Kaustubh R

Others

1.3  

Kaustubh R

Others

माणूस - एक नवी ओळख

माणूस - एक नवी ओळख

2 mins
23.9K


माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याच्या असण्याला म्हणजेच त्याच्या अस्तीत्वाला खूप महत्व असते . म्हणूनच आपण नेहमी कोण कसा दिसतो यापेक्षा तो कसा आहे याला जास्त महत्व द्यावे .थोडक्यात काय तर वरच्या रंगरुपाला न विचार करता ती व्यक्ती नेमकी कशी आहे , कोणत्या प्रसंगात ती कशी वागते हे पाहावे .

जसं दिसतं तसं नसतं , म्हणूनच तर जग फसतं असे म्हणतात ते काही खोटे नाही . बरेचदा आपण आपल्यासमोर एखादी व्यक्ती आली की लगेच त्या व्यक्तीच्या वरच्या रूपावरून आपण लगेच निष्कर्ष काढायला सुरुवात करतो . काय गडबड असते आपल्याला देवच जाणे . मग त्यावरून सुरू होतात आपले तर्क वितर्क. त्यापेक्षा थोडा संयम ठेवावा आणि ती व्यक्ती आपल्या सहवासात वारंवार येते तेंव्हा ठरवावे ती कशी आहे ? आपण त्या व्यक्तीशी कसे वागावे ?

यामुळे आपले मत त्या व्यक्तीबद्दल चांगले झाले तर छानच आणि जर आपल्याला काही खटकले तर आपण त्यापासून चार हात लांबच राहावे .

माणूस वाचला पाहिजे . समजून घेतला पाहिजे . हे एक न संपणारे पुस्तकच आहे . प्रत्येक पानापानावर जसे आपल्याला नवनवीन ज्ञान मिळते तसेच प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला नवनवीन अनुभव देत राहते . काही चांगले काही वाईट पण आपण शिकतच जातो .

हे शिकणे , अनुभव घेणे ही एक न संपणारी प्रक्रिया आहे .

काही जण अती सल्ला देणारी असतात तर काही तटस्थ . काही जण मन मोकळी असतात तर काही अबोल . काही जण सतत चेहेऱ्यावर हास्य ठेवणारी असतात तर काहींच्या चेहेऱ्यावर नेहमीच बारा वाजलेले असतात . मी जेंव्हा जेव्हा सामुहिक जागांवर थांबते तेंव्हा तेंव्हा मी फक्त सर्वांच्या हालचालीचे निरिक्षण करत राहते . तेंव्हा असे लक्षात येते की प्रत्येक जण आपापल्या नादात आपली कृती पार पाडत असतो . पण ती कृती करताना कधी त्यांच्या चेहेऱ्यावर आनंद तर कधी दु : ख , आश्चर्य असे वेगवेगळे भाव दिसत असतात . हे भाव वाचण्याचा जणू मला नादच लागला आहे . यामुळे एक गोष्ट मात्र नक्की घडली ती म्हणजे

मी माणसांना ओळखायला , पारखायला शिकले .

कोणत्याही व्यक्तीवर पटकन विश्वास भलेही ठेवायचा नाही पण त्या व्यक्ती बद्दल चांगले वाईट कोणतेही मत लगेच बनवायचे नाही .थोडक्यात काय तर इतर लोक सांगतात म्हणून एखादी व्यक्ती अशीच आहे असे म्हणण्यापेक्षा प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्याशी कशी वागते , कशी बोलते याचा अनुभव ध्यायचा आणि मगच आपले मत बनवायचे . मला तर असे वाटते आपण चांगले वागले तर समोरची व्यक्ती ही चांगलेच वागेल .

समजा ती व्यक्ती नाहीच चांगली वागली तर त्यांचे त्यांच्याबरोबर असे म्हणून चालायचे . त्यातून आपले नुकसान काही नाही तर आपल्या आयुष्यात चांगले , वाईट अनुभव आपल्याला काहीतरी निश्चितच शिकवण तर देऊन जातातच . पण एक मात्र नक्की रोजचा दिवस आपल्यासाठी नवाच असतो . पुढची भविष्याची काळजी करण्यापेक्षा आत्ताचा क्षण , आजचा दिवस आपण छान घालवला तरी बस्स .


Rate this content
Log in