shubham gawade Jadhav

Tragedy Others

3  

shubham gawade Jadhav

Tragedy Others

मी एक सैनिक....

मी एक सैनिक....

13 mins
971


      जवान ,फौजी , मेजर , साहेब , सैनिक अशा अनेक नावानी प्रसिद्ध पात्र आपल्या समाजात आपल्याला पाहायला मिळत . " सैनिक " हे काहींसाठी स्वप्न तर काहींसाठी फक्त आणि फक्त एक शिपाई .जे स्वप्न म्हणून बाळगतात ते यासाठी ध्येयवेडे होतात आणि आपले प्राण पणाला लावून मेहनत घेतात अन या स्वप्नाला सत्यात उतरावयाचा प्रयत्न करतात .ज्यांच्यासाठी स्वप्न असतें त्यांची तहान ,भूक हरपून जाते जोपर्यंत अंगावर सैनिकाची वर्दी चढत नाही .अंगावरती वर्दी ,मनात मायभुसाठी असलेलं प्रेम याने छाती उंचावते आणि एक वेगळाच माज चढतो .तो असतो देशभक्ती .


            आजपर्यंत कित्येक सैनिकांनी आपला हसत हसत जीव गमावला. त्यांनी कधीच स्वतःचा किंवा कुटुंबाचा विचार नाही केला .ज्या ज्या वेळी या देशाला बलिदानाची गरज पडली त्या त्या वेळी या जवानांनी हसत हसत प्राण त्यागून दिले .हे फक्त तेच करू शकतात ज्यांच्या हृदयात देशाविषयी कुटून कुटून प्रेम भरलं आहे . त्यांना खूप साऱ्या संकटाना सामोरं जावं लागत .कित्येक किलोमीटर स्वतःच्या आई वडील ,बहीण भाऊ ,बायका पोर यांपासून दूर राहावं लागत .कडक ट्रेनींग नंतर एक उमदा आणि लढवय्या तयार होतो आणि तो देशाच्या बलिदानासाठी तयार असतो . आज अशाच एका देशभक्त्याची आत्मकथा मी इथे लिहीत आहे .ज्यासाठी मला शब्द अपुरे पडणार आहेत .कारण त्यांचं देशभक्तीवरच प्रेम शब्दात वर्णता येण्याजोगं नाहीच .

 

                    " जय हिंद " म्हणलं की , आपोआप हात सॅल्यूट करण्यासाठी वर जातात , अंग एकदम शिस्तबद्ध पद्धतीत येत , छाती गर्वाने उंचावली जाते आणि डोळ्यात एक वेगळीच चमक येते ,दुरवरूनच त्याच्या शरीरयष्टीवरून तो कोण आहे याची ओळख होते ,अवघ्या काही क्षणात शत्रूला धूळ चारायची आणि कोणत्याही संकटाला सामोरं जायची अन वेळ पडली तर प्राणाची आहुती द्यायची ज्याची तयारी असतें तो म्हणजे सैनिक.

शेकडो लोकांना एकटाच भारी पडणारा सैनिक.आपली जनता सुरक्षित राहावी यासाठी दिवसरात्र सीमेवरती खपत असतो तो सैनिक.शेवटपर्यंत आपली नीतिमूल्य सांभाळत समाजात वावरतो तो सैनिक.

                    बोलाव तेवढं कमीच पडेल इतके गुण त्या प्रत्येक सैनिकामध्ये असततात .

                    आज रमेशचा मिलिटरी भरतीचा रिझल्ट होता .रमेश आणि त्याचे मित्र सगळे शांत होते .आज रोजसारखी टिंगल टवाळी नव्हती .सगळे सिरीयस झाले होते .रमेशचा मित्र बाबू नेट वरती रिझल्ट पाहत होता .सगळ्यांचं लक्ष बाब्याकडे होत .बाब्याने अचानक तोंड वासल तशी सगळ्यांची तारांबळ उडाली .सगळे त्याला विचारू लागले आरं ,बाब्या बोल .काय झालं ?

बाब्या ओरडला ," रम्या लेका ,तू भरती झाला." पास झाला पास ." बास क्षणांपूर्वी चिंतेत असलेलं वातावरण आनंदाने भरून गेलं .शिट्यांचा आवाज मोकळ्या माळावर घुमून लागला . न सांगताच गुलाल घेऊन आलेली पोर माळावरती धिंगाणा घालू लागली .त्यांना रम्याच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास होता करणं ज्या पद्धतीने तो प्रयत्न करत होता साहजिकच यश त्याला मिळणार होत.

त्याच्या सवंगड्यासोबत गावालाही त्याच्या निकालाची उत्सुकता होता .पोरांचा धुमाकूळ ऐकून गाव वाल्यांनी हलगी वाला बोलावला आणि पोरांना गावच्या मारुती मंदिराजवळ बोलावणं पाठवलं .पोर रम्याला खांद्यावर घेऊन शिट्या मारीत आणि गुलाल उधळत मारुती मंदिरात आली तशी हलगी सुरु झाली रंगनाग... रंगनाग आणि पोरांना जास्तच जोर चढला .गावाबरोबरच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .सुख कोणाचही असो पण आनंद कसा घ्यायचा हे फक्त गावातल्या लोकांनाच माहित .गावकऱ्यांनी रमेशचं कौतुक केल त्याला मानाचा फेटा बांधून सत्कार केला. त्याच बरोबरं त्याच्या आई वडिलांचाही सत्कार झाला.त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता .त्यांना आज आभाळ ठेंगणं पडत होत.डोळे आंनदाश्रूनी गच्च भरले होते .रमेशची मेहनत फळाला आली होती .सारा गाव आनंदात डुंबून गेला होता एकमेव गावातला शिपाई म्हणून तो मिरवणार होता .


                निरोप जो कधीच कोणाला देऊ वाटत नसतो .पण तो एक न एक दिवस द्यावाच लागतो . आता रमेशला पोस्टाने पत्र येणार आणि तो लगेच ट्रेनींगला जाणार होता .एकेदिवशी पत्र आलं आणि आवारायची गडबड सुरु झाली .दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या रेल्वे स्टेशनवरून त्यांना बेस कॅम्प ला पोहचायचं होत.रमेशची आई खूप साऱ्या गोष्टी भरत होती .आईच्या काळजाचा तुकडा ,आईसाठी असलेला अनमोल रत्न तिला सोडून पहिल्यांदा राहणार होता .तिझे डोळे सारखे भरून येत होते .शेवटी आई ही आईच असतें .तो जायला निघाला तशी गावची मंडळी जमली .आईने काळजाच्या तुकड्याला काळजाशी कवटाळलं .दोघांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला .एखाद्या सिनेमातल्या दृश्याला लाजवेल असं ते दृश्य समोर चालू होता . बाप ही एक गोष्ट कायम पाठमोरीच राहते .तो सगळ्यांसमोर रडू शकत नव्हता म्हणून आत जाऊन गळ्यातला पंचा तोंडाला लावून रडत होता .आजूबाजूच्या लोकांच्या ही डोळ्याच्या कडा अलगद पाणावल्या होत्या .शेवटी रमेशने काढता पाय घेतला आणि ट्रेनींग साठी निघाला .


                  थोड्याच दिवसात रमेशचं ट्रेनींग झालं .आता रमेश एक उमदा सैनिक झाला होता .अधूनमधून आई -वडिलांशी फोनवर बोलणं होत होतं. आईच्या डोळ्यात टचकन पाणी येत होत.पण तो तिला खूप प्रेमानं समजावून सांगत होता .वडिलांनाही आईला आधार द्यायला सांगत होता .लेकरू कितीही सुखात असलं तरीही आईची माया काळजी करतेच .ती एक नैसर्गिक क्रियाच आहे .


