Neelima Deshpande

Inspirational

3.0  

Neelima Deshpande

Inspirational

मला गवसलेली नवदुर्गा !

मला गवसलेली नवदुर्गा !

6 mins
329




सारिकाने इंटरव्हू घेतल्यापासून प्रत्येक राऊंड नंतर 'तो' तिला भेटत होता आणि अपडेट देत घुटमळत होता. नंदिनी आणि सारिका एकाच टीम मधे असल्याने पहिला राऊंड घेवून मग नंदिनी सारिकावर पुढच्या सगळ्या राऊंडचे को-ऑर्डिनेशन करुन फायनल HR राऊंडला परत हजर व्हायची. दरम्यान तिला लक्ष घालावे लागेल असे बरेच काही तिची वाट पाहत असायचे. शिकण्याची हौस असलेल्या टीममेट सारिकाला, हळूहळू ती शिकवून तयार करत होती.

पटन्याहून नुकतेच शिक्षण संपवून आलेली एकटी मुलगी म्हणून नंदिनीची नजर इतर मुलींसोबत हिच्यावर खास होती. त्याला कारणही तसचं! एक तर ती अल्लड होती आणि दुसरे म्हणजे ऑफिस मधे नवीन! त्यामूळे सगळ्यांच्या टारगेट लिस्टमधे होती ती! तिची काही चूक व्हायचा अवकाश, आजवर बोट न दाखवता आलेले HR and Training Department मग हास्याचा विषय बनले असते. मुळात अनेक कामे, एकाच वेळेवर चोखपणे बजावण्याची आणि शांततेते सगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याची पात्रता व विशेषता अशी नंदिनीची प्रसिद्धी कायम होती.


तिच्या कामाने आणि प्रामाणिक पणाने तिने एक वेगळे स्थान व आदरयुक्त दबदबा मिळवला होता. तिच्या शब्दाला सगळ्या स्टाफमधे आणि मैनेजमेंट टीम मधे देखील विशेष मान होता.


थट्टा मस्करी जोवर निखळ विनोदापोटी आणि सहजपणे चालू असायची तोवर नंदिनी फारसे त्यात लक्ष घालत नसे. तो मोकळेपणा तिने मिळू दिला तेंव्हा मोकळेपणा व थिल्लरपणा यातल्या सीमा रेषा व फरकही तिने समजावला होता. लक्ष न देण्यास तसे तिच्या मागे सिलेक्शन पासून ट्रेनिंग पर्यंत आणि सैलरीशीट बनवण्या पासून सगळ्यांच्या अडचणी सोडवणे असे अनेक व्याप होते.


निवड झालेले सगळे उमेदवार परत गेले. तरी 'तो' मात्र वाट पाहत बसून होता. मिटींग संपवून परतलेल्या नंदिनीने,


"तुम्हाला आणखी काही विचारायचे आहे का? काही शंका आहेत का?" असे विचारताच त्याने,


" नाही मला फक्त सारिका मैडमला सांगायचे होते की, 'मी नक्की जॉईन होतोय म्हणून!' आणि त्यांचा नंबर हवा होता कधी काही विचारायचे झाल्यास....."


हे सांगितले. नंदिनीने त्याला ऑफिसचा लैंडलाइन नंबर देत पुढच्या बैचला ट्रेनिंगसाठी आत बोलावले आणि मग मात्र त्याला नाईलाजाने तिथून उठून जावे लागले. चार दिवसात तो परत हजर झाला. डोक्याला, हाताला मार लागलेला आणि ड्रेसींग करुन सरळ तसाच ऑफ़िसला आलेला. ऍक्सीडेंट झालेला दिसत असल्याने आणि मार्केटिंग डिपार्टमेंट साठी निवड झालेला असल्याने नैतिक कर्तव्य म्हणून व माणुसकीच्या नात्यापोटी, नंदिनीने त्याच्या साठी चहा मागवत त्याची विचारपूस केली. तिला समजल्या नुसार, त्याचा अपघात बराच दूर होवूनही तो इथे ऑफिसला आज का आला असावा? याचे कोडे काही तिला उलगडले नव्हते. त्याची जॉईनींग तर एक महिन्यानंतर होती. पण हे त्याला विचारण्या आधी तिला मिटिंगला लगेच बोलावल्याचा निरोप मिळाला म्हणून त्याचा निरोप घेवून नंदिनी गेली.


तिची मिटींग बराच वेळ चालली होती. 'तो' अजूनही तिला काचेच्या दारातून वेटिंग एरीया मधे बसलेला दिसत होता. नंतर 'तो' कधी गेला? याची चौकशी करताना तिला टीम कडून समजले की तो प्रत्येकाजवळ सारिकाची चौकशी करत होता आणि त्यांना तिचा नंबर मागत होता. हे ऐकून विचित्र वाटले तरी सारिका रजा घेवून गावी तिच्या घरी गेलेली असल्याने नंदिनीला, तिला हे लगेच विचारता आले नाही.


छ्टपुजे साठी गावी गेलेल्या सारिकाचा काही दिवसात फ़ोन आला तोच मुळी हे सांगायला की,


"मैडम इथे आल्यावर पसंत पडलेल्या एका स्थळाला मी होकार देताच माझ्या आई वडीलांनी माझा साखरपुडा करुन घेतला आहे आणि लग्नही लवकरच ठरवत असल्याने मी कदाचीत लवकरच नोकरी सोडेल."


आयुष्यात एक पाऊल पुढच्या टप्प्यावर पडत असल्याचा आनंद जसा सांगताना सारिकाला झाला तसाच तो ऐकताना नंदिनीलाही झाला होता. त्यामूळे तिने आनंदाच्या प्रसंगी सारिकाला त्या नव्या उमेदवाराची गोष्ट व तिची चौकशी करणे त्यावेळी तिला खटकणारी वाटली हे सांगणे टाळले.


मधल्या काळात सारिका ऑफिसला येवून नोटीस पीरियड सर्व्ह करुन लग्नासाठी सर्वांचा निरोप घेवून नोकरी सोडून गेली देखील. जाण्याआधी तिने,


"मी घरी सुट्टीत असताना मला अनेक वेळा कॉल येत होते पण मी उचलू शकले नाही, तेंव्हा तुम्ही ते काम प्लीज करून घ्या!"


हे सांगितले. एका नंंबर वरुन खुप वेळा कॉल गेल्यामुळे नंदिनीने कॉलबैक केला तेंव्हा समजले की, तो नंबर 'त्या निवड केलेल्या उमेदवाराच्या' बायकोचा आहे. तिचा नवरा "त्याच्या फोनला रेंज नाही हे सांगून तिचा फोन वापरत होता.त्यामूळे तिला त्याच्या फोन करण्याचे कारण माहीत नव्हते. नंदिनीने बैकग्राउंड लवकरच चेक करायचे ठरवले. सगळाच प्रकार गोंधळात टाकणारा होता त्यामूळे तिने सारिकाला कॉल लावून चौकशी केली. त्यात ती 'त्या' उमेदवाराला यापूर्वी ओळखत नव्हती हे समजले. ऑफिस मधे झालेली भेट पहिली आणि शेवटची होती व तिलाही तो विचित्र वागतोय हे जाणवले त्यामूळे ती त्याला टाळत होती हे ही सारिकाने सांगितले. नंतर गावी आल्यावर तर ती साखरपुडा आणि पुढच्या तयारीत असल्याने सारे सांगणे विसरली हे नंदिनीला सांगून तिनेच काळजी व्यक्त केली. नंदिनीने तिला,


"तू निर्धास्त रहा आणि लग्नाची तयारी कर. इथे मी आहे सांभाळायला अशी ग्वाही दिली. स्वत: जोवर कारण समजून घेत नाही आणि ठोस पूरावा सापडत नाही तोवर ती काही करु शकत नाही हे माहिती असल्याने नंदिनी त्यादिवशी शांत राहिली.


दोन दिवसांनी निवड झालेले सगळे उमेदवार ऑफिसला HR इंडक्शन व ट्रेनींंग साठी येवून आपापल्या जागी बसले. 'तो' मात्र एकटाच बाहेर फिरताना नंदिनीला दिसला. त्याला योग्य ती समज देवून तिने आधी आत येवून बसायला सांगितले. त्याचे ट्रेनिंंगमधे अजिबात लक्ष नव्हते. दहाव्या मिनिटाला,


"तुम्हाला काही शंका असतील तर मला आत्ता विचारा"

असे नंदिनीने म्हणताच त्याने ट्रेनींग बद्दल सोडून सारीका बद्दल चौकशी करायला सुरुवात केली...


" सारीका मैडमचे लग्नं झाले की त्या परत येणार आहेत का? नसतील तर त्या कुठे जॉब करणार आहेत हे माहिती आहे का? मला त्यांच्याच कडून ट्रेनिंग घेता येईल का? मी त्यासाठी नंतर जॉईन करु शकतो का? "


त्याचे प्रश्न ऐकताना नंदिनी प्रत्येकाने भरलेला फॉर्म जमा करुन घेत होती आणि काय लिहिले आहे हे चेक करत होती. त्याचे बोलणे ऐकताना एकिकडे तिला त्याच्या फॉर्म मधे 'marital status' समोर अविवाहित असे नमुद केलेले दिसले आणि एकदम तिच्या रागाचा पारा चढला. तिने सरळ त्याच्या बायकोला फोन लावला आणि शाहनिशा केली.


आजवर शांत आणि समजूतदार म्हणून ख्याती असलेल्या नंदिनीने त्याला बाहेर जायला सांगितले. त्याने वाद घालण्याचा व सारिका मैडमची माहिती द्या मग जातो म्हणून तिथेच घुटमळण्याचा प्रयत्न करताच नंदिनी त्याचावर ओरडली,


"आत्ताच्या आत्ता इथून निघाला नाही तर मी पोलिसांना बोलवत आहे. परत सारिकाच काय पण माझ्या ऑफ़िसच्या कुठल्याही मुलीच्या वाट्याला गेलास तर माझ्याशी गाठ आहे ! या आवारात किंवा जवळच्या भागात जरी दिसला कधी, तर धडधाकट सोडणार नाही तुला! आधी आम्ही धुलाई करू आणि नंतर पोलीस करतील!"


नंदिनीचा वाढलेला आवाज ऐकून नव्या व खास करुन जून्या सगळयांनी तिच्या कडे मदत करायला धाव घेतली. त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल अशा रागात नंदिनी उभी होती. तिच्या डोळ्यांतला संताप पाहून काहीतरी भयंकर चूक केलेली असणार हे समजून स्वत: डायरेक्टरने गार्डला बोलावून 'त्याला'बाहेर काढले.


बायकोला केलेल्या कॉलमधे नंदिनीला समजलेल्या गोष्टीवर तर 'त्याचे' सगळेच पितळ उघडे पडले होते, जे तिने


"नेहमी शांत असलेल्या तुमचा आज प्रथमच हा 'दुर्गाअवतार' पाहिला आणि एक स्त्री रक्षणासाठी कुणाच्या पाठी उभी राहिली तर काय होते हे पाहिले आणि जवळून त्याची प्रचिती आली. तुमच्या बद्दलचा आदर अधिकच वाढला आता."


असे सगळ्यांनी म्हणत तिला शांत करताच तिने त्या मागचे कारण सर्वांना सांगितलं.

"श्रीमंत सासरा व त्याची भोळी लेक यांना फसवत नोकरी सोडून 'तो उमेदवार' फक्त रोज दिवसभर अनेक ठिकाणी हिंडत रहायचा. कधी नोकरी शोधण्याच्या निमित्ताने कुठल्या ऑफिस गेला तर तिथे शोधलेल्या मुलींशी मैत्री करून त्यांच्या पैशांवर स्वत:चे खाणे पिणे आणि मग त्यांना फसवणे हा त्याचा प्रकार लक्षात आल्याने, त्याची बायको त्याला सोडून माहेरी परतली होती.


नव्या टीमला चहा ब्रेक देत, स्वत:ला पुन्हा शांत करुन नंदिनी ती त्यांच्या स्वागताला हजर झाली.

* सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.

*आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी.

*आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.

* फोटो साभार Google and Pixabay



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational