मैत्रीण
मैत्रीण


मी इयत्ता आठवीच्या वर्गात असताना माझी एक मैत्रीण माझा टिफिन बॉक्स चोरून नेला. तशी ती फार जीवलग मैत्रिणी होती. एकमेकींना खूप जीव लावायचं एकही घास न सोडून खाता राहायचं, एकमेकीच्या घरी जाणे येणे असायचे, कुठलीही नवीन वस्तू आणली की एकमेकींना वापरायला द्यायची, प्रत्येक मनातली गोष्ट एकमेकींना शेअर करायचं, अभ्यासातली व इतर विषयातील सर्व माहिती एकमेकींना सांगायचं, एकमेकींना जीवापाड जपायचं, हसी मजाक करून हसून खेळून राहायचं, अशी ती जिवाभावाची माझी मैत्रीण खूप छान मनमिळावू होती. एके दिवशी दुपारी आम्ही दोघी एकत्र जेवलो आणि वर्गात जाऊन एकाच बेंचवर बसलो. शाळा सुटल्यानंतर मला माझा टिफिन बॉक्स सोबत घ्यायची आठवणच राहिली नाही. मी सरळ घरी निघून आले. माझ्या इतर मैत्रिणींनी माझा डबा राहिला म्हणून माझ्या जिवलग मैत्रिणीच्या जवळ दिला आणि तिला सांगितलं की हा डबा तु तुझ्या मैत्रिणीला नेऊन दे. दुसऱ्या दिवशी मला वाटलं माझी मैत्रीण माझा डबा मला परत आणून देईल. वर्गातल्या सर्व मुलींनी माझ्या जिवलग मैत्रिणी कडे डबा दिलेला सर्वांनी पाहिलं होतं. चार-आठ दिवस निघून गेले.. पण माझ्या मैत्रिणीने मला काही केल्या माझा डबा परत केला नाही. चार-पाच दिवस मी लगातार तिला डब्यासाठी विचारत होते आणि माझी मैत्रीण माझ्या प्रश्नाचे उत्तर वारंवार टाळत होती. माझ्या नजरेला नजर देऊन बोलत नव्हती.
एके दिवशी ती म्हणाली मी तुझा डबा घेतला नाही यापुढे तू मला बोलायचं नाही आणि मला डबा मागायचा नाही. आता तिचं मन बदललं होतं. तिला माझा डबा परत द्यायचा नव्हता... इतके दिवस केलेली मैत्री एका क्षणात एका डब्यासाठी तुटली होती. आणि काळजाचे पार तुकडे तुकडे झाले होते. मला तर फार रडायला येत होते. रडून रडून डोळे लाल झाले होते. झालेला सर्व प्रकार मी घरी सांगितला आणि आईची डब्यामागची कटकट थांबली..पण ती सल माझ्या मनात बसली होती.ती काही केल्या मिळता मिळत नव्हती. मला राहून राहून माझ्या मैत्रिणीचा चेहरा आणि तिच्या मनातला कपट पणा जाणवत होता. मला सारखं वाटायचं मी काय कमी केलं माझ्या मैत्रिणीला माझ्या मैत्रीचा चांगलाच धडा दिला असं मला नेहमी सारखं वाटायचं आणि त्या दिवशी पासून माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल कसलाच आदर भाव राहिला नाही.
त्या दिवसापासून मी तिच्या बेंचवर बसणं बंद केलं तीही मला बोलत नव्हती आणि मीही तिला बोलत नव्हते. इतक्या दिवसांची मैत्री इतक्या जीव लावणाऱ्या मैत्रिणी एका शुल्लक डब्यासाठी मैत्रीचं पवित्र नातं तुटलं होतं राहून राहून सारखी आठवण यायची किती न साध्या डब्यासाठी माझ्याशी अशी का वागली असं मला सारखं वाटायचं माझा डबा चोरून मलाच द्वेष करत होती. मलाही माझ्या मैत्रिणीचा खूप खूप द्वेश वाटला तिच्या बुद्धीची किळस आली... तिने जर माझा डबा मागून घेतला असता तर मला काहीच वाटलं नसतं तिच्या अशा या वागण्याने मी आतून दुखावली गेली होती. तेव्हापासून मैत्री करताना खूप विचारपूर्वक करते पूर्ण विश्वास पटल्यानंतर त्याच्यासोबत मैत्री करते...
जेव्हा जेव्हा माझी मैत्रीण समोर यायची तेव्हा तेव्हा मला माझा डबा दिसायचा बाब शुल्लक होती पण फार मोठी होती. ती गोष्ट एका चोरीला नेणार होती म्हणून ती मैत्रीण माझ्या मनातून कायमची उतरून गेली होती. आणि मी त्या दिवसापासून तिचा नेहमी द्वेष करू लागले...