मी मुंबई बेस्ट बोलतेय -आत्मकथा
लेखक-संजय रघुनाथ सोनवणे
संप म्हटले की मुंबईकरांच्या छातीत धड़धड़ सुरु होते. कंपनीच्या कमी पगारात जगणारी कुटूंबे धास्तावून जातात. महिन्याचा बजेट कोलमडतो.पण खरे सांगू हे करण्याची माझी मुळीच इच्छा नाही. मला विनाकारण तिकीट वाढविण्याची इच्छा नाही. पण ठराविक दोन टक्के वर्ग माझे आर्थिक शोषण करतो व अठ्यानव टक्के वर्ग माझे अस्तित्व कष्ट करून टिकवतो. त्यात राजकीय पक्ष ही सामिल आहे. मराठी अस्मिता जपणारे मराठी माणसाला कसे संपवतात हे त्याचे जीवंत उदाहरण आहे.
त्यातच संप, मोर्चे,जाळपोळ, रहदारीचा वाढता ताण यात माझे खूप नुकसान होते. आशिया खंडात एक नंबरची सेवा देणारे बेस्ट म्हणून माझा नावलौकिक होता. गरीबांची ,कष्टकऱ्यांची मी आधार स्तंभ आहे. गरीबाना परवडेल असे माझे तिकीट दर असतात. पण मला नेहमी काही लोक तोट्याच्या संकटात टाकतात. मी तोट्यात मुळीच नसते.काही लोक माझ्या टाळुवरचे लोणी खातात. कष्ट न करता काहीजन कोट्याधीश झाले. जे मला हातभार लावतात, जे मला जगवतात त्यांना नाहक कमी पगारात त्रास सहन करावा लागतो. मग नाईलाजाने संप करावा लागतो. तिकीट दर वाढवले जातात. मुंबईकर मला तेवढा कायम हातभार लावत आलेले आहेत. मी त्यांची खरोखर ऋणी आहेत. त्यांच्या मुळेच माझे अस्तित्व आहे नाहीतर मी केव्हाच संपले असते.
मला संपविण्यासाठी अनेक राजकीय लोक आर्थिक तोटा आहे असे भासवून माझे निवारे उध्वस्त करत आहे. काहीजन मला भाड्याने देण्याच्या तयारीत आहेत. काहीजन तर मला विकण्याची पण तयारी करत आहे. अनेक जनानी कमिशन मिळावे म्हणून एका मालकाला करारावर देण्याची चर्चा आहे. आपले पोट भरण्यासाठी हजारो कामगारांचे जीवन उध्वस्त होण्याची भिती आहे.
असे होऊ नये असे मला मनापासून वाटते. पण सत्ता तेथे शहाणपणा ह्या मुळे माझा घात होण्याची पण भिती आहे.
मराठी माणूस कसा परागंदा होतोय त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. काही राजकारणी लोकांनी माझा कष्टाचा पैसा खाऊन माझे हालहाल केले. त्यामुळे मी आजही तोट्यात आहे. मला कायम संपविण्याचा त्यांनी विडाच उचलला आहे. हजारो कामगार बेरोजगार होतील याची त्यांना थोडीसीही काळजी वाटत नाही. पण मी जीवंत असे पर्यंत गरीबांची सेवा करत राहणार.