिवस संपला संवाद संपले बस प्रवास संपला रेल्वे ने प्रवास सुरु झाला.

भाषा गेली ओळखी गेल्या अनोळखी झालो रात्री जेवायला बसलो तेव्हा घरची भाकरी किती भारी असते तेव्हा समजल आनंद संपला दुःख सुरू झाले सर 20 वर्ष तुम्हाला दिलेल्या त्रासाची सजा भोगली जेव्हा एकटा अंधारात बर्फाच्या काळात डोंगरावर एकटा असायचो तेव्हा फक्त तुमचे शब्दच उपयोगी पडायचे

तुम्ही तुमच्या आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय मोठे होणार नाही पण जीवनाच्या लढाईत एकटा लढत असतो तेव्हा सगळं असत फक्त आनंद नसतो कारण संघर्ष आपला अस्तित्वा साठी असतो तीत मी पणा अहंकार गर्व असलं काही नसतं फक्त दुसऱ्या ने बघितले म्हणून त्याच हसून स्वागत करून स्वतः आनंद दाखवायचा असतो

खूप दिवस झाले सर एक ओझं घेऊन फिरतो आहे खूप काही चुकलं आहे फक्त एकदा मनापासून माफी मागायला आज आलो आहे त्या माफ़ी मध्ये तुम्हाला दिलेल्या त्रासदायक वेदना किती भयानक असतील त्या पेक्षा तुमच्या सहनशीलता आदर आदर्श ह्यांचा मनापासून अभिमान आहे


Rate this content
Log in