मनी मल्हार #4
मनी मल्हार #4


मुंबई गणराज्याच्या जय..! जय..! कारात मंत्र मुग्ध होऊन दहा दिवस झाले होते. आज विसर्जनाचा दिवस उजाडला होता. बाप्पाला अखेराचा निरोप देण्यासाठी सर्वत्र आनंदी आणि जल्लोषाचे वातावरण होते. मनी गोदरेज हॉस्पिटलच्या ICU विभागाच्या बाहेर आदल्या दिवशी घडलेल्या घटनेचा मागोवा घेत विचारांची जुळवणी करत बसली होती. इतक्यात ICU रुम मधून आईला रडत बाहेर येताना पाहून मनी आई जवळ गेली. आई हुदंके देत रडत म्हणाली
“जिद्द सोड बाळ..! ह्या पुढचा धक्का तुझे बाबा सहण करु शकणार नाही..!”
तिने डोळ्यातले ओघळणारे अश्रू पुसत म्हणाली “मम्मी..?” आणि आईला रडत मिठ्ठी मारली.
आई तिच्याकडे आशेच्या नजरेने पाहात होती……
मनीने मोबाईल स्क्रिन लॅक ओपन करुन मल्हारला फोन केला…फोनच्या रिंग सोबत तिच्या मनातं मल्हारला कसं सांगाचं हा प्रश्न विसर्जनाच्या धुमधामीत गोंधळ माजवत होता…तितक्यात मल्हारने फोन उचलला आनंदी जल्लोषा आवाजात विचारलं
“ हाय..तुला रेकॉर्ड केलेली आरती पाठवली होती.. ऐकलीस का? ”
तिने उत्तर दिलं “हो..खुप छान होती…”
“ऐक..ना…! मला भेटायचं आहे.. कुठे आहे तु..? ”
मल्हार थोडा विचारत पडला. पण लगेच म्हणाला “ घाटकोपर मध्ये एक विसर्जनाची ऑर्डर आहे… मी तिकडेच येतोय…तु भेट स्टेश्नला..!”
मनी गहिवरुन आलेल्या मनातील अश्रू गोठवतं आईला “येते…मी…!” म्हणतं हॉस्पिटल मधुन बाहेर पडली….
घाटकोपर स्टेश्नच्या प्लॅटफार्म नंबर एकवर मल्हार मनीची वाट पाहत उभा होता….त्याने समोरुन मनीला रेल्वे ब्रिज उतरताना पाहिलं. तिच्याकडे वेग घेत तो तिच्या जवळ गेला. तिचे डोळे भरुन आले होते. तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याने तिच्या केसांना प्रेमळ स्पर्श करत तिला समोर घेत. तिच्या डोळ्यात पाहीलं तिचे डोळे भरुन आले होते. पण अश्रू बरसत नव्हते… त्याने विचारलं “काय झालं…?”
मनीचे ओठ हलकेशे हालले आणि त्याच्याकडे पाहतं म्हणाली “मल्हार.. मला माफ कर..! तुझ्या मनात माझ्या बद्दलं जे काही आहे ते विसरुन जा…प्लिजं…”
(रेल्वे स्टेशन मधल्या ट्रेनचा आवाज , चोहीकडे गणेश उत्सवाची धुम टाळ मृदुंगाची, वेगवेगळ्या DJ चा धुमधडाका सोबत विसर्जनाचा गुलाल, पावसाच्या मल्हारात भरुन त्याने जोर धरला होता….
बरसणा-या पावसात तिचे ते शब्द पावसाचे थेंब होऊन त्याच्या मनावर वार करत होते..आणि त्याच्या मनातील विहाळण्याचा आवाज त्यात वाहुन जात होता… दोघ ही जरी मनांने वेगळे नव्हते हे तिला ठाऊक असून ही तिने....त्याला...सोडण्याचा निर्णय त्याच्यावर लादला होता.... ) तो तिच्याकडे पाहतं स्तब्ध उभा होता. त्याच्या शरीरातून जणू कोणी त्याचा प्राण काढून घेतला होता…त्याने पुढे बोलण्याकरिता ओठ उचलले पण शब्द जुळत नव्हते. त्याने तिच्या डोळ्यात गहिवरुन पाहिलं आणि म्हंटलं “ बाबा…?”
पुढे काहीही न सांगता. ति त्याच्या पासून दुर झाली..आणि वळून ट्रेन पकडण्यासाठी चालू लागली..त्याने तिचा हात पकडत तिला थांबवतं विहाळणा-या मनातुन दु:ख एकवटून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते…..मल्हार मनीला पाहत होता…मनी ट्रेनच्या दरवाज्यात उभी राहुन त्याला शेवटच पाहुन घेत होती….तसं ट्रेनने वेग घेतलां… वीजांचा आणि ढगांच्या कडकडात होऊन जोराचा पाऊस सुरु झाला….ट्रेनच्या गती सोबत दोघेही एकमेकांपासुन वेगळे झाले… मनीने रागात मोबाईल फोन उघडून त्यातलं सिमकार्ड काढलं आणि धावत्या ट्रेन मधुन बाहेर फेकुन देत… सकाळपासुन गोठलेल्या अश्रूंचा डोह फोडला… “ मल्हार…! मल्हार..! ” सर्व कोच मधल्या स्त्रिया तिच्याकडे पाहतं होत्या….इतक्यात विक्रोळी स्टेशनला ट्रेन थांबली..
मनीचा विचारांचा गुंता अजुनही सुटत नव्हता..तिने जे केलं त्यावर अजून ही ति विचार करत होती..तिच्या मनात मल्हारने तिच्यासाठी रेकॉर्ड केलेल्यां टाळ मृदुंग आणि DJ चा किक हार्डचा स्वरा सोबत गणेशाच्या प्रार्थनेचे स्वर सुरु झाले……...घालीन लोटांगणऽऽऽऽऽ……. वंदीन चरण डोळ्यांनी पाहीन रुप तुझेंऽऽऽऽ…….. ति स्टेशन बाहेर आली… विसर्जनाचा जल्लोष्यात जोरदार पावसा सोबत सुरु होता….प्रेमें आलिंगनऽऽऽऽऽऽऽऽऽऽ…. मल्हारची शेवटची भेट आणि त्याच्या मिठीतले शेवटचे क्षण तिला आठवू लागले…. आनंदे पूजिन भावें ओंवाळिन म्हणे नामाऽऽऽऽऽऽ.. विसर्जनाच्या मिरवणूकीतुन तिच्या समोर बाप्पाची मल्हार रुपातील मुर्ती पुढे जात होती….तिने डोळे मिठून मनोमन प्रार्थना केली… “ बाप्पा मला माफ करं…, माझ्या आयुष्यातील सर्व सुखं मल्हारला मिळू दे….त्याची सर्व स्वनं पूर्ण होऊ दे…” तिचे अश्रु विसर्जनाच्या वर्षावा सोबत वाहुन नष्ट होत होते… त्वमेव माता च पिता त्वमेवऽऽऽऽऽऽऽ…. तिने काल बाबा सोबत केलेले भांडण आठवू लागली.... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेवऽऽऽऽऽऽ…. जातीयतेच्या राजकारणात बाबानी स्वत:ची पाटीलकी वाचविण्यासाठी मल्हारवर केलेले दोषारोप आणि दिलेला नकार तिला तिक्ष्ण बाण होऊन टोचत होते… त्वमेव विद्या द्रविणं त्वमेवऽऽऽऽऽऽ… त्याला उत्तर म्हणून ति रागात म्हणाली “ मी त्याच्या प्रेमात पडले हे खरे आहे आणि त्याचं ही माझ्यावर तितकच खर निस्वार्थी प्रेम आहे.” तिच्या वागण्यात उध्दटपणा आणि उर्मटपणा होता. त्वमेव सर्वं मम देवदेवऽऽऽ………ह्यामुळे बाबांचा चेहरा आणखीनच रागीट लालबूंद झाला. क्षणार्धात बाबा खाली कोसळले. त्याना दुसरा हार्टअट्यक आला होता….. (विसर्जनाच्या गर्दी आणि ट्राफिक मधुन कशी बशी तीला ऑटोरिक्षा मिळाली.. ) तिच्या मनात आरतीचे स्वर सुरुच होते…… अच्युतं केशवं रामनारायणऽऽऽऽऽऽ.. आधुनिक भारतात जात नावाच राजकारण अजुन ही तळ ठोकुन होतं ह्याची जाणीव तिला प्रकर्षाने जाणीव झाली….. ‘जात’ हा शब्द व्यव्हारातुन जात होता. पण मनातून ‘जात’ नव्हता. कृष्णदामोदरं वासुदेवं हरिऽऽऽऽऽऽऽऽ….विचारांचा गुंता सोडवत वेग घेत तिने हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला….हरे रामऽऽऽ..हरे रामऽऽऽऽ , राम राम हरे हरेऽऽऽऽऽऽऽऽऽति लिफ्टची वाट पाहत उभी. ति जेव्हा हॉस्पिटलच्या बाहेर पडली होती. तेव्हां तिला विचारांच्या गुंता सोडत असताना तिच्या समोर आयुष्यचा निर्णय घेण्यासाठी दोन पर्याय उभे होते. एकतर ति मल्हार सोबत पळून जाऊन पुढचं आयुष्य सुरु करुन शकत होती. पण त्या मोठी रिस्क वाटत होती . तिने घर सोडून गेल्यानंतर बाबांना जर तिसरा हार्टअट्यक येऊन जर त्यांचा जीव दगावला गेलातर तीच्या मनात त्या दु:खाचा कवडसा तिच्या मनी वसुन तिला आयुष्यभर सळत राहणार होता. दुसरा पर्याय होता. बाबांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करुन मल्हारला सोडून देण्याचा..आणि म्हणून ति त्याला शेवटची भेटून आली होती. हरे कृष्णऽऽऽऽऽऽ…हरे कृष्णऽऽऽऽऽ… इतक्यात लिफ्ट आली. मनीने लिफ्ट मध्ये प्रवेश केला. मल्हारवर मनापासून प्रेम असून ही त्याला सोडून बाबांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्यासाठी आणि पुढची वाटचाल सुरु करण्यासाठी… कृष्ण कृष्णऽऽऽऽऽऽ.. हरे हरे ऽऽऽऽऽ…..तिने लिफ्टच निर्णायक बटन दाबून आयुष्यत उंच भरारी घेतली….
(जातीचा सम्मान आणि अहंकारात , विसर्जनाच्या जल्लोष्यात दोन तुटलेल्या मनाचा आवाज विरुन गेला…..)