Kaustubh R

Inspirational

1.0  

Kaustubh R

Inspirational

मित्र हाच गुरू

मित्र हाच गुरू

1 min
10.8K


मैत्री ही चुका सुधारण्याची एक हक्काची जागा आहे पण त्यामुळे संबंधात कमीपणा पण येता कामा नये. त्याचबरोबर आपण जे सांगतोय त्यात फार काही मोठेपणा आहे असेही वाटता कामा नये. उगीचच समोरच्याला चांगले वाटेल असे बोलण्यापेक्षा त्यांना ती गोष्ट कशी नुकसानीची किंवा फायद्याची होऊ शकते हे व्यवस्थित पटवून देता आले पाहिजे. पण हे सगळे करत असताना निश्चितच आपले शब्द प्रोत्साहनपरच असावे. त्याला मागे खेचणारे नसावे. उलट आपल्या मित्राची प्रगती व्हावी, उत्कर्ष व्हावा पण तो होत असताना तो निकोप असावा. शुध्द, प्रामाणिक असावा. आपण अशीच अपेक्षा कायम आपल्या मित्र मैत्रीणींकडून ठेवावी.

आयुष्यात असे कितीतरी प्रसंग असतात की आपण त्यातून पुढे जाऊ शकतो की नाही असे वाटते. पण मित्रांचे प्रोत्साहन, साथ जर असेल तर निश्चितच आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. आपले शब्दच जर एखाद्याला नवीन आयुष्य, नवीन जीवन विचार देणारे ठरत असतील तर त्यात तरी आपण कंजुषी करू नये. मित्राने एखाद्या गुरूप्रमाणे काम केले तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य होऊ शकते. गरज असते ती फक्त योग्य पाठींब्याची .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational