मधुरा सत्य कहाणी
मधुरा सत्य कहाणी
मधुराच ती तीच दिसणं हसणे दिलखुलास बोलणं.. लाघवी संभाषण .. तिची माझी भेट ही एक नियतीच्या मनातील घटना,अगदी अलीकडेच एक महिन्या पूर्वी फोन आला.
"प्रवीण सर हॅलो मी
मधुरा बोलते." मी चमकलो च कोणतीही ओळख ह्यापूर्वी नसताना दिलखुलास गप्पांच्या ओघात वाहत गेलो. तस ओझरती भेट ही नेहमी काव्य कट्ट्यावर होत होती पण खरी मधुरा मला तिच्या बोलण्यात उलगडून गेली !
अनेक पुरस्कार प्राप्त झी T V वर मुलाखत घेण्या इतपत हे व्यक्तिमत्व खुलून गेलं व सर्व साहित्यिकांची नजर तिच्या कडे वळली
नियती अशी पण असू शकते अस वाटलं पण नाही तिचा जन्म हा मुळात साहित्यिक म्हणूनच झालं असावा मला तर ती स्वर्गातील शापित गंधर्व अप्सरा च वाटते.
ऐन तारुण्यात पदार्पणातच तिला अपस्मार ज्याला स्किझोफ्रेनिया ह्या व्याधीने ग्रासले सतत 27 वर्षे ह्या व्याधींशी झगडत होती. अचानक ती त्यातून सावरत कविता करू लागली काय चमत्कार ती तर सिद्ध हस्त प्रतिभावंत कवी म्हणूनच नव्याने जन्माला आली, तेव्हा पासुन तीने मागे वळुन पहिलेच नाही ती सतत आपल्या भाव विश्वात रमत एकेक शिखर पादाक्रांत करू लागली.
डॉक्टरांनी तिला स्किझोफ्रेनिया या रोगाची उपाधी जरी लावली असली तरी मला तर वाटते तिला काव्यनिर्मिती ची व्याधी जडली होती.
लोक भले ही तिला मानसीक रोगी म्हणत असतील पण मला तर ह्या रूप गर्विते ला चक्क सरस्वतीचा च वरद हस्त लाभला होता असे नाही तर अप्सरे चा पण आशिर्वाद भरभरून मिळाला होता. ती जशी देखणी च नव्हे तर स्वभावाने मधुर बोलण्यात मधुर प्रतिभा तर अखंड ओसंडुन वहात असलेली ही साहित्य सरिता च होती.
आज तिच्या मागे उभे असलेला तिचा मुलगा चांगल्या हुद्द्यावर नोकरी करतो तसेच तिच्या पाठीशी असलेला खम्बीर पती सुध्दा खूप योग्य साथ देत आहेत.
अश्या ह्या साहित्य सरस्वतीचा उध्या 47 वा वाढ दिवस त्या निमित्याने हा प्रपंच
मधुरा तु अशीच मधुर रहा तुच्या हातुन अशीच साहित्य सेवा घडो
ही सरस्वती ला प्रार्थना करतो
तुला भावी जीवन सुखकर आनन्द दाई आरोग्य कर होवो
व आम्हाला नवीन साहित्य वाचायला मिळो ही देवा चरणी प्रार्थना करून मी सर्वांची रजा घेतो
मधुरा
हॅप्पी बर्थ। डे
जिवेत शरदा शतम 🎂🎂🎁🎁🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा