komal Dagade.

Tragedy

3.5  

komal Dagade.

Tragedy

नात्यांची गुफंण ...

नात्यांची गुफंण ...

5 mins
63


       आईवडील आयुष्यभर मुलांना मनासारखं आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य मिळावं यासाठी लढत असतात. मुलांच्या सुखात स्वतःचं सुख शोधत असतात. मुलं तेवढच प्रेम आईवडिलांना देतात का...? त्यांचे न फेडता येणारे उपकार फेडतात का....?


रमा आणि माधवचा सुखी संसार,पण परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे मुलाचं आयुष्य घडवण्यासाठी स्वतःचं जीवन पणाला लावलं. दोघंही कष्टाला मागे सरणारे नव्हते. एक वेळ जेवण करून संसार सुखाचा करत होतें. कधीही स्वतःची चैन केली नाही, की कसलीही हौसमौस दोघांनाही माहित नव्हती. रमा नवऱ्याच्या परिस्थितीत त्याला साथ देत. कधीही काही मिळाले नाही म्हणून कुरबुर केली नाही. गरिबीतही राजा राणीसारखं संसार करत होतें. एकुलत्या एक मुलाला मात्र कधीही कोणत्या गोष्टीची कमी केली नाही.अभि अगदी लाडाकोडात वाढत होता. सगळ्या वेळच्या वेळी गोष्टी मिळाल्याने त्याला त्या गोष्टीची किंमत राहिली नव्हती. अभिला स्वतःच्या पायावर उभे केले. त्याला चांगले आयुष्य दिले. चार चौघात रुबाबात राहिलं एवढं त्यांच्या ऐपतिने त्याला दिले. पुढील शिक्षणासाठी अभि बाहेर देशात गेला. तिकडेही त्याला कधी पैशाची कमी भासू दिली नाही. स्वतःचे तरुणपण मुलासाठी खर्च केले.


रमा माधव खूप खुश होतें. मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवलं म्हणून. इकडे स्वतःच्या शेतात कष्ट करून दुसऱ्याच्या बांधलाही ते काम करण्यासाठी जातं. कष्टाच्या जोरावर स्वतःचा जागा घेऊन टूमदार बंगलाही बांधला. हातात खेळता पैसा होता पण वय नाराज होऊन निघून गेले होतें. तरीही मुलाला चांगलं घडवले याचा दोघांनाही अभिमान होता.


अभिने शिक्षण पूर्ण करून नौकरी लागल्याचे सांगितले. दोघांनाही आनंद गगनात मावणासा झाला. अभिने लवकरच येणार असल्याचे सांगितले. दोघांनाही मुलाला कधी बघतोय असं झालं होत. आता चांगली मुलगी बघून अभिचं लग्न लावून दिलं की झालं आपल्या कर्तव्यातून मोकळ असं दोघेही विचार करत होतें.


दुसऱ्या दिवशी माधवची अचानक शुगर वाढली.त्यामुळे चक्कर येऊन तो पडला. रमा, "आहो उठा काय झालं. तिने शेजारी राहणारे काकांना बोलवून माधवला दवाखान्यात नेलं तर, त्याची शुगर वाढल्याने चक्कर आल्याच सांगितलं. त्याला बरीच पथ्यही सांगितली होती. गोड पदार्थ खाण्यावर बंदीच घातली होती. काही शुगर नियंत्रित करण्यासाठी गोळ्याही डॉक्टरांनी लिहून दिल्या आणि लगेच सोडल. रमाला मनातून खूप वाईट वाटत होतें. कारण आता कोठे चांगले खायचे दिवस आले होतें. लगेच शुगरचा त्रास, तिला नवऱ्याचं खूप वाईट वाटत होत.


    एक दिवस अभिने फोन करून सांगितले, मी लग्न केलंय. माझ्याच कंपनीत जॉबला आहे मुलगी. तिचं नाव सीमा.खूप छान आहे ती. ती आपल्याच शहरात राहते.तुम्हाला सांगायला वेळच मिळाला नाही. मुलाचं बोलणं ऐकताच माधवच मन सुन्न झालं.

तिकडून तो म्हणाला दोन दिवसात आम्ही घरी येतोय बाबा. माधवने कॉल कट केला.


रमा नवऱ्याला म्हणाली,आहो काय झालं एवढे शांत का झालात...?


अग अभिचा फोन होता. लग्न केलंय म्हणतोय तिकडे. मला तर आश्चर्य वाटतंय की एवढी मोठी गोष्ट त्याने आपल्यापासून लपवली. रमाची तर पायाखालची जमीनच सरकली.


अभि आणि त्याची बायको दोन दिवसांनी आले. दोघांनीही मुलाच्या सुखात सुख पाहिले. कसलही दुःख, नाराजगी चेहऱ्यावर दिसू दिली नाही.

दोघांच ओक्षण करून आनंदात दोघांना घरात घेतले.


अभि खुश होता. आईबाबा काही बोलले नाहीत म्हणून पण त्याला कोठे माहित होतें त्यांनी कंठाशी आलेले दुःख गिळले होतें.


आता सुरुवात झाली अभि आणि सीमाच्या संसाराची. सीमा शिकलेली पण नाती जपण्यात फसलेली होती. अभि बायकोसाठी कोणतीही गोष्ट कमी करत नव्हता. दोघांनीही जॉब तिथंच ट्रान्सफर करून घेतला होता. कारण एवढा मोठा बंगला, बागबगीच्या दोघांनाही सुटत नव्हता. त्यामुळे रमा आणि माधव खुश होतें. मुलं आपल्यापाशीच राहणार.


सीमा सकाळी उठत आणि नवरा बायकोच उरकून जॉबला जातं. अभिच्या आईवडिलांचं तिला काही पडलंच नव्हतं. अभिने हे पाहिलं तिला समजवलही आईबाबांना पण आपल्याबरोबर करत जा. ती सरळ म्हणाली, अभि सासूबाई घरातच असतात दोघांचं करायला त्यांना कितीसा वेळ लागतोय, तसंही या वयात अंगाची हालचाल हवी ना...? मला सकाळी कामाचा लोड येतो.


अभि तिला काही म्हणाला नाही.


झालं कष्टातून उभा केलेला संसार पण म्हातारपणी पण हातपाय हलवल्याशिवाय पर्याय नव्हता. रमा सीमाला काही न बोलता काम राहिलेली करत. संध्याकाळी सीमा येताना अभि आणि तिच्यासाठी आईस क्रीम घेऊन आली. अभिने तिला विचारले अग आईबाबा पण आहेत ना...!तू दोनच घेऊन आलीस.


अरे या वयात थंड खाऊ नये, आजारी पडले तर आपल्यालाच त्रास होईल. म्हणून त्यांना नाही आणले.


जीव मारून केलेल्या संसारात सुनेने स्वतःच्याच घरात पाहुणे करून ठेवले होतें.


सीमाचे माहेरकडचे लोकांचे सारखे जाणे येणे होतें. कारण माहेर तिला जवळच होत. तिचे आईवडील, बहीण आले की त्यांच्यासाठी आनंदाने करायची सगळं.


सीमाच्या बहीणच लग्न ठरलं होत. त्यामुळे ती खूप आनंदी होती. तिच्या मनात आलं या बंगल्यातच सगळे लग्नाआधीचे कार्यक्रम ठेवावेत. तसं तिने अभिला सांगितलं. आईबाबाना बोर होईल त्यांना देवदर्शनाचे टिकीत काढून देऊयात त्यांचही फिरणं होईल त्यानिमित्ताने. अभिने तिच्या म्हणण्यानुसार होकार कळवला. त्याने आईवडिलांनाचा कोणताही विचार केला नाही.


सीमा नेहमीप्रमाणे स्वतःचं आवरत होती. अभी आईवडिलांपाशी जाऊन त्यांच्याशी याविषयी चर्चा केली.त्यांना काही दिवसांसाठी देवदर्शनाचे टिकीट काढून देतो असही म्हणाला.


माधवला यावेळी खूप राग आला. रमाने त्याला नजरेनेच शांत केले. दोघंही जॉबला निघून गेले.माधव रमाला म्हणत होता हाच मुलगा आहे का...? ज्याच्यासाठी आपण जीवाचे रान केले. स्वतःचे आयुष्य पणाला लावले. रमा यावेळी मी शांत रहाणार नाही. मी यांना अद्दल घडवणार.....!


माधवने एक पत्र लिहून ठेवलं मुलासाठी आणि सुनेसाठी,


प्रिय अभि,


तुला आम्ही कसा वाढवला तुलाही माहिती आहे. कष्ट करून सोन्याचा घास खाल्ला असता स्वतःची आईची हौसमौस केली असती पण आम्ही मनमारून जगलो. तुझं आयुष्याच कल्याण करण्यासाठी आम्ही आमचं तरुणपण घालवल. या वयात चांगलं काही खावावं तर सुनेला ओझं. त्यात वयामुळे आजारपन मागं आम्ही मुलाचं हीत पाहिले हे आमचं चुकलं काय...! आमच्याच घरात आम्हाला पाहुणे म्हणून ठेवलंय. किती आमचं दुर्दैव...!आज आम्हाला या वयातही हातानं करून खावं लागतंय. तू लग्न ही मनाने करून आला त्यातही तुझ्या सुखात आमचं सुख समजलं. मी देवदर्शनाला जाईल माझी मी टिकीट काढुनच. तुला ती काढून देईला मी एवढा दुबळा झालो नाही. मी सक्षम आहे. जाताना मात्र मी माझ्या बंगल्याला कुलूप लावून जाईन. कारण माझं घर माझ्या कष्टाचं आहे. पाहुणे बनून तर तुम्ही माझ्या घरात राहताय. तुला जर माझे विचार पटत नसतील तर तुझं तू घर घेऊन सेप्रेट राहू शकतोस. माझ्या घरावर कोणीही हक्क दाखवायचा नाही. यापुढे आम्ही आमचं आयुष्य आमच्या मनासारखं जगू त्यात कोणी दखल घालायची नाही. तुम्हाला आमच्याकडून काही मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका. तसं तुम्ही दोघे समजदार आहात, पैसे कमावणारा आहात. त्यामुळे जास्त काही सांगायची गरज नाही. जर तुम्हाला आमच्याकडे पाहायला वेळ असेल तर कुलूप उघडून घरात जावा, नाहीतर स्वतःचे  घर घेऊन सेप्रेट राहावा. तुमचा प्रश्न....!!


तुमचा हितचिंतक,


संध्याकाळी आल्यावर दोघाच्या हातात ती चिट्टी आली, चावी त्याच्या बाजूलाच होती. चिट्टी वाचून अभिच्या डोळ्यात पाणी आले. त्याने आईवडिलांकडे खूप दुर्लक्ष केल्याचं त्याला कळाले. याच्याआधी तो आईबाबांना फक्त गृहीतच धरत होता, पण आज त्याचे डोळे उघडले.


सीमा आतापर्यंत माझ्याकडून खूप चुका झाल्या. मला त्या सुधारायच्या आहेत. तुलाही तूच कर्तव्य पार पाडावेच लागेल. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी मन मारून आयुष्य काढले. आता त्यांना मला आनंदात ठेवायचं आहे. खूप सहन केलं त्यांनी आतापर्यंत आता नाही. तू तुझे आईवडील असते तर कशी वागली असतीस तसंच माझ्या आईवडिलांशी वाग. सीमा शांत होती. तिलाही तिच्या चुका लक्षात आल्या.


चार दिवसांनी रमा आणि माधव देवदर्शन करून आले. घरात सजावट केलेली दिसली. दोघं येताच सीमाने दोघांचं ओक्षण केलं. दोघांची पाय धरून माफी मागितली. दोघानींही हसत मुलांना माफ केलं. शेवटी त्यांचं मन मुलांना माफ करण्याइतपत मोठ

होत.


खरच आहे ना...!

मुलांसाठी आईवडील आयुष्यभर राबतात.शेवटी तिचं मुलं त्यांना ओझं म्हणून सांभाळतात. कष्ट करून तरुण वय रुसून बसलेले असते, आणि त्यात खाल्लेले ही पचत नाही, हौसमौस करू शकत नाही .त्यामुळे वेळीच स्वतःकडे लक्ष देईला हवे.मुलांना धनदौलत कमवून ठेवण्यापेक्षा, मुलांना घडवताना सक्षम कर्तृत्ववान घडवायला हवे. चांगल्या संस्काराची बीजे चांगलीच उमलतील,


*************समाप्त ***********


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy