Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pooja Storymirror

Thriller Fantasy


2.3  

Pooja Storymirror

Thriller Fantasy


मुंबईदिल्लीमुंबई व्हाया बंगाल

मुंबईदिल्लीमुंबई व्हाया बंगाल

10 mins 9.0K 10 mins 9.0K

      मुलगी दिसली की लाल टपकली असं आमच्या राजेशचं चरित्र....

रोज नवे नवे स्वप्न पहायचे, रोज नवी अप्सरा स्वप्नात यायची. घरात सुंदर सुशिल आणि चरित्रवान पत्नी पण याचं तोंड नेहमी दुसऱ्याच पात्रात. कधीकधी तर हे साहेब उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहयचे आणि तिढा निर्माण करुन ठेवायचे. नंतर मग यांचे तिढे सोडवता सोडवता माझे मात्र नाकी नऊ यायचे. स्वप्न ही अशी तशी नाहीत, एकदम जंगी कधी पंतप्रधान व्हायचं तर कधी अमेरिकन राष्ट्रपती होऊन व्हाईट हाऊस गाठायचं.आणि फस्ट लेडी याची व्हायची. साहेबांचे जास्तीत जास्त स्वप्न मुलींचीच असायची. कधीकधी हे स्वर्गात पोहचायचे मेनका उर्वशीचे नृत्य पहायचे आणि शेवटी यांचा विश्वामित्र व्हायचा. याचे सारे स्वप्न हा मला डिटेल मध्ये सांगायचा आज मी त्यातलीच एक गोष्ट आपणाला सांगणार आहे.

    राजेश आणि मी दोघं बालपणीचे मित्र, म्हणजे ते काय लंगोटी यार वगैरे म्हणतात ना अगदी तसेच.....

कॉलेजात असतांना आमच्या कॉलेजात एका सुंदर मुलीची इंट्री झाली. मुलगी कसली एकदम धासू आयटम म्हणायला हरकत नाही. तेवर एकदम तिखट मुलंच काय मुली सुद्धा तिला पाहून तिच्याशी मैत्री करायला सरसावू लागल्या. नावं ही सनया लिमये मग मुलांना काय सनया ची केली सन्नी, हा फक्त लिमयेतं काही बदल केला नाही. पण जो तो फिलिंग मात्र सन्नी लिओनीचा करून घेऊ लागला. आता सारेच पुढे म्हटल्यावर मला वाटलं, आमचं हे राजेश नावाचं ब्याद ही ट्राय मारतं की काय ?

पण तसं बिलकुल झालं नाही, ती आली तेव्हा पासून हे आपले आमच्या सोबतीनं अलिप्तच. कॉलेजच्या मुलांना जरा नवलंच वाटलं, काहींना बरं ही वाटलं आता कॉम्पिटिटरच स्पर्धेतून बाद झालाय म्हटल्यावर आपली वर्णी लागणार म्हणून जो तो प्रयत्न करू लागला. मला ही काही कळेना. सन्नी आल्या दिवसापासून जणू कॉलेजचं आकलन करत असावी ! कोण कसं कोण काय ? आणि यातच ती एक दिवस सरळ आमच्या जवळ येऊन धडकली. आता आमचं थोबाड ही काही वाईट नाही म्हणा, पण तिनं सरळ राजेश कडे हात करत आपला परिचय दिला. हॅलो मी सन्नी,....

मग हळूच ओशाळल्या गत करत म्हणाली सॉरी मी सनया लिमये. राजेश तिच्या कडे नुसता एकटक बघत हातात हात देत उद्गारला राजेश....!

बराच वेळ हात हातातच होता. सगळी मुलं आमच्या कडे बघत होती मग मीच जरा काही न अडकलेला गळा साफ केला तसा राजेश भानावर आला. हातातील हात सोडत कट्ट्यावरचं थोडा बाजूला सरकून तिला बसायला जागा दिली.

मी कॉलेजात नवीन आलेय सारेच माझ्याशी मैत्री करायला उताविळ आहेत तशी मी सर्वांनाच मित्र मानणार पण स्पेशल मित्र ही हवाच ना ! म्हणून मला तुझ्याशी मैत्री करावी असं वाटलं. तसे तुम्ही दोघांना मी आल्या दिवसापासून अलिप्त बघतेय. मला फ्लर्ट करणारे मित्र फारसे आवडत नाहीत. तिनं आपलं वाक्य संपवलं अन् मला जोरात हसायला आलं.

तशी ती म्हणाली ए हॅलो दात काढायला काय झालं ?

मी एकदम शटर लॉक केलं .

तशी ती परत राजेश शी बोलू लागली, आता हिला कोण सांगणार आमचे हे महोदय फ्लर्ट करणारांच्या लाईनीत अव्वल आहेत म्हणून ......

पण तिचा तिखटपणा पाहून मी गप्प बसलो. राजेश अगदी सभ्य माणसा सारखा वागत होता. आणि मधून मधून तिला इंप्रेस करायचा चान्स ही सोडत नव्हता. सावज स्वतःच शिकाऱ्याकडे आलं होतं आणि शिकारीही उत्तम सहनशिलतेचं उदाहरण देत जाळं आवळत होता. तो दिवस संपला आणि रोजच अशा बैठकी होऊ लागल्या. दिवसा मागून दिवस जात होते. दोघांची मैत्री घट्ट होत चालली होती. तसा मी ही होतोच म्हणा पण साईड रोल मध्ये. त्यांची मैत्री हळूहळू केव्हा प्रेमात बदलली कुणालाच काही कळलं नाही. रूपाने जरी सनया मॉडेल असली तरी होती मात्र सुशील.....

            कॉलेज नंतर राजेश बिझनेस क्षेत्रात उतरला तर सनया एअर होस्टेस झाली. सनयाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वाऱ्या सुरु झाल्या. तिचा मुक्काम कधी मुंबई तर कधी दिल्लीला असे राजेशचा हा बिझनेस मुंबईत असल्यानं तिला राजेशला आठवड्यातून तीन दिवस तरी देता येत होते. पण दिल्लीत असतांना मात्र तिचा वेळ जात नव्हता, त्यातच तिची ओळख दिल्लीतच एक मराठी मुलगा राज शी झाली. तो ही बिझनेसमन चं होता. सनया केव्हा राजच्या प्रेमात पडली तिला कळलंच नाही. आता सनया मुंबईत राजेश तर दिल्लीत राज सोबत राहू लागली. एकदा अचानक मुंबईत राजेश सनयाला घेऊन एका कार्यक्रमात गेला कार्यक्रम जंगी होता. होता कसला माहीत नाही, पण अनेक नामी गिरामी हस्ती या कार्यक्रमला उपस्थित होत्या. चित्रपट क्षेत्रातली मंडळी, राजनितीक मंडळी,अनेक बिझनेस मन जंगी पार्टी होती नाचगाणे खानपान अगदी लग्न समारंभ व्हावा तसंच. आणि यातच राजेशच्या वतीनं मित्र म्हणून मी राज आणि शनयाच्या एंगेजमेंट अनाउसमेंट केली. एकदम तिला धक्काच बसला. पण तिनं तो सुखद धक्का म्हणून शो केला आणि दाखवले ही तसेच..... दोघांनी एक दुसऱ्याला अंगठी घालून समारंभ पार पडला.

         अशातच एका वरिष्ठ व्यक्तीने सुचविले जर हिला एंगेजमेंटलाच वेळ मिळत नव्हता तर लग्नाला कधी वेळ मिळेल, पार्टी जंगी सुरुय घ्या उरकुन लग्न ही...! पार्टीत एकच कुजबुज सुरु झाली. आणि थोड्या वेळाने तीच कुजबूज सहमतीत बदली झाली. ना सनया नकार देऊ शकली ना राजेश. त्याच समारंभात धुमधडाक्यात दोघांचे लग्न लागले . सनया राजेश बंगल्यावर पोहचले तेव्हा खूप रात्र झाली होती. काही नोकर चाकरांच्या मदतीनं मीच घाईगडबडीत त्यांची मधुचंद्राची खोली सजवली. आणि त्या रात्री एकदाचा मधूचंद्र उरकला. दोन दिवस कशीबशी सुटी घेऊन सनयानं लग्न एंजॉय केलं ना मेहंदी ना हळद लागलं लग्न. लग्न झालं खरं पण आता राजचे काय ? या विचारात सनया पडली. दोन दिवसानंतर सनयाने ड्युटी जॉईन केली. सनया दिल्ली पोहचली तेव्हा एअर पोर्ट वरच तिला राज भेटला कुठल्या तरी बिझनेस ट्रिपवरुन तो परतला होता. दोघं सोबतच राजच्या घरी आले. राजच्या घरी अगोदरच त्याचे आई वडील व सनयाचे आई वडील जमा झाले होते. ते ही सनया साठी सरप्राईज होतं. सर्वांच्या सोबत खूप गप्पा गोष्टी झाल्या सनया दोन दिवसापूर्वीच कुणालाही नकळवता लग्न करून आली होती. त्यामुळे ती जरा अस्वस्थ होती. अर्थात तिला ही कुठं माहीत होतं म्हणा, की मुंबईत जाऊन आपलं आणनफाणन मध्ये लग्न होईल म्हणून.....

सायंकाळी जेवण आटोपून सनयाच्या आईनं विषय काढला तो सनया आणि राजच्या एंगेजमेंट चा तशी सनया दचकून म्हणाली परत !

परत म्हणजे तुम्ही दोघांनी अगोदरच एंगेजमेंट केलीय की काय? आईनं विचारलं..... तशी तिनं सारवासारव केली अगं नाही मला परत जायचंय ना ते म्हणाले मी....

तू जा गं पण या चार आठ दिवसात आपण हा सोहळा उरकून घेऊ म्हणजे झालं. सनयाला काही सुचेना एकीकडे राजेश, लग्न,आणि मधूचंद्र सगळं डोळ्यासमोर तरळू लागलं आणि समोर हा परिवार..... काय करणार बिचारी डोक्यात विचारांचे थैमान सुरु झाले. त्यामुळे ती आत पळाली तिच्या जाण्याला सर्वांनी ती लाजली अशी समज करून लग्नाची पुढची बोलणी सुरु केली. विचार करता करता तिला केव्हा झोप आली कळलंच नाही. सकाळी लवकर उठून ती ड्युटीवर निघून गेली. आज तिची फ्लाईट दिल्ली-कोलकाता- बंगलोर मार्गे मुंबईत जाणार होती आणि तिची ड्युटी ही तिथेच संपणार होती. सनया ड्युटी संपवून घरी पोहचली राजेश ही नुकताच आला होता दोघांनी फ्रेश होऊन बाहेर जेवणाचा प्लान बनवला. सनया जरी सहज नसली तरी सहज वागण्याचा प्रयत्न करत होती. सनयाला राजेश जितका जीव लावायचा तितकाच राज ही तिच्यावर प्रेम करायचा त्यामुळे तिला कुणालाच दुखवू वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती ड्युटीवर पोहचली, तेव्हा खूपच अस्वस्थ वाटत होती. तिला तिची अस्वस्थता, तिची सहचारीणी आणि खास मैत्रिण मल्लिकाच्या नजरेतून मात्र ती लपवू शकली नाही.

काय झालं? सन्नी .....

काही नाही गं !

काही तरी आहे हे नक्की, अगं सांग तरी !

तसं तिनं तिला सारा वृत्तांत सांगितला.

मल्लिकाला राज बद्दल माहिती होती पण हे राजेश प्रकरण ही इतकं टोकापर्यंत असेल जे एकदम लग्न करून मोकळं होईल याची तिला कल्पना नव्हती.

आता राजेशशी लग्न तर झालं होतं, आणि राजला सोड असं मल्लिका सांगू शकत नव्हती. तशी मल्लिका एकदम बिंधास पोरगी, त्यामुळे तिनं सनयाला थोडे दिवस मुंबईत दिल्ली मुंबई व्हाया बंगलोर प्रवास सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आणि एंजॉय करून जगण्याचा ही.......

तिनं मग केलं ही तसंच घरच्यांच्या जिद्दीमुळे याच प्रवासात तिची राज सोबत ही एंगेजमेंट संपन्न झाली. बरेच दिवस ती लग्न टाळत राहिली त्यामुळे राज पासून सुरक्षित अंतर तिला ठेवता येत होतं पण राजेशचं काय ? आणि व्हायचं तेच झालं या प्रवासात ती चक्क तीन महिण्याची गरोदर झाली तेव्हा तिला कळलं. कारण सकाळीच ती चक्कर येऊन पडली होती. राजने घरीच डॉक्टरांना बोलावले होते. डॉक्टरांनीच ही गुड न्युज दोघांना दिली होती. इतका आनंदाचा क्षण असून ही सनया मात्र अस्वस्थ होती. राजेश ऑफिसला जाताच तिनं मल्लिकाला बोलावून घेतलं. आणि तिलाच उलटपुलट खडसवायला सुरवात केली. यावर मल्लिकानेच नवा उपाय सुचवला. 10 महिने ट्रेनिंग इन युरोप..... दिल्लीत ट्रेनिंगचा बहाणा केला, एअरलाईन कंपनीला मॅटर्निटी लिव मागितली. आणि मुंबईलाच युरोप केलं. राजेश तिची खूप काळजी घेत होता. राजशी ती नेट कॉलवरच बोलत असे जेणे करून युरोपचा फिल यावा. तिच्या युरोप ट्रेनिंग नंतर त्या दोघांचं लग्न होणार होतं. सहा महिने कसे बसे पार पडले. सनयाला मुलगा झाला. सनयाकडे अजून चार महिने होते. तिनं मुलासाठी एका आयेचा बंदोबस्त केला.आणि मुलगा चार महिन्याचा होताच, सुटी संपल्यावर ड्युटी जॉईन केली. आता तिचा प्रवास पुन्हा सुरू झाला मुंबई-दिल्ली-मुंबई व्हाया बंगलोर आता ती राजेश प्रमाणेच मुलालाही तितकाच वेळ देत होती. आणि याच प्रवासात एके दिवशी सनयाच्या वडिलांना हृदय विकाराचा झटका आला. तेव्हा ती मुंबईत होती. कसाबसा बहाणा करून ती तत्काळ दिल्लीला पोहचली होती राजेश ने ही सोबत येतो म्हणून तगादा लावला होता पण तुला बघून त्यांना काही झालं तर ? हा बहाणा करून तिनं त्याला टाळलं. डॉक्टर म्हणाले आता यांच्या मनाविरुद्ध काही होऊ देऊ नका म्हणजे झालं. आता सनया पुरती फसली होती. त्यातच वडीलांनी लवकरच लग्नाचा बार उडवा म्हणून सांगितलं. मल्लिकाला ही आता काही सुचत नव्हतं. शेवटी सनयाला हे ही लग्न करावंच लागलं. इतके दिवस सनया लग्नाचं कारण सांगून राज पासून स्वतःला दूर ठेऊन होती. पण आता ते कारण ही सांगता येणार नव्हतं. आणि परत एकदा बिचारीला मधुचंद्राला समोरे जावं लागलं. परत प्रवास,परत प्रेग्नेंसी..... या वेळेस ती राजच्या बाळाची आई होणार होती तिनं टाळायचा प्रयत्न केला पण बाबांच्या तब्बेती पुढे हार मानावी लागली. अवघ्या सहा महीण्या नंतर ती पुन्हा गर्भवती राहिली. पुन्हा मॅटर्निटी लिव घेता येणार नव्हती म्हणून तिनं सहामहीने गर्भ पोटात घेऊनच ड्युटी केली. बऱ्याचदा राजेशला शंकाही आली पण तिनं तब्बेत बरी नसल्याने गॅसची समस्या सांगून वेळ मारून नेली. शेवटी चार महिने मेडीकल लिव घेऊन तिचं दुसरं ही बाळंतपण सुखरुप झालं या वेळेस मात्र तिनं लगेच परिवार नियोजनाच ऑप्रेशन करून घेतलं म्हणजे पुढे त्रास नको. आणि तिचा पुन्हा तोच प्रवास सुरु झाला बऱ्याचदा राजेश नकळत दिल्ली आला तेव्हा तिला राज सोबत पाहिलं पण भ्रम म्हणून टाळाटाळ केली.कधी शहानिशा ही करण्याचा प्रयत्न केला पण मल्लिकाच्या मदतीनं तिनं तो प्रयत्न हाणून पाडला अगदी असेच प्रसंग राज सोबत ही मुंबईत घडले पण त्याला ही सनयाने हुल दिली. बघता बघता दोघं मुलं मोठी होत गेली. शाळेत जाऊ लागली आणि सनया दोन जात्यात पिसली जात होती. बऱ्याचदा ती कधी राज साठी राजेशला सोडून फ्लाईटचा बहाणा करून निसटली होती, तर बऱ्याचदा राजेशसाठी राजला सोडून निसटली होती.

आज मात्र सनयावर बाका प्रसंग उद्भवला होता सनया ची दोन्ही मुलं सी बी एस सी शाळेतून प्रथम आली होती त्यामुळे दोघांचा सत्कार बंगलोर मध्ये होणार होता आणि दोघांना आई बाबा सोबत हवे होते. आता काय करायचं म्हणून तिनं परत मल्लिकाला हायर केलं. मल्लिकाला हायर करता करता मल्लिका आणि माझ्यात ही केव्हाच फायर सुरु झालं होतं. आता हे राज मल्लिका समवेत मला ही कळलं होतं आणि म्हणूनच मी बंगलोर च्या त्या शाळेत पाच सिट अशा पद्धतीने सेट केले ज्यात राज,राजचा मुलगा, सनया,राजेशचा मुलगा, आणि राजेश आणि या दोघांच्या मागच्या लाईनीत आम्ही दोघं होते जेव्हा सनया राजशी बोलायची तेव्हा मी राजेशचं लक्ष डायव्होर्ट करायचो आणि राजेशशी बोलायला लागली की मल्लिका राजचं लक्ष डायव्होर्ट करायची कार्यक्रम जोरदार सुरु होता. वर्ग वाईज पुरस्कार वितरण सुरू झालं, मुलांसोबत आई-वडिलांना ही स्टेजवर आमंत्रित केलं जात होतं. हॉल फूल एसी होता पण सनया घामाघूम झाली होती. काय करावं काहीच कळत नव्हतं. त्यातच दोघं मुलांना एकाच वेळी सोबत स्टेजवर बोलावण्यात आलं. सोबत आई-बाबांनी यावं या साठी अनाउंसमेंट झाली . कसेबसे सारे स्टेजवर पोहचले. मुलांना पुरस्कार दिले गेले. पण फोटो काढायला जेव्हा मुलं आई सोबत फोटो काढायची जिद्द करू लागले तेव्हा सनयाची पंचायत झाली. आणि ही माझी मम्मी ही माझी मम्मी म्हणत दोघं मुलं भांडायला लागली. राज आणि राजेश ही अचंभित झाले. पण जेव्हा सनयानी दोघांना ही जवळ घेऊन समजवायला सुरवात केली. तशी राजेशला भोवळ आली, तो चक्कर येऊन खाली पडला. शेजारी सगळे उभे होते कुणी तरी पाण्याची बाटली आणून सनयाच्या हातात दिली ती हळूहळू त्याच्या तोंडावर पाणी शिंपडू लागली. राजेश बडबडू लागला तू असं का केलंस? सनया का केलंस? सनयानं झटकन चादर ओढली, आणि भसकन ओरडली वो महाराज जरा लाडात येऊन तोंडावर पुजेचं पाणीच शिंपडलयं, लवकर उठा नाहीतर बादली भरुनच ओतेल अंगावर, ऑफिसला जायचं नाहीये का ? आज आणि जातांना ते लाईट बिल ही भरा नाहीतर उद्या कनेक्शन कट झालं म्हणून समजा. तसा राजेश स्वप्नातून जागा झाला. एकटक ओल्या केसांचा जुडा बांधून सहावार साडीत उभ्या असलेल्या सनया कडे पाहू लागला. आणि भिंतीवरच्या शिवरायांच्या फोटो कडे पाहून उद्गारला बापरे काय भयानक स्वप्न होतं महाराज.....

महाराज माफ करा ! पुन्हा परस्त्री कडे चुकून ही वाकडी नजर करणार नाही माझी सनयाच माझी सन्नी लियोनी. राजेशनं मला त्याचं हे स्वप्न सांगितलं आणि खरंच त्याच्या मध्ये अमुलाग्र बदल झाला. किती भयानक होतं ते स्वप्न ! माणूस सहज अशी लफडी करतो पण बाईनं केलं तर.......?


Rate this content
Log in

More marathi story from Pooja Storymirror

Similar marathi story from Thriller