न सांगता उमजणं!!!
न सांगता उमजणं!!!
मैत्री केली, मनास भिडली,
शब्दाविना जणू साद घडली।
पण काळाने खेळी केली,
शंका मनात पुन्हा उगमली।
प्रेम दिलं, पण उरली भीती,
समर्पणात ही का रिकामी थिटी?
ओठांवर हसू, डोळ्यांत लीपी,
दुराव्यांची का ही मजा निती?
नाती आता मुखवट्यात लपली,
चेहरे ओळखीचे, भावना गुप्तली।
नाट्य संपता पडदा जरी उठला,
त्याच शब्दांना संशय सापडला।
जीव घुसमटतो, मन बधिरते,
कळतंय सगळं, पण काही न सुचते।
सांगावं कुणाला, ओझं हे मोठं,
शब्द न फुटता गहिवरच दाटं।
भिती ही की नसेल कोणी,
न सांगताही जो समजेल काही।
संपेल सारं, उरेल ना काही,
नि उडून जाईन, पक्षासम दु:ख साही...