                रमेशची हुशारी आणि चपळाई पाहून वरच्या साहेबांनी त्याला एका मिशनवरती पाठवायचं ठरवलं .रमेशला हे कळताच तोही आनंदी झाला.त्याला मिझोरामच्या घनदाट जंगलाकडे एका दहशतवादी संघटनेला पकडायला रवाना करणार होते .दोन दिवसात हालचाली झाल्या. एक साहेब आणि टीम तिकडे रवाना केली गेली .भर जंगलात त्यांचा बेस कॅम्प पडला आणि दहशतवाद्यांना पकडायची कल्पना आखू जाऊ लागली .ज्याची त्याला कामे बजावून सांगत असताना रमेश ते कान देऊन लक्षपूर्वक ऐकत होता .दुसृया दिवशी सगळे वेगवेगळे होऊन त्यांना शोधून पकडणार होते .रमेश आणि त्याचा साथीदार उदय निघाले .मिझोरामचं जंगल तुडवत सावधानीने पुढे पुढे जात होते .अचानक सूऊऊऊऊऊउ करत एक गोळी आली आणि उदयच्या छातीत घुसली .उदय जमिनीवरती कोसळला .रक्ताचा पाट वाहू लागला .रमेश सावध झाला त्याने लगेच एका दगडाचा आडोसा घेतला .त्याने आपल्या दुसऱ्या साथीदारांना संदेश पाठवला .आता तो सावध दगडा आड होता त्यांच्या हल्याला प्रत्युत्तर देत होता .


                     दुसऱ्या साथीदारांना यायला खूप वेळ लागणार होता .तोवर यांना एकट्यालाच उत्तर द्यायचं होत.त्याचं काम तो चोख करत होता. अचानक एक गोळी सूऊऊऊऊउ करत रमेशच्या दंडाला चाटून गेली .रमेशचं रक्त वाहू लागलं .दगडापासून आजूबाजूला पाहत असताना एक जुनी मिलिटरची कॅम्प ची जागा दिसली .तो लपत छपत कसाबसा तिथे पोहचला .आत सगळा अंधार होता .गर्द झाडीत ती लपण्याची जागा बनवली होती .कोणालाही सहज न सापडणारी .त्याचा आडोसा घेत रमेश तिथे लपला .त्याचा साथीदार उदय कधीच धारातीर्थी पडला होता .एक जवान शहीद झाला होता .आपल्या मायभुसाठी .रमेश तिथल्या एका लाकडाला टेकून पाय दोन्ही बाजूला पसरून बसला होता . त्याच्या चेहऱ्यावरती आता भय पसरल होत.मनातून कुठेतरी भीतीची पाल चुकचुकून गेली . तेवढ्यात इक मोठा आवाज आला "डरो मत , जवान तुम एक शेर हो ." आवाज ऐकताच रमेश घाबरला. विजेच्या गतीने बंदुकीवर हात गेला .रमेश सावध झाला.त्याला वाटलं आपण शत्रूच्या हाथी पडलो .नजर चौफेर फिरली .वाऱ्या व्यतिरिक्त कोणाचीही हालचाल तिथे नव्हती .पुन्हा आवाज आला , " शांत जवान शांत " . रमेशला काही सुचत नव्हतं .रमेशने हिंमत एकटवुन विचारलं , कौन हो तुम ? , क्या चाहते हो ?.. सामने आओ. तसा आवाज आला ,मैं तुम्हे कुछ नहीं करुंगा.मैं भी एक भारत माँ का ही जवान हूं . रमेश म्हणाला ,मैं तुम्हारा यकिन क्यूँ करू ? पुन्हा आवाज झाला आणि त्यांनी एक कोडवर्ड सांगितला की जो फक्त त्या टीमच्या लोकांनाच माहित असतो .रमेशने बंदूक हातातून खाली ठेवली .


          तो आवाज पुढे बोलू लागला ," मैं कर्नल तेगसिंग ". रमेश बोलला " मग तुम्ही समोर या ना. असे लपून का बोलत आहात ?" तेगसिंग हसला आणि म्हणाला , बेटा मैं कब का मर चुका हूं .पुन्हा रमेशचा हात बंदुकीवर गेला .

कर्नल तेगसिंग - डरो मत .मैं सच कह रहा हूं .विश्वास रखो मैं कुछ नहीं करुंगा तुम्हे .

रमेश - मेलेला माणूस कधी बोलत नसतो .

कर्नल तेगसिंग - हा लेकिन .मेरी आत्मा भटक रही है यहा सालोंसे .मेरी एक इच्छा अधुरी रेह गयी .

रमेश - आत्मा ,भूत वगैरे अस काही नसत .तुम्ही साफ खोटं बोलत आहात .

कर्नल तेगसिंग- मेरा विश्वास करो .तुम्हारे सामने एक ट्रंक पडी है .ओ खोलॊ उसमे एक फोटो है देखो .

रमेशने ट्रंक खोलली त्यात काही कपडे .एक छोटी बाहुली आणि एक फोटो होता .त्या फोटोत त्याचे सिनिअर सर आणि एक दुसरा माणूस होता . तो दुसरा माणूस तर मेजर तेज आहेत .ज्यांना त्या बॅचचा सगळ्यात फास्ट मानल जायचं .जे शत्रूला त्यांच्या एरियात घुसून मारायचे .त्यांना काहीही न समजता .पण ते अचानक गायब झाले होते .त्यांचं शव देखील कोणाला सापडलं नव्हतं .

रमेश - तो दुसरा व्यक्ती म्हणजे तुफान मेजर तेज आहेत .त्यांचा फोटो तुमच्याकडे कसा ? तुम्ही काय केल त्यांच्या सोबत ?

कर्नल तेगसिंग - तो मीच आहे .

रमेशला काहीच समजतं नव्हतं .अचानक त्यांची मराठी ऐकून तो गरबडला .कारण ते एकमेव होते त्यांच्या बॅचमध्ये ज्यांना शुद्ध मराठी येत होती .ते पंजाबचे असतानाही .कारण त्यांची आई महाराष्ट्रीयन तर वडिलांना पंजाबी होते .आता रमेशला पक्क समजलं की ते खरच मेजर तेज म्हणजे कर्नल तेगसिंग आहेत .लगेच रमेश उठला आवाजाच्या दिशेने उभा राहत एक सॅल्यूट करत म्हणाला .

रमेश - जय हिंद सर .

कर्नल तेगसिंग - जय हिंद .

रमेश - तुम्ही इथं कसे आणि या अवस्थेत .माझा विश्वासच बसत नाही .

कर्नल तेगसिंग - खूप मोठी गोष्ट आहे .नशिबाने माझ्यासोबत घात केला .

रमेश - माझ्याकडे वेळ आहे सर .बटालियन यायला वेळ आहे .

कर्नल तेगसिंग - ओके माय बॉय . सांगतो मी .अगोदर हाताला बघ रक्त वाहत आहे .त्याला काही लाव . रमेशने पाहिलं आणि पाठीवरच्या बॅगमधून फस्टेड बॉक्स काढून जखमेवर मलमपट्टी केली .

 

         आता कर्नल तेगसिंग म्हणजे मेजर तेज सांगू लागले . मी ही तुझ्यासारखा यंग .तुझ्या इतका चपल .वयाच्या एकोणिसाव्या वर्षी भरती झालेलो .मनात देशभक्ती भरलेली .एक वेगळाच ध्यास होता की मला जवान होयच .मेहनत घेतली .यश मिळाल.आई वडिलांना खुश पाहून डोळे भरून आले .थोड्याच दिवसात ट्रेनींग साठी आलो .माझ्या चपळाईने आणि हुशारीने मला माझ्या सिनिअर लोकांच्या नजरेत वेगळंच स्थान बनवून दिल .माझ्या प्रगतीला सुरुवात झाली आणि त्यातच मला तुझे सिनिअर मेजर करण भेटले .एक मित्र म्हणून आयुष्यात एकमेव भेटलेली व्यक्ती .त्याच्यासारखा मित्र भेटायला खरच नशीब लागत .तोही खूप चपळ आणि हुशार .दोघांची चांगली गट्टी जमली .मग आम्हाला एका मिशन वरती पाठवण्यात आलं .मिशन नक्षी वर .

   

                        मिशन नक्षी

              या मिशनमध्ये नक्षलवाद्यांना ठार मारायचं होता .त्यांनी त्या भागात उच्छाद मांडला होता .नेते लोकांना सळो की पळो करून सोडल होत.आम्हाला त्यांच्या सौरक्षणाची जबाबदारी देण्यात आली .आम्ही त्या भागाचा अभ्यास केला .तिथे खूप काम यायची ,सरकारी योजना यायच्या पण नेते लोक तिथल्या जनतेच्या भोळ्यापणाचा फायदा घेऊन त्याचे पैसे स्वतःच्या घशात घालून घ्यायचे .तिथल्या सामान्य लोकांना गरजेच्या वस्तू भेटत नव्हत्या ,दवाखाने ,शाळा काही विकास नाही .काही शिक्षित लोक एकत्र आले .त्यांनी नेते लोकांना जब विचारला तर त्यांना मारण्यात आले .म्हणून तिथे त्यांनी उच्छाद मांडला आणि सरकार विरोधात हत्यार उचलले . त्यांना जीवे मारायला आम्हाला रवाना करण्यात आलं .मी आणि करण दोघेही काही वेगळ्याच निर्धाराने तिथे गेलो .


रोज आम्ही आजूबाजूला फिरून माहिती गोळा करू लागलो .नक्षलवाद्यांच्या कुटुंबाला भेटू लागलो .फ्री मेडिकल चेकअप कॅम्प करू लागलो. तात्पुरत्या शाळा करू लागलो .त्याने तिथल्या जनतेला आधार मिळाला .नवनवीन कार्यशाळा उभारू लागलो .त्याचा आनंद वेगळाच होता. नक्षलवाद्यांची मत परिवर्तन घडवून आणली .नेत्यांविरुद्ध पक्के सबूत मिळवले आणि केस फाईल केली .तिथे नवीन नेता आला आणि कायापालट घडून आला. आमच्या कामगिरीबद्दल मला आणि करण ला नावाजण्यात आलं .एकही बळी न घेता आम्ही ती लढाई जिंकली होती .आपल्याच लोकांना मारून बक्षीस मिळवण्यात काय आनंद .तो आनंद नव्हे लांच्छनास्पद बाब आहे हे आम्ही ओळखून काम केल आणि आम्ही त्यात सफल झालो .पुढे आम्हाला मिशन चाईल्ड वर पाठवण्यात आलं .

         

              मिशन चाईल्ड

           छोट्या छोट्या मुलांना पकडून त्यांच्याकडून अवैध काम करून घेणं आणि त्यांची विक्री करणं यात आसाम अग्रेसर होत. त्यासाठी आम्हाला लगेच तिकडे रवाना करण्यात आलं .या मिशन मध्ये आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली .त्यात आमचे काही साथीदार मारले गेले .डोळ्यासमोर सोबती मारले जात होते पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो कारण देशाचं भविष्य घडवणारे छोटे छोटे मुलं त्यांच्या ताब्यात होते .आम्हाला कोणतंच ठोस पाऊल उचलता येत नव्हतं .आसाम या राज्यात ही गोष्ट घडत होती .आम्ही त्या जागेचा आणि लोकांचा सगळा अभ्यास केला .सामान्य लोकातलीच लोक त्या दुसऱ्या लोकांना मदत करत होती .त्यांची एक साखळी बनली होती .त्याला तोडणं असंभव होत.खूप प्रयत्नानंतर एक धागा हाताला लागला आणि आम्ही कामाला लागलो .जंगलांमध्ये दबा धरून बसायचं आणि मुलांना पळवायचा काम करणाऱ्या कालिया टोळीला आम्ही पकडलं .त्यात आमचे १० साथीदार शहीद झाले .

      

            यानंतर आम्ही खूप छोटे मोठे मिशन्स केले .कुठे शत्रू बाहेरचा होता तर कुठे आपलाच आतला .कुठे शस्त्र उचलावी लागली तर कुठे प्रेमानं काम झालं . त्यानंतर आम्ही पुन्हा मूळच्या जागी बेस कॅम्प ला आलो .घरच्यांनी लग्न जमवलं होत .खूप दिवसांनी घरी जाणार म्हणून मी हुरळून गेलो होतो .आई वडिलांना भेटायची इच्छा झाली होती .मी गावी रवाना झालो .मंडप वगैरे सजला होता .आसपासचे सगळे जमले होते .मुलगी न पाहताच मीही होकार दिला .धुमधडाक्यात लग्न झालं .मला भेटलेली सोबतीण खरच खूप सुंदर होती .मी प्रेमात बुडून गेलो .थोड्याच दिवसात एकमेकांना ओळखून घेतलं .आमच्यातली गोडी वाढत गेली . अचानक एक दिवशी कॉल आला मला लगेच बोलावलं होत .घरी माहित झालं .आता माझी आई आणि बायको दोघीही रडू लागल्या .निरोप द्यायचा नसतो पण कोणताच दुसरा पर्याय नसल्यावर द्यावाच लागतो .

                 मी कॅम्पवर पोहचलो .तिथे समजलं की आपला शत्रू देश आपल्यावर हल्ला करण्याची तयारी करत आहे .त्यांची ती तयारी काय आहे ? हे कोणालाच माहित नाही .ते सीमेतून आत घुसलेत .जम्मू काश्मीर परिसरात तिथे त्यांना शोधून काढायचं .हे आमचं मिशन होत. मिशन द काश्मीर.

    

                    मिशन द काश्मीर

        मिशनला सुरुवात झाली .आम्हाला काही नियम देण्यात आले .इथून माघारी परत येण्याची ग्यारंटीही कमी होती .पण जेव्हा प्रश्न आपल्या मायभूचा येतो तेव्हा माघारी येण्याचा प्रश्नच उरत नाही .समोर फक्त एकच असतं जे आपल्या मातृभूमीचे अस्तित्व नष्ट करायला निघालेत त्यांचा खात्मा. थंडी खूप तिकडे .आम्हाला साहित्य भेटली.आम्ही रवाना झालो .आम्ही यावेळी अभ्यास जास्त केला .रोज फिरून त्या एरियातला कप्पा न कप्पा माहित करून घेतला .तिथली लोक स्वतःकडे वळवून घेतली .दिवसांमाघून दिवस लोटत होते .कधी कधीच घरच्यांसोबत बोलणं होत होतं .


      आम्ही आमच्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडत होतो .रोज त्यांना पकडायचा सराव करत होतो .मला भटकंतीचा खूप छंद .मी कधी कधी एकटाच फिरायला जात असायचो .त्यादिवशीही तसच निघालो फिरायला .आसपासच निरीक्षण करायचं आणि आपल्या वहीत शब्दांनी कैद करायचं .यावेळी आणखी दोन साथीदार भेटले मेजर अर्जुन आणि मेजर सूर्या त्यांना सोबत घेऊन मी फिरायला निघालो .आम्ही गप्पा मारत मारत बेस कॅम्प पासून खूप दूर निघून गेलो .आम्हाला ते समजलंच नाही .आम्ही आता शत्रूच्या झोन मध्ये गेलो .समोर काही हालचाल दिसली तसे आम्ही सावध झालो .आमच्या बंदुकाही सावध झाल्या .आम्ही आता लपत छपत त्या रोखाने निघालो जिथे हालचाल होती .दुर्बिणीतून पाहिलं तर समोर शत्रू पक्षाचे ट्रक भरून हत्यारे येत होती .आम्हाला काय कराव सुचेना आम्ही तिघेच होतो .आता आम्ही एक प्लॅन आखला .तिघांपैकी दोघांनी जमेल तसे त्यांच्यात सामील व्हायचं आणि तिथली माहिती उरलेल्या साथीदाराला सांगायची पुढे त्याने ती माहिती आपल्या बेस पर्यंत पोहचवायची.प्लॅन आखला गेला मी आणि मेजर सूर्या तयार झालो त्यांच्यात जायला . मेजर अर्जुन कलेक्ट केलेली माहिती बेस पर्यंत पोहचवणार होता .आम्ही हळूहळू गेलो .दोन शत्रूला मरून त्यांचा वेष परिधान करून त्यांच्यात मिक्स झालो .तिथे खूप सारी माणसं होती म्हणून आम्हा दोघांना कोणी ओळखू शकाल नाही .पठाणी दाढी ,डोळ्यात काजळ आम्ही त्यातलेच शोभत होतो .


           मला एकदा मेजर सूर्या ने सांगितलं की मी बाप होणार आहे अशी चिट्ठी घरून आली आहे .मी खूप खुश होतो .हे मिशन आटोपून मी घरी जायचा प्लॅन मनोमन योजला होता .


             थोडे दिवस राहून आम्ही सगळी माहिती पुरवली .त्यांचा शस्त्र साठा किती ,त्यांची योजना सगळं काही .एक दिवस आम्ही तिथून निसटूनही आलो .आता आम्ही प्लॅन आखला आणि त्यांच्यावर हल्ला करायचं ठरवलं .योजने नुसार आम्ही व आमची बटालियन तिथे पोहचलो आणि हल्ल्याला सुरुवात झाली.सगळीकडे गोळ्यांचा पाऊस पडायला लागला यावेळी मी आणि अर्जुन पुढे होतो आम्ही शत्रूचे ढीग लावत होतो .आम्ही जोशात बटालियन पासून खूप पुढे निघून गेलो होतो .जवळ जवळ त्यांच्याच झोन मध्ये .एक गोळी सूऊऊऊउ करत आली आणि अर्जुनच्या दोन भुवयीच्या मधोमध .अर्जुन कोसळला ते पाहून मी दातओठ खात रागाने पुढे गेलो .पाठीमाघून मला परत ये असं म्हणणार्यांना मी दाद दिली नाही .मी भेटेल त्याला मारून टाकत होतो .गोळ्यांनी छलनी करत होतो .आता मी खूपच पुढे गेलेलो .शत्रूचे अवघेच लोक उरले होते .त्यांचा प्लॅन आणि बेस दोन्ही उध्वस्त झालं होतं .पण मी अर्जुनच्या प्रतिशोधात पुढे गेलो आणि जे नको होयला तेच झालं .मी शत्रूच्या हाथी सापडलो .दगाबाज म्हणून मला दाव्याने बांधण्यात आलं आणि एका टेंट मध्ये खांबाला बांधलं गेलं .आता मी संपलो हे मनोमन मला समजलं .त्यांनी मला खूप मारलं .माझ्यावर अत्याचार केले पण मी त्यांना हवी असणारी माहिती सांगितली नाही .तीन दिवसांनी मी कसाबसा तिथून सटकलो आणि आपल्या बेस वरती पोहचलो .सगळ्यांना मला पाहून आश्चर्य वाटलं मी रक्ताने माखलो होतो कसा बसा पोहचलो होतो .मला हॉस्पिटलला ऍडमिट केल आणि उपचार सुरु केले .


             महिनाभरात मी रिकव्हर झालो .मला सुट्टीत भेटली आणि मी आनंदाने गावी निघालो .माझ्या होणाऱ्या बाळासाठी मी एक सुंदर बाहुली घेतली. मी जात असतानाच मध्येच मला पुन्हा शत्रूने पकडलं .आता मी कसचं सुटत नाही असं मला वाटलं .ते मला पुन्हा त्यांच्या बेसवर घेऊन गेले .माझे जनावरासारखे हाल त्यांनी केले .रोज मारायचे .टॉर्चर करायचे .याकाळात आपला कॅम्प ही तिथून गेला होता .माझी सुटकेची आशा मावळली होती .मी अतोनात हाल सहन केले .एकदिवस कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटलो आणि इथे आलो .ही जागा बनवली जी कोणाच्याच दृष्टीस पडत नव्हती. भुकेच्या अभावी आणि रक्ताच्या वाहण्याने माझे हाल झाले .मी आजूबाजूला मिळण त्या वस्तू आणून इथे ठेवत होतो .शत्रू माझ्या शोधात कायम होते. इकडे चकरा चालू होत्या शेवटी मी ब्लड लॉस आणि भुकेने मरण पावलो .इथेच जीव गेला माझा .


                 मी एक रहस्यासारखा झालो .कोणाला काहीच समजलं नाही .मी माझ्या होणाऱ्या बाळाला देखील भेटू शकलो नाही .त्यासाठी घेतलेली बाहुली छातीशी रोज कवटाळत अश्रू गाळायचो .रोज त्या बाहुलीत माझं बाळ पाहायचो .शेवटच्या क्षणी भारत माता आठवली आणि माझे प्राण गेले .

       रमेशच्या डोळ्यातही पाणी आलं .त्याने नक्की त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेईल असं सांगितलं आणि ती बाहुली देखील पोहच करेल असं सांगितलं .अस सांगताच तो आवाज बंद झाला.

         मेजर करण तिथे पोहचले त्यांनी शत्रुंना मारून टाकलं आणि रमेशला आवाज देत होते रमेश त्या जागेतून बाहेर आला त्याने ती जागा मेजर करण यांना दाखवली .त्यांच्याही डोळ्यात पाणी उभं राहीलं.सगळ्यांनी मिळून त्यांना सॅल्यूट केला .रमेशने सुट्टी काढून त्याच्या कुटुंबियांना भेट दिली .त्यांची मुलगी खूप मोठी झाली होती त्यांनी ती बाहुली त्यांच्या हवाली केली .त्यांनाही सॅल्यूट केला आणि निघून आले.   


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy