vidya,s world

Abstract Tragedy Inspirational

3.4  

vidya,s world

Abstract Tragedy Inspirational

मरणयातना

मरणयातना

3 mins
213


निलीमा आज भांबावून गेली होती..देव घरातील सारे देव गोळा करून तिने अंगणात जोरात फेकून दिले होते..सर्व जण तिला समजावून थकले होते..अग नीलू देव आहेत ते त्यांचा असा अपमान करू नकोस. त्यावर निलिमा जोरात हसू लागली... देव अपमान? अपमान तर त्या देवानं केला माझ्या भक्तीचा, माझ्या त्याच्यावरील विश्वासाचा काका? देवपूजा केल्याशिवाय कधीच मी कोणत काम केलं नाही. किती विश्वास होता मला या याच देवावर. पण हे देव इतके निष्ठुर असतात का हो? देव आहेत म्हणून कोणाच्या ही आयुष्या सोबत खेळू शकतात का? त्यांना हवं तसं वागू शकतात का? आणि आपण गप्प बसून हे सर्व सहन करायचं का? का तर देव आहेत हे म्हणून?


सात-आठ महिन्यांपूर्वी सर्वांनी मोठ्या मनाने दिलेला आशीर्वाद.. अखंड सौभाग्यवती हो.. वर्ष होण्याआधीच खोटा ठरला होता. तिने पुन्हा अंगणातील एक देवाची मूर्ती उचलली आणि तिला कवटाळून पुन्हा बडबडली.. देवा.. माझं चुकलं असेल तर माफ कर रे मला... मी तुझा अपमान केला.. पण तू मन मोठं करून माफ कर मला... फक्त माझा नील मला परत दे.. मी मी.. आयुष्यभर तुझी पूजा करीन.. देवा मला बाकी काहीच नको रे फक्त माझा नील परत दे रे.. असं म्हणून ती पुन्हा मोठ्याने रडू लागली... तिला पाहात असणाऱ्या प्रत्येकाचे हृदय हेलावून गेले होते.. कसं समजवायचं तिला हे ही त्यांना कळेना झालं होतं.


सती प्रथा बंद केली जगाने याचा आज तिला राग येत होता.. आज आपणही आपल्या नीलसोबत गेलो असतो ना? नीलीमा आणि नीलचं लग्न सात-आठ महिन्यांपूर्वीच झालं होतं. नील सैन्यात नोकरी करत होता. सर्वांनी नीलूला समजावलं होतं, नको हे स्थळ म्हणून पण नील सैन्यात आहे आपल्या देशाचं रक्षण करतो. मातृभूमीवर इतकं प्रेम करतो हे पाहून तिला खूप अभिमान वाटला होता.. नीललाही नीलीमा पाहतचक्षणी आवडली होती. खूप थाटामाटात त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर नीलने एक महिना सुट्टी घेतली होती. राणीसारखं नीलूला जपलं होतं. आयुष्यभर पुरेल इतकं प्रेम नीलने नीलूला एका महिन्यात दिलं होतं. नील आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. खूप खुश आणि सुखी होती नीलू नीलसोबत. सुट्टी संपली आणि नील पुन्हा ड्यूटीवर निघून गेला. दूर असला तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो नीलूसोबत तासनतास बोलत बसायचा. रोज व्हिडिओ कॉलवर ते दोघं एकमेकांना पाहायचे.


सात-आठ महिन्यांत नील २ वेळा येऊन गेला होता. आता पुन्हा तो पुढच्या महिन्यात सुट्टीवर येणार होता कारणही तसंच होतं. नील बाबा होणार होता ना... नीलूला नील या दिवसात आपल्या सोबत असावा अस खूप वाटत होतं पण त्याची नोकरी पाहता ते शक्य नाही हे तिला माहीत होतं. त्यामुळेच ती त्याला सुट्टी मिळायची वाट पाहत होती. खूप खुश होती ती. पण हे सुख देवालाही पाहवलं नाही. अतिरेकी हल्ल्यात नील शहीद झाला आणि नीलू पूर्ण पणे संपली. नील तर एकदाच मरण पावला पण नीलू तर आता आयुष्यभर क्षणक्षण मरणार होती. या मरणयातना तिला सहन होत नव्हत्या. आपणही नीलसोबत जावं असं तिला खूप वाटत होतं. पण... पण मग तिच्या पोटात वाढणाऱ्या नीलच्या अंशाचं काय होणार? तोहीतर नीलूसोबत संपणार ना? त्यांच्या प्रेमाची एकमेव निशाणी तिला गमवायची नव्हती. नीलचे आईबाबाही तुटून गेले होते. एकुलता एक मुलगा डोळ्यासमोर गेलेला पाहून कोणत्या आईबापाला जगावंसं वाटेल? पण तरीही ते नीलूला आधार देत होते. नीलूलाच आता नील व नीलू दोन्ही बनून आपलं कर्तव्य पार पाडायचं होतं. नीलच्या आईबाबांना सांभाळायचं होतं. त्याच्या निशाणीला जपायचं होतं आणि मरणयातना सहन करत जगायचं होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract