मीरा
मीरा


आज १२ तारीख. शाळेच्या स्नेहसंमेलनाचा दिवस. किती दिवसांपासून मीरा हया दिवसाची वाट पाहात होती. तिने आईसाठी सुंदर कविता बनवली होती. ती संमेलनात ऐकवण्यासाठी मीराची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कार्यक्रमाची वेळ झाली, मीराने स्टेजच्या कोपर्यातून डोकावून पाहिलं. आई तिच्या जागेवर येऊन पोहोचली होती. आईच्या चेहर्यावरचे ते सदोदित हास्य कायमच मीराचा आत्मविश्वास वाढवून देत असे. थोड्याच वेळात प्रमुख पाहूणे आले अन् कार्यक्रमाला सुरूवात झाली. सुरवातीची काही सादरीकरणे झाल्यावर मीराचे नाव पुकारले गेले.
अतिशय उत्साहात मीरा स्टेजवर पोहोचली. तीने एकदाच आईकडे पाहिले, डोळे बंद केले अन् आपली कविता सुरू केली. कवितेच्या तीन चारचं ओळी ऐकल्या अन् सभागृहात शांतता पसरली. पाचवीतल्या मुलीने बनविलेल्या इतक्या ह्रदयस्पर्शी कवितेने सगळेच भारावून गेले.कविता संपली अन, टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. मीराने खुष होउन डोळे उघडले. समोर पाहते तर आई रडत होती. तिने पळत जाउन आईला मिठी मारली. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकड झाला.
'मीराची आई'.....एका प्राथमिक शाळेतील सर्वसामान्या शिक्षिका. स्वभावाने प्रेमळ पण तितकीच जिद्दी अन् करारी. सर्वच ाविद्यर्थांच्या आवडिच्या. पण हयांना मात्र पहिलीच्या वर्गातल्या मिनुविषयी फार कुतूहल. सर्वात शांत मुलगी. कधिही कोणाशिही बोलणार नाही. सदोदित तिच्याच विश्वात रमलेली. रमलेली कशाला हरवलेलीच!! नेहमी कुठल्यतरी विचारात मग्न. इतक्या लहानगीला अश्या अवस्थेत पाहून बाईंना कधीच करमायचं नाही. भरपूरदा बोलायचा प्रयत्न केला, पण उपयोग शुन्य. बाकिच्या मुलांबरोबर खेळताणाही कधी दिसायची नाही. एक दिवस मधल्या सुट्टीत सर्व मुले बाहेर खेलत होती. मिनू मात्र वर्गात एकटीच बसलेली. बाईंनी हे पाहिले अन् लागलीच तिच्या जवळ जाउन बसल्या. मिनूच्या हातापायावर कसलेसे निशाण दिसत होते. आईने मारलं का म्हणून त्यांनी विचारले. 'नाही' म्हणून उत्तर मिळाले. पुन्हा एकदा काय झाले म्हणून विचारले असता मिनू घाबरूनच गेली. रडायला लागली. तिची ही अवस्था पाहून बाई विचारात पडल्या. त्यांनी तिला शांत केले. दिवसभर त्यांच्या डोक्यातून मात्र ही गोष्ट जाईना. आज त्यांनी मिनूच्या घरी जायचे पक्के केले. शाळा सुटल्यावर त्या तडक मिनूच्या घरी जाउन पोहोचल्या. घर बंद होते. शेजारी चौकशी केल्यावर समजले की मिनूला बाबा नाहित, आई दिवसभर लोकांच्या घरी कामाला जाते. मीनू शाळेतून आल्यावर तिचे काका तिला स्वताच्या घरी घेउन जातात. हे वाक्य ऐकल्यावर मात्र त्यांच्या काळजात धस्स झालं. नको ते विचार डोक्यात यायला लागले. त्यांनी तेथून काढते पाउल घेतले. घरी आलंयावरही डोक्यातून विचार जाईनात. पुढे काही दिवस अशेच गेले. मिनूही दररोज शाळेत यायची. तसाच तो कोमेजलेला चेहरा. अन् पुन्हा डोक्यात विचार. काही दिवस अशेच गेल्यावर एक दिवस मिनू शाळेत अाली नाही, हे पाहून मनाची चलबिचल सुरू झाली. कसाबसा तो दिवस निघाला. दुसर्या दिवशी बाई शाळेत आल्या; परंतू मिनू आजही नव्हती. आता मात्र त्यांना राहावेना. एकदाची शाळा सुटली अन् त्या थेट मिनूच्या घरी पोहोचल्या.
मिनूची आई गावी गेलेली असल्याचे समजले; परंतू मिनूला सोबत नेले नसल्याचे कळले. त्यांनी लागलिच तिच्या काकांच्या घरचा पत्ता घेतला अन् तेथेही पोहोचल्या. दरवाजा ठोठावला पण उत्तर नाही.दरवाजा उघडा असल्याचे पाहून त्या सरळ आत गेल्या. आतल्या खोलित जाउन पाहता तर मिनू एका कोपर्यात बसलेली. मुसमुसत होती. त्यांनी जवळ जाउन पाहिले तर सर्वांगाने थरथरत होती. अंगावर सगळीकडे जखमा होत्या.काय समजायचे ते त्या समजल्या. त्या सरळ मिनूला घेउन दवाखन्यात पोहोचल्या. डॉक्टरांनी तपासणी केली अन् मिनूवर महिन्याभरापासून अत्याचार होत असल्याचे सांगितले. बाईंच्या काळजाचा ठोका चुकला. त्या मिनूजवळ जाउन बासल्या. त्यांना रडू कोसळले. थोड्या वेळाने भानावर आल्यावर त्यांनी मिनूच्या आईला फोन करून बोलावून घेतले. झाला प्रकार त्यांना सांगितला.
हे सर्व ऐकून मिनूची आई हादरुन गेली. आपल्या चुकीमुळ काय घडून गेले आहे ह्याची जाणिव त्यांना झाली. त्या पुर्णपणे हतबल होउन गेल्या. रडू लागल्या. काय करावे त्यांना सूचेना. अनेकविध चिंतांनी त्यांचे मन हेलावून गेले. बाईंनी त्यांना सावरले. शांत केले. मिनूची संपुर्ण जबाबदारी आपण घेउ इच्छित असल्याचे सांगितले. मिनूची आई आधी तयार होईना. परंतू आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून त्याही तयार झाल्या. आणि त्या दिवसापासून मिनूला त्यांनी आपली मुलगी म्हणून सांभाळले आहे. आपली मुलगी 'मीरा'.