मंद दिवा
मंद दिवा
एका मुलाचा जन्म फार संपन्न घराण्यात झाला होता. त्याच्या जन्मानंतरच त्याचे वडिल स्पॅनिश फ्लु नावाच्या महामारीतच मरण पावले होते. त्याचे वडिल घरात जेष्ठ असल्यामुळे ते त्या परिवाराचे प्रमुख नायक होते.त्यांना दोन मुले व एक मुलगी होती. त्या संयुक्त परिवारात त्यांचे दोन धाकटे भाऊ आणि त्यांचा परिवार एकाच वाडयात राहत होते. नायकाचा मृत्यु झाल्यानंतर घर प्रमुखाची जवाबदारी त्यांच्या पेक्षा धाकटया भावावर वर आली होती. त्या मुलाचे काका म्हणजे नविन घर प्रमुख व्यवहारात फारसे हुशार नव्हते. त्यांना ऐवढा मोठा खटला सांभाळता आला नाही. नाका पेक्षा नथ जड. हळु-हळु त्यांच्या वर कर्ज वाढत गेले होते. घरातील कार्य-प्रसंगावर अतोनात आपल्या ख्याती प्रमाने खर्च करत होते. त्याचा परिणाम असा झाला कि कर्जासाठी गहाण ठेवलेल्या जमिनी वर सावकाराने चालाकिने कब्जा केला होता. तो खटला आता अर्श वरुन फर्श वर येवून ठेपला. मोठा वाडा आणि पोकळ वासा अशी कुंटुंबाची परिस्थिति होती. तो पर्यंत त्यांच्या जेष्ठ भावांची मुले मोठी झाली होती. लहान मुलगा त्या काळात मॅट्रिक पास झाला होता. आता उरलेल्या संपतीची कुटुंबा प्रमाने वाटण्या झाल्या होत्या. शिकलेल्या मुलावर स्वातंत्र चळवळीचा चांगलास ठसा उमटला होता. त्यामुळे आपण इंग्रज सरकारची नोकरी करायची नाही असे ठरविले होते. ते आपल्या कुटंबाचा खर्च शेती करुनच चालवत होते. परिवारात चार मुले आणी दोन मुली होत्या. शेती मध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अकाळी पाऊस आणी पुरामुळे हमखास सिमित जमिनी मधे उत्पन्न होत नव्हते.वडिलोपार्जित जी धन संपदा होती ती ही संपत आली होती. समोर आपल्या परिवाराचे भविष्य या शेती मध्ये निश्चितच अंधारात असणारच याची त्यांना जाणीव झाली होती. मुलांना शिकवल्या शिवाय त्यांचे भविष्य उज्वल होणार नाही या विचाराने त्यांनी आपले मुळ गांव सोडण्याचे ठरविले होते आणी ते जवळच्या शहरात राहण्यासाठी गेले होते.
ते शिकले असल्यामुळे त्यांना लगेच एका निजी बैंकेत नोकरी मिळाली होती. वडिल भाऊ त्यांची शेती बघत होते.त्यामुळे परिवाराला अन्न-धान्य सोबतच किंचित आर्थिक मदत होत होती. त्यामुळे मुलांचे शिक्षण वैगरे व्यवस्थित चालू होते. भारत स्वतंत्र झाल्या वर बैंकेचे राष्ट्रियकरण झाल्या मुळे त्यांची आर्थिक परिस्थिति सुदृढ झाली होती. त्यांचे त्या शहरात दोन मालाचे घर पण होते. जेष्ठ मुलगा बैंकत नौकरीला लागला होता. त्याचे लग्न झाले होते. त्याला पहिला मुलगा झाला होत. आजी-आजोबा पहिला नातू झाल्यामुळे फार आनंदित होते. नातु त्यांच्या डोळ्यांचा तारा होता. नातु दिसायला एकदम गोंडस होता. त्याचा सर्वांना अभिमानच होता.आजोबांचा दुसरा मुलगा पण शिकला होता. पण त्याला नौकरी इतरांप्रमाने मिळाली नाही. त्यामुळे त्याला शेतीवर पाठवण्यात आले होते. सर्वच मुला-मुलींचे लग्न झाले होते.नौक-यामुळे जो संयुक्त परिवार होता तो विभक्त झाले होते.तरी सर्वांमधे आपसी स्नेह व आपुलकी कायम होती.
आजोंबांचा मोठा मुलगा त्या काळातील वडिलांसारखे रागीट होते. त्यामुळे त्यांचे मुल वडिलांशी फारसे मोकळे नव्हते. वडिलांच्या भितीमुळे आजोबांचा मोठा नातू भीतरा झाला होता. तो आपले सर्व कार्य आई मार्फत करत होता. त्याने मॅट्रिकची परिक्षा चांगल्या अंकाने उत्तीर्ण केली होती. त्या आधारावर त्याला तेव्हाच पॉलीटेकनीक ला शहज प्रवेश मिळत होता. पन त्याची इच्छा इंजिनिअरिंग करण्याची होती. त्यामुळे त्याने बारावीं सायंसला प्रवेश घेतला होता. तो बारावींला असतांना त्याच्या आईचे पडल्यामुळे हात आणि पायाचे हाड मोडले होते. ती जवळ-जवळ वर्ष भर खाटीवरचं होती. त्याने बारावीची परिक्षा दिली पण तो त्यात यशस्वी होवू शकला नाही. दुस-या प्रयत्नांत त्याला यश मिळाले होते.पण इंजिनिअरिंगची प्रवेश परिक्षा पास करु शकला नाही. नंतर त्याने पॉलीटेकनीक केले होते. नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. नकट्टीच्या लग्नाला सतराशे साठ विध्न, तीस-या वर्षात असतांना त्याच्या आईला कॅन्सर झाला होता. व त्याचे त्यामुळे शिक्षनातून मन ऊडाले होते. मिनीटाची फुरसत नाही, अन दिडकीची कमाई नाही. तो खुप कष्ट करत होता. पण काहीही त्याचा त्याला उपयोग होत नव्हता. व त्याला नंतर नौकरी पण जवळ-पास मिळाली नाही. त्यासाठी त्याने मुंबई-पुण्या कडे धाव घेणे आवश्यक होते. त्याच्या धाकट्या भावाला संगती मुळे वाईट सवयी लागल्या होत्या. त्याची बहिण लग्नाची झाली होती.आणि आईच्या आजारापण मुळे तो खचुन गेला होता. बहिनीचे लग्न करण्यात आले होते. धाकटा भाऊ कसा-तरी सुधरुन निजी कंपनीत नौकरीला लागला होता. कॅन्सर मुळे आईचे निधन झाले होते. त्याला नौकरी नसल्यामुले व त्याचा मनावर परिस्थितिचा प्रतिकुल परिणाम झाल्या मुळे त्याने लग्न न करण्याचा प्रण केला होता. शेवटी लहान भावाचे लग्न करुन देण्यात आले होते. एक ना धड भारा-भार चिंध्या.पण कौटोंबिक कलह झाल्यामुळे त्यांच्यात फाटा-फुट झाली होती. शेवटी दोघे भाऊ अलग-अलग एकाच घरात वर-खाली राहत होते.
आडयात असतांनाही पोह-यात उतरले नाही.आपल्या लाडक्या नाताची अशी अवस्था पाहुण आजी-आजोबांना फार दुःख झाले होते. आजोबांनी जी हिम्मत करुन आपल्या परिवारासाठी प्रगतीचे पाऊल उचलले होते. व त्यात त्यांनी सफलता ही मिळली होती. पण अयशस्वी नाता कडे बघुन त्यांनी तैयार केलेल्या जमिनीचा उपयोग केला नाही असे त्यांना शेवट पर्यंत वाटत होते. त्यांचे स्वप्न होते कि त्यांच्या जेष्ठ नाताने इतरान साठी एक आदर्श स्थापित करावा !. जेष्ठ नाताच्या प्रगतीच्या दिव्या मधुन पडणा-या लख्ख प्रकाशाने इतर नातवंडना मार्ग दिसावा !. पन त्यांचे दूर-दैव अशे घडु शकले नाही.आलीयां भोगाशी असावे सादर. पण त्यांचा लाडका नातु परिस्थितिशी झुंज देवु शकला नाही.त्यांचा दिप हा मंद दिप किंवा दिवा स्तापित झाला होता. आली आंगावर तर घेतली सिंगावर.कोणत्याही परिस्थितिला तोंड देण्यासाठी काही मनाची तैयारी असावी लागते. कोनतेही जीवणात लक्ष साध्य करण्यासाठी उघड्या डोळ्यानेच त्याचे स्वप्न बघावे लागते, त्या साठी मनाचा निर्धार असावा लगतो. साध्य प्राप्त करण्यासाठी एक शिस्त असावी लागते व सोबत त्याला एक दिशा आणी एक निश्चित वेळपण ठरवावी लागते. जेष्ठ नाताने शिस्त आणि वेळ या कडे दुर्लाक्ष केले म्हणुन आजोबांचा आवडता तारा हा प्रकाशमान दिपक होवु शकला नाही?.
